मुंबई, 03 जानेवारी : तुम्ही जिओचं ((Jio) सिमकार्ड वापरत आहात आणि स्वस्त आणि जास्तीत जास्त फायदा देणारा रिचार्ज प्लॅन तुम्हाला हवा असेल तर ही तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. तुमच्या बजेटमध्येच तुम्हाला अधिक फायदा देणारा जिओचा प्लॅन उपलब्ध करून देण्यात आला आहे. 150 रुपयांपेक्षाही कमी किंमतीत तुमच्यासाठी हा प्लॅन उपलब्ध आहे. कॉलिंग (Jio Calling Plan) असो किंवा इंटरनेट डेटा (Jio internet data Plan) रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपल्या ग्राहकांना धमाकेदार प्लॅन ऑफर करत असते. कंपनीचे असे अनेक स्वस्त प्लॅन आहे, जे युझर्सना कमीत कमी किमतीत जास्तीत जास्त फायदा देतात. ग्राहकांच्या सोयीसाठी Reliance Jio कमी किमतीतील रिचार्ज प्लॅनमध्ये फ्री कॉलिंगसारख्या (free calling) सुविधाही देते. अशाच प्लॅनपैकी एक प्लॅन म्हणजे जिओचा 149 रुपयांचा प्लॅन जिओच्या 149 रुपयांच्या प्लॅनचे फायदे प्लॅनची वैधता 24 दिवस आहे. दररोज 1GB डेटा वापरता येईल. म्हणजे 24 दिवसांत 24GB डेटा वापरण्याची संधी दररोज 100 SMS करू शकता. जिओ टू जिओ आणि इतर नेटवर्कसाठीही फ्री कॉलिंग या सुविधांसह या प्लॅनमध्ये तुम्हाला जिओ सिनेमा (JioCinema), जिओ सावन (JioSaavn) सारखे जिओ अॅप्सही मोफत वापरता येतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.