
स्वामी विवेकानंद यांचा हा फोटो आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. स्वामी विवेकानंद यांनी आपल्या भाषणातून जगाला भारतीय संस्कृती, वेदशास्त्र यांचं महत्त्व पटवून दिलं. जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलवण्यात त्यांचे योगदान मोलाचे आहे. स्वामी विवेकानंद यांचे विचार आजही प्रेरणादायी आहेत. स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोलकात्यातील एका नामवंत बंगाली कायस्थ परिवारात झाला. लहानपणापासूनच त्यांचा ओढा अध्यात्माकडं होता. ते लहानपणीच आपल्या मित्रांना आपण संन्यासी होणार असल्याचं सांगत. कोण्या एका हस्तरेषा तज्ज्ञांनंही याविषयी भाकीत केलं होतं. त्याचं औपचारिक नाव नरेंद्रनाथ दत्त होतं, पण घरातलं त्यांचं नाव वीरेश्वर होतं.

हा फोटो आहे, स्वामी विवेकानंद यांच्या आईचा. त्याचं नाव भुवनेश्वरी देवी होतं. स्वामी विवेकानंद यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयातील प्रसिद्ध वकील होते. संस्कृत आणि फार्सी भाषेवरही त्यांचं प्रभुत्व होतं. मात्र त्यांनी सन्यास घेतला आणि ते बाबा दुर्गाचरण दत्ता झाले. स्वामी विवेकानंद यांची आई भुवनेश्वरी देवी या ही अत्यंत धार्मिक होत्या. त्यांचा बहुतांश वेळ भगवान शंकराच्या पूजा अर्चनेत जात असे.

जुन्या काळातील एक भव्य घर या फोटोत दिसत आहे. हा आहे स्वामी विवेकानंद यांच्या घराचा. कोलकात्यातील गोरालेन मुखर्जी लेन मध्ये हे घर होतं. विवेकानंद यांच्या आई -वडिलांना दहा मुलं झाली. त्यापैकी केवळ चार मुलं जिवंत राहिली. पहिली मुलगी आठ महिन्यातच गेली. दुसऱ्या मुलाबद्दल फार माहिती मिळत नाही. एक मुलगी अडीच वर्षांची होऊन गेली. तिसरी मुलगी हरामोनी देवी जिवंत राहिली. ती 22 वर्षांची होऊन गेली.

हा फोटो आहे स्वामी विवेकानंद यांची बहीण स्वर्णमयी देवी यांचा. या 72 वर्षापर्यंत जीवित होत्या. रामकृष्ण मिशन द्वारे प्रकाशित विवेकानंद यांच्या जीवनावरील पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, स्वर्णमयी देवी आणि विवेकानंद यांच्यामध्ये खूप घट्ट नातं होतं. लहान असताना स्वामी विवेकानंद अर्थात नरेंद्र कायम आपल्या या बहिणीबरोबर असायचे. त्यांच्याबरोबर मस्ती करायचे.

स्वामी विवेकानंद यांचा अगदी तरुण वयातील फोटो आहे. स्वामी विवेकानंद यांच्या भावंडापैकी आणखी एक बहिण वयाच्या पाचव्या वर्षी मरण पावली. त्यांच्यानंतर स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला होता. स्वामीजी आपल्या आई -वडीलांचे सहावं अपत्य होते. सातवं अपत्य किरणबाला देवी होत्या. त्या सोळा की अठरा वर्षांपर्यंत जिवंत होत्या. आठवं अपत्य असलेल्या जोगिंद्रबाला देवी यांनी वयाच्या 25 व्या वर्षी 1881 मध्ये सिमल्यात आत्महत्या केली.

हा फोटो आहे स्वामी विवेकानंद यांचे बंधू महेंद्र नाथ यांचा. स्वामी विवेकानंद यांची जी भावंडे दीर्घकाळ जीवित राहिली त्यात त्यांचे बंधू महेंद्रनाथ आणि भूपेंद्र नाथ यांचा समावेश आहे. अन्य कोणत्या भावांची माहिती मिळत नाही, त्यावरून काही भावांचाही लहान वयातच मृत्यू झाला असावा. महेंद्र दत्त हे क्रांतीकारक होते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी क्रांतीकारकांबरोबर काम केलं. त्यानंतर त्यांनी समाजशास्त्रज्ञ आणि मानववंश शास्त्रज्ञ म्हणून काम केलं.

हा फोटो स्वामी विवेकानंद यांचे बंधू भूपेंद्र दत्त यांचा आहे. भूपेंद्र दत्त यांचा जन्म 4 सप्टेंबर 1880 मध्ये झाला. वयाच्या 81 व्या वर्षी 25 डिसेंबर 1961 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. ते युगांतर पत्रिकेचे संपादक होते. क्रांतीकारकांची बाजू मांडणारे वृत्तपत्र म्हणून त्याची ओळख होती. 1907 मध्ये त्यांना इंग्रजांशी अटकही केली होती. एक वर्ष ते तुरुंगात होते. ते एक उत्तम लेखकही होते. भारतीय संस्कृती आणि समाज यावर त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली. आपले बंधू स्वामी विवेकानंद यांच्यावरही त्यांनी एक पुस्तक लिहिले होतं.

हा फोटो आहे स्वामी विवेकानंद यांचे दोन्ही बंधू महेंद्रनाथ दत्त आणि भूपेंद्रनाथ दत्त यांचा. भूपेंद्रनाथ यांनी 1908 मध्ये भारत सोडला आणि ते अमेरिकेत गेले. तिथं त्यांनी ब्राऊन युनिव्हर्सिटीतून एम. एची पदवी घेतली. नंतर कॅलिफोर्नियातील गदर पार्टीत ते सामील झाले. नंतर ते जर्मनीला गेले. तिथं त्यांनी क्रांतीकारी आणि राजकीय कारवाया सुरू ठेवल्या. जर्मनीतील अनेक संस्थांशी त्यांचा संबंध होता. हॅम्बुर्गमध्ये त्यांनी अँथ्रॉपॉलॉजीमध्ये डॉक्टरेट मिळवली. 1927 मध्ये ते भारतात परत आले आणि त्यांनी कॉंग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं. मात्र त्यांच्या राजकीय कारवायांसाठी त्यांना अटक करण्यात आलं. कोलकातामध्ये वयाच्या 81 व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

हा फोटो आहे स्वामी विवेकानंद यांचे लहान भाऊ महेंद्रनाथ दत्त यांचा. त्यांचा जन्म 1869 मध्ये झाला होता. लहानपणापासून ते रामकृष्ण मिशन आणि विवेकानंद यांच्या कार्याशी जोडले गेले होते. स्वामी विवेकानंद यांच्याबरोबर ते दीर्घकाळ होते. स्वामी विवेकानंद यांच्या अदभूत दैवी शक्तींची त्यांना जाणीव होती. महेंद्रनाथही सतत भारत आणि इतर परदेशात दौरे करत. लंडन म्युझियममध्ये त्यांनी अभ्यास केला. अनेक विषयामध्ये त्यांना रस होता. त्याचा त्यांनी खूप अभ्यास केला. ते एक विचारवंत आणि समाजिक चिंतक होते. ते एक उत्तम कलाकार, अर्थतज्ञ आणि फिलाँथ्रॉपिस्टही होते.




