
आपण प्रत्येकाने रिल लाइफमध्ये स्पायडरमॅन पाहिला आहे. मात्र रिअल लाइफमधील या स्पाइडरबॉयला तुम्ही भेटलात का? यूपीतल्या कानपूरमध्ये राहणारा अवघ्या 7 वर्षांचा हा मुलगा स्पायडर मॅनप्रमाणे भिंतीवर पटापट चढतो आणि उतरतोदेखील.

यसार्थ सिंह असं या मुलाचं नाव आहे. यसार्थ फक्त सात वर्षांचा आहे. तिसरी इयत्तेत तो शिकतो. यसार्थ कोणत्याही आधाराशिवाय भिंतीवर स्पाडर मॅनप्रमाणेच वेगाने चढतो. त्याचं हे कौशल्य पाहून प्रत्येक जण हैराण होतो आहे.

सात वर्षांचा यसार्थ पालीप्रमाणे हाताचे पंजे आणि पायाचे तळवे भिंतीला टेकवतो आणि अगदी सहजरित्या भिंतीवर चढतो.

यसार्थने सांगिलतं, त्याने टीव्हीवर स्पायडर मॅनला भिंतीवर चढताना पाहिलं आणि माझ्याही मनात त्याच्यासारखं करावं असा विचार आला.

आपल्या मुलाचं हे कौशल्य पाहून यसार्थच्या पालकांना त्याचं कौतुक वाटतं, मात्र त्याला दुखापत तर होणार नाही ना याची भीतीही त्यांच्या मनात असते. यसार्थची आई गरिमा सिंह म्हणाली,




