
टीव्ही सीरिअल एफआयआरमधील इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला म्हणजे अभिनेत्री कविता कौशिक सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@ikavitakaushik)

कविता कौशिकने नुकतेच आपले काही फोटो सोशल मीडियावर टाकले, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि ते पाहून लोक थक्क झालेत.फक्त कविताचे चाहतेच नव्हे तर दिग्दर्शक अनुराग कश्यम यांनीदेखील हे फोटो पाहून तोंडात बोट घातलं. (फोटो सौजन्य - ट्विटर/@Iamkavitak)

कविताचे हे फोटो योगाचे आहे. ज्यामध्ये ती एक कठीण असे योगा करताना दिसते आहे. कविताची ही योगा पोझ पाहून अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/@ikavitakaushik)

कविता कौशिकने अभिनय क्षेत्रात करिअरची सुरुवात एकता कपूरचा शो 'कुटुंब'पासून केली होती. यानंतर ती 'कहानी घर घर की', 'कुमकुम' और 'पिया का घर में नजर' यामध्ये दिसून आली होती. मात्र तिची 'एफआईआर' मालिकेतील भूमिका सर्वांना आवडली. तेव्हापासून घराघरात तिला ओळखलं जाऊ लागलं. (फोटो सौजन्य - ट्विटर/@Iamkavitak)




