Jaylalitha Love Story : जेव्हा MGR वर रागावून जयललिता दुसऱ्या सुपरस्टारकडे गेल्या होत्या

Jaylalitha Love Story : जेव्हा MGR वर रागावून जयललिता दुसऱ्या सुपरस्टारकडे गेल्या होत्या

तमिळनाडूच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एकेकाळी केंद्रस्थान मिळवणाऱ्या जे. जयललिता यांचा 24 फेब्रुवारी हा जन्मदिवस.

  • Share this:

मुंबई, 05 मार्च : तमिळनाडूच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात एकेकाळी केंद्रस्थान मिळवणाऱ्या जे. जयललिता यांचा 24 फेब्रुवारी हा जन्मदिवस. मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचलेल्या जयललितांनी सिने अभिनेत्री म्हणून खूप लहान वयात करिअरला सुरुवात केली होती आणि व्यावसायिक तसंच वैयक्तिक आयुष्यातही खूप संघर्ष केला हे सर्वज्ञात आहे. जयललिता आपले मेंटाॅर एम जी रामचंद्रन (MGR) यांच्याच प्रेमात होत्या, असं म्हणतात. शेवटपर्यंत त्यांनी उघडपणे हे नातं मान्य केलं नाही. पण  एमजीआर आणि जयललिता यांचे संबंध प्रेमिकांपेक्षा जास्त होते.

एकदा त्या त्यांचे कथित प्रेमी एमजी रामचंद्रन यांच्यावर रागावल्या. इतक्या की त्यांना सोडून त्या तेलगू सिनेमाचे सुपरस्टार शोभनबाबूंकडे पोचल्या. जयललिता शोभनच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यांच्यावर जीव ओवाळून टाकत होत्या. विवाहित शोभन नकार देत होते. शेवटी त्यांना एमजी रामचंद्रन यांच्याकडे परतायला मजबूर केलं. शोभन आकर्षक होते, त्यांचे डोळे आकर्षक होते, व्यक्तिमत्त्व मोहक होतं.

जयललिता तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या. 5 डिसेंबर 2016मध्ये त्यांचं निधन झालं. जयललिता यांना एमजी रामचंद्रन यांचा उत्तराधिकारी मानलं जायचं. एमजीआर आणि जयललिता यांचे संबंध प्रेमिकांपेक्षा जास्त होते. जयललिता यांच्या आयुष्यात आलेल्या पुरुषांनी कधी जयललिता यांना नात्यात पूर्णत्व दिलं नाही. त्यामुळे नेहमीच त्यांना असुरक्षित वाटायचं.

अभिनेत्री बनायचं नव्हतं

जयललिता यांना सिनेमात कधी काम करायचं नव्हतं.  त्यांना शिक्षण पूर्ण करायचं होतं. त्या हुशार होत्या. त्यांना वकील बनायचं होतं. पण परिस्थिती अशी काही झाली की त्यांना कॅमेऱ्यासमोर उभं राहावं लागलं. खूप रडल्या त्या. त्यांना काय मिळालं नाही? प्रसिद्धी, पैसा, ग्लॅमर, सत्ता सर्व काही. पण आलेल्या वाईट अनुभवांमुळे त्यांना निष्ठुर बनायला भाग पाडलं.

प्रेमींनी दिली असुरक्षा

जयललिताचे खूप वर्ष सहकारी असलेले वालमपुरी जैन यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं, सुरुवातीला वडिलांची वागणूक चांगली नव्हती. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात आलेले एमजी रामचंद्रन आणि शोभन बाबू हेही तसे फसवेच होते. सिमी ग्रेवालल दिलेल्या एका मुलाखतीत जयललिता म्हणाल्या होत्या, वडील दारुडे होते. प्रचंड पैसे खर्च करायचे. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंब कंगाल झालं. आई संध्याला सिनेमांत छोट्या भूमिका कराव्या लागल्या.

एमजीआरसोबतच्या संबंधांत चढउतार

जयललिता सिनेमांत आल्या तेव्हा एमजी रामचंद्रन दक्षिण भारतीय सिनेमांत मोठे स्टार होते. ते जयललितांच्या आयुष्यातही कळत नकळत आले. दोघांनी मिळून 28 हिट सिनेमे दिले. एमजी तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. ते जयललितांना त्यांच्या इशाऱ्यावर नाचवायचे. त्या पत्नीप्रमाणे त्यांचं ऐकत. त्यांचे संबंध जगजाहीर होते. पण या नात्याला कधी दर्जा मिळाला नाही.

एमजीआरना सोडलं

जयललिता दाक्षिणात्य सिनेमांची सुपरस्टार बनली. तेव्हा एमजीआर यांनी दुसऱ्या अभिनेत्रींबरोबर काम करणं सुरू केलं. दोघांचे मतभेद वाढलेले. याचा परिणाम हे नातं तुटलं. जयललिता आणि शोभन लिव्ह इनमध्ये राहात होते. असं म्हणतात, त्यांनी गुप्त लग्नही केलं होतं. एमजी दोघांवर नजर ठेवून होते. त्यांचं नातं कसं तुटेल यासाठी प्रयत्न करत होते.

पार्टीत झाली होती शोभन यांची भेट

जयललिता यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुणाला कधी सांगितलं नाही. त्यांची भेट एका फिल्मी पार्टीत झाली. अगोदर मैत्री आणि नंतर जया पूर्ण त्यांच्या मोहपाशात अडकल्या होत्या. पण दोघांनी सिनेमात काम केलं नाही.

शोभन यांनी लग्नाचा प्रस्ताव नाकारला

दाक्षिणात्य वर्तमानपत्रानुसार जयललिता शोभन यांच्याकडे सारखा लग्नाचा लकडा लावायच्या. पण शोभन लग्न झालेले आणि एका मुलाचे वडील होते. त्यांनी रागावून आणि वैतागून हे संबंध तोडले. जयललिता एकट्या पडल्या. तेव्हा त्यांना सावरायला पोचले एमजीआर.

जयललिता यांना मुलगी आहे?

बंगलुरूच्या एका मुलीनं आपण जयललिता आणि शोभन यांची मुलगी असल्याचा दावा केला होता. असं म्हणतात, त्या मुलीला जयललिता यांच्या दूरच्या बहिणीनं मोठं केलं. जयललितांचं निधन झाल्यानंतर तिनं डीएनए टेस्टची मागणी केली होती. पण कोर्टानं ती नाकारली.

First published: February 24, 2021, 3:44 PM IST

ताज्या बातम्या