Home /News /lifestyle /

वाढत्या वजनाला रोखण्यासाठी जिरे ठरतील प्रभावी, जाणून घ्या 5 कारणं

वाढत्या वजनाला रोखण्यासाठी जिरे ठरतील प्रभावी, जाणून घ्या 5 कारणं

वजन कमी करण्यासाठी उगाचच काहीही अतिरेकी उपाय न करता जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात डोकावलात तर चांगलं होईल. तिथे अनेक प्रभावी पदार्थ सापडतील.

    मुंबई, 4 जानेवारी : वाढत्या वजनापासून सुटका हवीय? उपाय एकदम तुमच्या स्वयंपाकघरातच (kitchen) आहे! सोपा आणि प्रभावी. जिरे. (cumin) हो. हा कायम विविध पदार्थांमध्ये चवीसाठी वापरला जाणारा सामान्य मसाला तुम्हाला याकामी खूप उपयोगी पडू शकेल. अगदी आश्चर्यचकित व्हावं असे बदल जिरे तुमच्या एकूणच शरीरयष्टी आणि आरोग्यात घडवून आणतील. जिऱ्यात असंख्य औषधी (medicinal qualities) गुण आहेत. इथं तुम्हाला कळतील जिऱ्याचं सेवन करण्याची 5 कमालीची खास कारणं अँटीऑक्सीडंट्सनं (antioxidants) भरपूर थायमोक्विनोन हे चांगल्या रसायनांनी युक्त असलेलं अँटीऑक्सीडंट जिऱ्यामध्ये असतं. या अँटीऑक्सीडंटमध्ये दाहविरोधी गुणधर्म असतात. हा जिऱ्यातील एक सक्रिय घटक आहे. यामुळेच जिरा वजन घटवण्यासाठीचा एक उत्कृष्ट पदार्थ बनतो. पचनक्रियेला चालना देतो - जिरा हा पदार्थ पचनक्रियेला चालना देण्यासाठी ओळखला जातो. पाचकरसांचं स्रवणं वाढवण्यास आणि पचनक्रियेला वाढवण्यात जिरे मदत करतात. तुमची अनावश्यक चरबी कमी करण्याच्या प्रक्रियेत तुम्ही नक्कीच जिऱ्यांवर विसंबू शकता. कारण जिऱ्यांमुळे तुमच्या हृद्याचीही काळजी घेतली जाते. रक्तातील कोलेस्ट्रॉल जिऱ्यांमुळं कमी होतं. प्रतिकारशक्ती वाढते जिऱ्यात मोठ्या प्रमाणात की जीवनसत्व असत. शिवाय हेल्दी फॅट्स, प्रथिनं असतात. जिऱ्यामुळे मधुमेहसुद्धा आटोक्यात येण्यास मदत होते. प्रथिनं हा शरीरातील महत्त्वाचा घटक आहे. तुम्ही नकोसं वजन घटवत असताना शरीरात प्रथिनांची कमतरता होणार नाही याची काळजी प्रथिनं घेतात. लोहाचा (iron) स्रोत रक्ताची कमी अर्थात ऍनिमिया असेल तर जिरे नक्की खावेत. जिरे तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनचा समतोल राखण्यास मदत करतात. लोहामुळं रक्तात ऑक्सिजनचं वाहन नीटपणे होता. जिऱ्यातून तुम्हाला ब जीवनसत्व आणि इतर आवश्यक खनिजं मिळतात. त्यामुळे वजन घटवण्याचा प्रक्रियेदरम्यान येणारा थकवा किंवा गाळून गेल्यासारखं वाटणं यांना रोखता येतं. जिऱ्याचं मस्त सरबत बनवूनही तुम्ही घोट-घोट आस्वाद घेऊ शकता. इन्सोम्निया अर्थात निद्रानाश रोखतो - जिरा हा पदार्थ निद्रानाशाला आळा घालतो. जिऱ्याचा सुगंध आणि टेक्श्चर मातीसारखं असत. तुमच्या आहारात जिरे समाविष्ट केलेत तर झोपेचा (sleep) दर्जा नक्की सुधारतो. जिरे शांत भावनेला चालना देतात. शिवाय चिंताग्रस्तता, ताण यांना आळा घालतात. त्यातून शांत झोप लागते. शरीराला झोप आणि विश्रांती नीट मिळाली तरच वजन घटणेही योग्य प्रकारे होते. मग, करताय ना तुमच्या आहारात जिऱ्यांचा समावेश?
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Weight, Weight loss tips

    पुढील बातम्या