मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कान टोचण्याचे परिणाम जाणून घेतल्यानंतर तुम्हीही घ्याल 'हा' निर्णय!

कान टोचण्याचे परिणाम जाणून घेतल्यानंतर तुम्हीही घ्याल 'हा' निर्णय!

आजकाल स्त्रीयांप्रमाणे पुरुषही कान टोचताना पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षात बॉडी पिअर्सिंगची (Body Piercing) क्रेझ वाढली आहे. पण, याचे परिणाम तुम्हाला माहित आहे का?

आजकाल स्त्रीयांप्रमाणे पुरुषही कान टोचताना पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षात बॉडी पिअर्सिंगची (Body Piercing) क्रेझ वाढली आहे. पण, याचे परिणाम तुम्हाला माहित आहे का?

आजकाल स्त्रीयांप्रमाणे पुरुषही कान टोचताना पाहायला मिळतात. गेल्या काही वर्षात बॉडी पिअर्सिंगची (Body Piercing) क्रेझ वाढली आहे. पण, याचे परिणाम तुम्हाला माहित आहे का?

मुंबई, 7 जानेवारी : इतिहासातले जुने संदर्भ चाळून पाहिल्यास किंवा एखादा ऐतिहासिक सिनेमा वा मालिका पाहिल्यास तुम्हाला दिसून येईल, की पूर्वीच्या काळी पुरुष कानात भिकबाळी घालत असत. कान टोचण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. मुलगा असो वा मुलगी, आपल्याकडे बाळाचे कान सोनाराकडून टोचून घेतले जातात. कान टोचल्यावर त्याचे चांगले-वाईट होणारे परिणाम माहिती आहे का?

बाळाचे कान टोचणं हा आपल्याकडे असलेल्या 16 संस्कारांपैकी एक आहे. मुलींच्या बाबतीत कान टोचणं ही फारच सामान्य गोष्ट आहे; पण भारतातल्या प्रत्येक धर्मात कान टोचण्याची परंपरा नाही; पण आजकाल फॅशनच्या नावावर मुला-मुलींमध्ये बॉडी पिअर्सिंगची (Body Piercing) क्रेझ वाढली आहे. फॅशनचं फॅड असलं तरी हे आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे की नाही, हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. कारण याचा परिणाम थेट तुमच्या शरीरावर होतो.

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, की कान टोचण्याचा संस्कार आपल्यासाठी फारच आरोग्यदायी आहे. शरीरासाठी याचे अनेक फायदे असल्याचं दिसून येतं. त्यामुळे मेंदूकडे होणारं रक्ताभिसरण (Blood Circulation) सुरळीत होऊन बुद्धीला चालना मिळते, असं आढळतं. त्यामुळे पूर्वापारपासून मुलांचं शिक्षण सुरू होण्याआधी बुद्धी तल्लख होण्यासाठी कान टोचले जात असत.

यंदाही लग्नाचा धुमधडाका, डिसेंबरपर्यंत तब्बल 94 शुभ मुहूर्त; वाचा संपूर्ण यादी

आजकाल बऱ्याच जोडप्यांमध्ये वंध्यत्वाची समस्या (Infertility) आढळते. पुरुषांमध्ये चांगल्या प्रजनन क्षमतेसाठी कान टोचणं चांगलं असल्याचं आढळतं. त्वचा सुंदर दिसण्यासाठी आपण दैनंदिन जीवनात अनेक उपाय करतो; पण कान टोचण्यानेही चेहऱ्यावरचा ग्लो (Glowing Skin) कायम राहतो, असं म्हटलं जातं.

कान टोचणं हे जसं सौंदर्यदायी आहे, त्याप्रमाणेच कान टोचल्याने अर्धांगवायूही (Paralysis) होत नाही. पूर्वी आपल्याकडे राजे-महाराजे कानात भिकबाळी किंवा कर्णफुले घालताना दिसून येत असत. आता ही परंपरा सगळीकडेच पाळली जाताना दिसत नाही. लहानपणी बाळाचे कान टोचले जातात; पण भविष्यात मुलं कानात काहीही घालताना आढळून येत नाहीत. मुली मात्र लहानपणापासून कानातले घालतात. सध्या आपल्याकडे फॅशन म्हणून किंवा मराठी अभिमान म्हणून अनेक मुलं कान टोचून आवर्जून भिकबाळी घालतात.

Harmful Food for Lung : फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी घातक आहेत या 5 गोष्टी

कान टोचणं असो वा इतर कोणताही संस्कार असो, आपल्या पूर्वजांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त असते, हे तितकंच खरं आहे. त्याचा प्रत्यय आजच्या तांत्रिक युगातही वेळोवेळी येत असतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य मान्यता आणि माहितीवर आधारित आहे. NEWS18 लोकमत याची पुष्टी करत नाही.)

First published:

Tags: Beauty tips, Ear