• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Diwali 2021 : तुमच्या खिशात बॉम्ब तर नाही ना? फटाके फोडताना नवं टेंशन

Diwali 2021 : तुमच्या खिशात बॉम्ब तर नाही ना? फटाके फोडताना नवं टेंशन

दिवाळीतही कोरोनाची टांगती तलवार कायम आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर :  फटाके फोडताना अपघात टाळण्यासाठी अधिक सतर्क राहणे गरजेचे असतात. दिवाळीदरम्यान (Diwali 2021) अनेकदा फटाक्यांमुळे अपघात झाल्याच्या अनेक घटना आपण पाहतो. त्यातही लहान मुलं फटाके फोडताना त्याच्या आजूबाजूला राहणं अत्यंत गरजेचं आहे. फटाक्यांपासून तसंही आपण अधिक सावध असायला हवंच. गेल्या दोन वर्षांपासून सर्वांवरच कोरोनाची (CoronaVirus) टांगती तलवार आहे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यााठी नियमितपणे सॅनिटायझरचा वापर केला जातो. मात्र हे सॅनिटायजर कोरोनापासून बचाव करीत असलं तरी दिवाळीत हा मोठा बॉम्ब ठरू शकतो. हे ही वाचा-दिवाळीच्या पहिल्या दिवशी Good News, 'या' सिंगल लसीचा डोस करतोय Coronaचा धोबीपछाड सॅनिटायजरमुळे धोका हँड सॅनिटायजरमध्ये (Sanitizer use) कमीत कमी 60 टक्के अल्‍कोहल असतं. अशात तो अत्यंत ज्वलनशील पदार्थ असतो. म्हणजे यात जलद गतीने आग पसरू शकते. त्यामुळे डॉक्टरांकडूनही वारंवार याचा सल्ला दिला जातो. आगीच्या जवळ सॅनिटायजर ठेवू नये. सॅनिटायजरमुळे भडकली आग गेल्यावर्षी हरियाणातील रेवाडीमधून असाच एक प्रकार समोर आला होता. येथे एका व्यक्तीने चुकून हँड सॅनिटायजर आपल्या कपड्यांवर लावलं. आणि ती व्यक्ती स्वयंपाक घरात गॅस जवळ जाऊन उभी राहिली. यामुळे त्याच्या कपड्यांना आग लागली होती. त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी सांगितलं की, व्यक्ती 35 टक्के भाजली आहे. सध्या अनेकजणं खिशात आणि पर्समध्ये सॅनिटायझरची बाटली घेऊन फिरतात. मात्र फटाक्याची एखादी ठिखणी आपल्या कपड्यावर किंवा रस्त्याने जाताना बॅगवर उडाली तर मोठा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे दिवाळीच्या दिवशात शक्यतो सॅनिटायझर सोबत बाळगू नका आणि सतत हाताला लावू देखील नका.
  Published by:Meenal Gangurde
  First published: