जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / स्त्रियांची लैंगिक उत्तेजना वाढवणारे संवेदनशील अवयव

स्त्रियांची लैंगिक उत्तेजना वाढवणारे संवेदनशील अवयव

स्त्रियांची लैंगिक उत्तेजना वाढवणारे संवेदनशील अवयव

काही विशिष्ट अवयवांना स्पर्श केल्याने लैंगिक उत्तेजना वाढते.

  • 1-MIN READ myupchar
  • Last Updated :

शारीरिक संबंध बनवताना पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये सामंजस्य असणं खूप महत्वाचे आहे. दोघांनाही लैंगिक समाधानाची इच्छा असतं. म्हणूनच एकमेकांच्या शरीराच्या संवेदनशील भागांबद्दल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. स्त्रीचे संवेदनशील अवयव भिन्न असतात, जिथं स्पर्श केल्यास कामवासना निर्माण होते. चला महिलांच्या संवेदनशील अवयवांबद्दल जाणून घेऊया -
कान
myupchar.com च्या अनुसार कान हा स्त्रियांना उत्तेजित करण्यात प्रमुख भूमिका बजावतो. स्त्री शारीरिक आणि मानसिकरित्याही तयार होते. आपल्याला लैंगिक सुख मिळवायचं असेल तर आपण आपल्या जोडीदाराच्या कानाला खालच्या किंवा मागच्या बाजूस अलगद स्पर्श करावा.
मान
बहुतेक स्त्रियांना लैंगिक संबंध करताना हलक्या हातांनी गळ्याला स्पर्श करून चुंबन घेतलेलं आवडतं. यामुळे लैंगिक संबंधात उत्साह वाढतो. स्त्रियांच्या मानेकडील भाग अतिशय संवेदनशील असतो. त्यास कुरवाळल्याने लैंगिक संबंधांचा आनंद वाढवता येतो.
मांडी
महिलांच्या मांडीचा भाग अत्यंत संवेदनशील असतो. जिथं महिलांच्या संवेदना स्पर्श करून, प्रेमाने कुरवाळून त्या उत्तेजित होतात आणि शारीरिक संबंधात अधिक आनंद घेऊ शकतात.
पाय आणि अंगठा
स्त्रियांच्या पायाजवळ अनेक संवेदनशील नसा असतात ज्यांना स्पर्श केल्याने लैंगिक संबंधाची इच्छा निर्माण होते. स्त्रियांचे तळवे आणि अंगठे देखील संवेदनशील असतात म्हणून शरीराच्या या भागास स्पर्श केल्यास शारीरिक संबंधांचा आनंदही वाढू शकतो.
पापण्या
जेव्हा आपण जोडीदाराच्या पापण्यांना प्रेमाने चुंबन घेता तेव्हा शरीर शहारतं. खरंतर पापण्यांची त्वचा अत्यंत पातळ असते आणि तिथल्या नसा संवेदनशील असतात, म्हणून कामोत्तेजक अवयवांमध्ये याचा समावेश आहे.
पाठ
महिलांच्या पाठीचा भाग देखील खूप संवेदनशील असतो. इथं चुंबन घेण्यामुळे केवळ स्त्रिया उत्तेजित होत नाहीत तर त्यांचा ताणही कमी होतो. मानसिक आणि शारीरिक सुखानंतर ती स्वत:ला तिच्या जोडीदाराला समर्पित करते.
मनगट
महिलांचं मनगट खूप मऊ असतं. त्यांना स्पर्श केल्यानेदेखील स्त्रिया उत्तेजित होतात.
ओठ
चुंबन घेणं हा लैंगिक संबंधांचा एक महत्त्वाचा भाग आहे. चुंबनाने स्त्रिया लैंगिक संबंधांसाठी लवकर उत्तेजित होऊ शकतात. चुंबनाने स्त्री सहजपणे स्वत: ला समर्पित करण्यास तयार होते. यास संभोग पूर्व क्रियांसाठी सर्वोत्तम मार्ग देखील मानला जातो.
खांदे
बर्‍याच स्त्रियांच्या खांद्यावर चुंबन घेऊन लैंगिक संबंधांतील उत्साह वाढवता येतो. आपल्या जोडीदाराच्या खांद्यांना चुंबन घेण्यामुळे लैंगिक संबंधात त्वरित उत्तेजना मिळू शकते.
स्तन
महिलांचा हा भाग सर्वात संवेदनशील आहे. त्वरित स्पर्श केल्यास स्त्रिया उत्तेजित होतात. त्याच वेळी पुरुष स्तनांना स्पर्श केल्यावर देखील उत्साहित होतात. स्त्रियांना स्तनांना अधिक हळूहळू स्पर्श केलेलं आवडतं.
myupchar.com या नुसार लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. म्हणूनच लैंगिक शिक्षणावर जोर देण्यात येत आहे.
अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख -  लैंगिक शिक्षण आणि आरोग्य
न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात
जाहिरात