मुंबई, 21 डिसेंबर : अशुद्ध पाणी ( Unclean water) प्यायल्याने अनेक आजार होतात. त्यामुळे पाणी शुद्ध (Pure water) प्यावं, असा सल्ला डॉक्टर देतात. वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी अनेक घरी (RO Uses In Home) रिव्हर्स ऑस्मॅसिस (आरओ) करणारं म्हणजे जलशुद्धीकरण यंत्र लावल्याचं पाहायला मिळतं. या तंत्रज्ञानाद्वारे पाण्यामधले अशुद्ध घटक, तसेच रोगकारक घटक वेगळे केले जातात. पाणी शुद्ध करण्यासाठी आरओचा वापर केला जातो; पण आरओमुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. तुमच्या घरी आरओ बसवलेले असेल, तर हे खराब झालेलं पाणी तुम्ही पुन्हा वापरात आणू शकता. आरओचा वापर कधी करावा आणि त्यातून निघणाऱ्या खराब पाण्याचा पुनर्वापर कसा करावा, याबाबत जाणून घेऊ या.
'आरओ' अर्थात 'रिव्हर्स ऑस्मॉसिस' (Reverse Osmosis) होय. आरओ या प्रक्रियेद्वारे पाणी स्वच्छ केलं जातं. त्यातले क्षार बाहेर टाकले जातात. आरओचा वापर करून पाणी पिण्यायोग्य केलं जातं. आरओ फिल्टरमधून डोळ्यांना न दिसणारे लहान कणदेखील वेगळे केले जातात.
शेजारी किंवा मित्रांचं पाहून अनेक जण आरओ फिल्टर खरेदी करतात. आपल्याला खरंच त्याची गरज आहे का, यावर विचार करणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी स्वच्छ पाणी असतं. क्षारयुक्त पाणी नसलेल्या भागांमध्ये आरओ फिल्टरची गरज नसते. पाण्यामध्ये एकूण विरघळलेल्या घन पदार्थांचं (टीडीएस) प्रमाण 500 मिलीग्रॅम प्रति लिटरपेक्षा कमी असेल तर ते पाणी थेट वापरता येतं.
आरओमधून स्वच्छ पाणी मिळतं; पण पाण्याचा अपव्यय होतो. आरओ फिल्टर जेव्हा एक लिटर पाणी स्वच्छ करतो, तेव्हा या प्रक्रियेत 3-4 लिटर पाणी वाया जातं, असं अनेक अहवालांमधून समोर आले आहे. म्हणजेच 4-5 लिटर पाणी वाया गेल्यानंतर एक लिटर स्वच्छ पाणी मिळतं. यातून किती पाणी स्वच्छ होतं आणि त्यातून किती पाणी वाया जातं, याचा आंदाज तुम्ही तुमच्या घरातल्या पाण्याचा वापर आणि घरातल्या सदस्यांच्या संख्येवरून लावू शकता. एकाच घरात दररोज शेकडो लिटर पाण्याचा अपव्यय होऊ शकतो. म्हणजेच, संपूर्ण देशातून किती पाणी वाया जात असेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे.
आरओ फिल्टरमधून बाहेर पडलेल्या पाण्याचा पिण्यासाठी नाही, तर घरातील इतर कामांसाठी (Use RO water in Daily use) तुम्ही वापर करू शकता. गाडी धुण्यासाठी, टॉयलेटमध्ये फ्लशिंगसाठी, जमीनीवर सडा टाकण्यासाठी, झाडांना घालण्यासाठी, तसंच उन्हाळ्यात कूलरमध्ये घालण्यासाठी तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता. याशिवाय घरातली फरशी पुसण्यासाठी तुम्ही या पाण्याचा वापर करू शकता. या पाण्यात अर्धं शुद्ध पाणी मिसळावं. कारण, आरओ फिल्टरमधून बाहेर आलेल्या पाण्यामुळे फरशीवर डाग पडतात. तसंच कपडे धुताना सुरुवातीला या पाण्याचा वापर करू शकता. त्यानंतर चांगल्या पाण्यात कपडे पुन्हा एकदा पिळून घ्यावेत.
आरओ फिल्टर वापरणं पर्यावरण आणि आरोग्यासाठी हानिकारक (RO Harmful) आहे. आरओ फिल्टरमध्ये आरोग्यासाठी आवश्यक असलेली अनेक महत्त्वाची खनिजंही पाण्यापासून वेगळी होतात. यासोबतच पाण्याचा अपव्ययही सातत्याने होतो. त्यामुळे तुम्हाला आवश्यकता असेल तर आरओ फिल्टरचा वापर करावा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.