बंगळुरू, 17 ऑगस्ट : उद्या गोकुळाष्टमी आहे. बाळकृष्णाच्या जन्माची तयारी सर्वत्र सुरू आहे. बाळकृष्णाच्या पाळण्यापासून ते त्याच्या नैवेद्यापर्यंत सर्वाची लगबग सुरू आहे. वेगळ्या पद्धतीने गोकुळाष्टमी साजरी करण्याचाही तुमचा प्रयत्न असेल. यामध्ये हार्ट पेशंट असलेल्या आणि वयाची साठी ओलांडलेल्या आजीही मागे नाहीत. हार्ट पेशंट अजूनही या जिगरबाज आजींनी बाळकृष्णासाठी मोठी रिस्क घेतली आहे. त्या असं काही करणार आहेत जे फक्त वाचूनच तुम्हाला मोठा धक्का बसेल. गोकुळाष्टमीच्या दिवशी बाळकृष्णाला काही विशिष्ट पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. कर्नाटकातील वयाच्या साठीत असलेल्या सौ. राव यासुद्धा याच नैवेद्याची तयारी करत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी जन्माष्टमीला तब्बल 70 पदार्थ तयार केले होते. यावर्षी त्यांना आपलाच हा रेकॉर्ड मोडायचा आहे. शिवाय यावर्षी देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन झाला. त्यामुळे यावर्षी जन्माष्टमीला तब्बल 75 डिशेस बनवणार आहेत. हे वाचा - Janmashtami 2022 : जन्माष्टमीला तुमच्या चिमुकल्यांना असे बनवा कृष्ण, पाहणाऱ्याला पडेल भूरळ राव या हार्ट पेशंट आहेत. त्यांच्यावर सध्या उपचारही सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करणारे कार्डिओलॉजिस्ट डॉ. पी कामथ यांनीच सौ. राव यांच्याबाबत आपल्या सोशल मीडियावर माहिती दिली आहे. ट्विटर अकाऊंटवर त्यांनी ही पोस्ट केली आहे.
Tomorrow is #Janmashtami and Mrs Rao will be eager to better her record of 70 dishes she prepared last year. A person in her mid-sixties who has been under my treatment wants to prepare 75 dishes this time to commemorate #AzadiKaAmritMahotsav. My best wishes to her and the family pic.twitter.com/xe0HQfvC1r
— Dr P Kamath (@cardio73) August 17, 2022
सौ. राव या नेमके कोणकोणते पदार्थ बनवणार आहेत याची यादीही त्यांनी ट्विटरवर पोस्ट केली. ही यादी पाहूनच आपल्याला धक्का बसतो. वाचता वाचता धाप लागते. आपल्याला वाचतानाही दम लागला इतक्या डिश या हार्ट पेशंट असलेल्या आजी तयार करणार आहेत. हे वाचा - Krishna Janmashtami 2022 : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा शुभ मुहूर्त कोणता? जन्माष्टमीची पूजा आणि व्रत कसे करावे? ही पोस्ट पाहून या आजींचं कौतुक केलं जातं आहे. त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहे. कृष्णाच्या कृपेने, आशीर्वादाने या आजी हे नक्की करून दाखवतील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला आहे. तुम्हीही या आजींसाठी तुमच्या शुभेच्छा आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समधून नक्की द्या.