जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Monkeypox एड्ससारखा लैंगिक आजार आहे? संसर्गजन्य आजाराच्या तज्ज्ञांनी काय सांगितलं वाचा

Monkeypox एड्ससारखा लैंगिक आजार आहे? संसर्गजन्य आजाराच्या तज्ज्ञांनी काय सांगितलं वाचा

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Shutterstock)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Shutterstock)

अमेरिकेत मंकीपॉक्सचे सर्वाधिक रुग्ण है समलैंगिक पुरुष आहेत. त्यामुळे हा एड्ससारखा पसरणारा लैंगिक आजार आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 20 जुलै : भारतात कोरोना पुन्हा थैमान घालत असतानाच जगातील 76 देशांमध्ये दहशत पसरवणाऱ्या मंकीपॉक्सनेही शिरकाव केला आहे. केरळमध्ये मंकीपॉक्सचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा आजार नेमका काय आहे? तो कसा पसरतो? त्याची लक्षणं काय? तो किती खतरनाक आहे? त्याचा सर्वाधिक धोका कुणाला? असे बरेच प्रश्न आता लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत. अमेरिकेत या आजाराने संक्रमित होणारे सर्वाधिक रुग्ण है समलैंगिक पुरुष आहेत. त्यामुळे हा एड्ससारखा पसरणारा लैंगिक आजार आहे का? असा प्रश्नही उपस्थित होतो आहे? याबाबत तज्ज्ञांनी उत्तर दिलं आहे. मंकीपॉक्स व्हायरस एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो. म्हणजे एकमेकांच्या संपर्कातून हा आजार पसरतो. पण तो लैंगिक संबंधातूनही पसरू शकतो का? तर याचं उत्तर आहे नाही.  मुंबईच्या नानावटी रुग्णालयातील जनरल फिजिशिन आणि संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ डॉ. हेमलता अरोरा यांनी मंकीपॉक्स हा लैंगिक आजार नसल्याचं म्हटलं आहे. याबाबत त्यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. हे वाचा -  पोटदुखी झाली आणि एका मागोमाग एक 6 अवयव झाले खराब; विशीतच तरुणाचा जीवनमृत्यूशी संघर्ष टीव्ही 9 शी बोलताना डॉ. अरोरा यांनी सांगितलं, मंकीपॉक्स एक लैंगिक आजार नाही. तो कांजण्यांसारखा आजार आहे, जो एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने पसरतो. त्याप्रमाणेच एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला याची लागण होऊ शकतो. जर या आजाराने संक्रमित व्यक्तीच्या शेजारी तुम्ही बराच वेळ बसलात आणि त्या व्यक्तीला स्पर्श केला किंवा त्याने वापरलेले कपडे, त्याच्या वस्तू वापरल्या तर तुम्हाला हा आजार होऊ शकतो. पण कोरोनाइतका मंकीपॉक्स संसर्गजन्य नाही. फ्लूसारखे आधार अधिक संसर्गजन्य असतात कारण ते हवा आणि ड्रॉप्लेट्समार्फत पसरतात. मंकीपॉक्स शरीरावर आलेल्या फोडांमधील तरल पदार्थामार्फत पसरतो. जेव्हा कोणती व्यक्ती त्याला स्पर्श करते तेव्हा त्या व्यक्तीला हा आजार होता. त्यामुळे संक्रमित व्यक्तीची देखभाल कऱणाऱ्याला याचा धोका अधिक असतो. संक्रमित व्यक्तीच्या थेट संपर्कात नसल्यास या आजाराचा धोका कमी असतो. हे वाचा -  Marburg virus: वटवाघळांपासून आणखी एक घातक विषाणू माणसांत; ही लक्षणे दिसल्यास तत्काळ डॉक्टरांना गाठा हा स्पर्शाने होणारा आजार आहे. पुरुषांचा पुरुषांशी असलेल्या लैंगिक संबंधाचा याच्याशी काहीच संबंध नाही. म्हणजे महिला आणि लहान मुलांनाही हा आजार होऊ शकतो. ज्यांनी कांजण्याची लस घेतली आहे, त्यांना हा आजार होण्याचा धोका नाही. पण 1980 नंतर जन्माला आलेले लोक ज्यांनी कांजण्यांची लस घेतली नाही, त्यांना याचा धोका जास्त आहे.  जर याला लैंगिक संक्रमित आजार म्हटलं तर लहान मुलांबाबत लोक काळजी घेणार नाही. एसटीडी आजार असल्यान तो लहान मुलांना होणार नाही, असं लोकांना वाटेल. मुलं एकमेकांसोबत खेळतात, सर्वांच्या संपर्कात येतात. त्यामुळे संक्रमित व्यक्तीमार्फत ते या आजाराचे शिकार होऊ शकतात. म्हणून या आजाराला एसटीडी घोषित करणं चुकीचं ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात