• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • शेळीचं दूध, पपईच्या पानाने बरा होतो Dengue रुग्ण; काय सांगतात तज्ज्ञ डॉक्टर पाहा

शेळीचं दूध, पपईच्या पानाने बरा होतो Dengue रुग्ण; काय सांगतात तज्ज्ञ डॉक्टर पाहा

डेंग्यूच्या (Dengue) वाढत्या प्रकरणांमुळे शेळीचं दूध (Goat milk) आणि पपईच्या पानांची (Papaya Leaves) मागणी वाढली आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : डेंग्यूच्या (Dengue) रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं पुन्हा एकदा शेळीच्या दुधाला (Goat Milk) मागणी वाढताना दिसत आहे. सध्या बाजारात शेळीच्या दुधाची 4000 रुपये लीटर या दरानं विक्री होत आहे  (Goat Milk for dengue). शेळीच्या दुधासोबतच डेंग्यूचे रुग्ण पपईच्या पानांचं (Papaya Leaves for dengue) सेवन देखील मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. त्यामुळे शेळीच्या दुधासोबत पपईच्या पानांचा दरही कमालीचा वाढला आहे. या पार्श्वभूमीवर शेळीचं दूध आणि पपईची पानं डेंग्यूच्या आजारावर उपचार म्हणून सेवन करणं खरोखरच उपयुक्त आहे की नाही, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. शेळीचं दूध आणि पपईची पानं यांचा उपचारासाठी होणारा वापर कितपत योग्य आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही दिल्ली-एनसीआरमधील (Delhi-NCR) 5 मोठ्या हॉस्पिटलच्या 5 प्रतिष्ठित डॉक्टरांशी संवाद साधला. यात अॅलोपॅथी, न्युट्रिशनिस्ट, नॅचरोपॅथी सह पेडिअॅट्रिक तज्ज्ञांचा समावेश होता. या संवादात सर्व डॉक्टरांनी एकमतानं काही गोष्टी स्पष्ट केल्या जाणून घेऊया त्याविषयी. दिल्लीतील वसंत कुंज फोर्टिस हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन डिपार्टमेंटमधील सीनिअर कन्सलटंट डॉ. मनोज शर्मा म्हणाले, "यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही. खरंतर डेंग्यूसह सर्व विषाणूजन्य रोग (Viral Disease) हे स्वयंनियंत्रित असतात. स्वयंनियंत्रित म्हणजे ते एका विशिष्ट कालावधीपुरतेच असतात. डेंग्यूमध्ये शरीराचा इम्युनल प्रतिसाद बघता, पहिल्या टप्प्यात प्लेटलेट्स (Platelets) कमी होत जातात आणि नंतर प्लेटलेट्सचं प्रमाण वाढत जातं. मात्र याचं श्रेय सध्या पपईची पानं किंवा शेळीच्या दुधाला दिलं जात आहे. परंतु, आपल्या शरीराची स्वतंत्र अशी प्रतिसाद यंत्रणा असते. त्यामुळे प्लेटलेट्सचे प्रमाण आपोआप वाढत असतं. यात पपईची पानं किंवा शेळीच्या दुधाचा काहीही सहभाग नसतो" हे वाचा - Explainer : डेंग्यू म्हणजे काय?, कसा होतो प्रसार, काय आहेत लक्षणे आणि उपचार? वाचा सविस्तर दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे इंटरनल मेडिसीन विभागाचे सीनिअर कन्सलटंट डॉ. तरूण साहनी यांनी सांगितलं की, "डेंग्यूच्या साथी दरम्यान जे लोक शेळीचं दूध वापरत आहेत त्याला वैद्यकीयदृष्टया एक मिथक म्हणता येईल. यामागे कोणताही वैद्यकीय पुरावा नाही. शेळीच्या दुधामुळं डेंग्यूच्या विषाणूंमध्ये कोणताही बदल होत नाही. वैदयकशास्त्रानुसार उपचार घेणारे 90 ते 95 रुग्ण या आजारातून अगदी सहज बरे होतात. त्यामुळे पपईची पानं किंवा शेळीचं दूध अशा गोष्टींवर विश्वास ठेवणं टाळावं. काहीवेळा शेळीच्या दुधामुळं अॅलर्जी (Allergy) होण्याची शक्यता असते. पोटाचे विकार उद्भवू शकतात. त्यामुळे रुग्णांनी स्वतःच्या मनानं उपचार करणं टाळावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत" दिल्लीच्या पीएसआरआय हॉस्पिटलच्या बालरोगतज्ज्ञ डॉ. सरिता शर्मा यांनी सांगितलं की, "या गोष्टींना कोणताही वैद्यकीय आधार नाही. हे एक मिथक म्हणता येईल. त्यामुळे वैद्यकीयदृष्टया अशा गोष्टी सिद्ध होत नाहीत तोपर्यंत त्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे. शेळीच्या दुधाचा विचार करता, तुम्हाला वाटलं तर तुम्ही तुमच्या मुलांना हे दूध देऊ शकता. परंतु, पपईच्या पानांचं ज्यूस हे चवीला कडू असतं. मोठी माणसं हे ज्यूस कसंही पिऊ शकतील पण लहान मुलांचा विचार करायचा झाला तर या ज्यूसमुळे त्यांना उलटी होऊ शकते. यामुळे फ्लूड लॉस (Fluid Loss) होऊन लहान मुलांची प्रकृती अधिकच गंभीर होऊ शकते. त्यामुळे अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नये. कारण त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही" हे वाचा - Post Dengue Malaria Diet: डेंग्यू आणि मलेरिया पासून बचाव करायचा असेल तर फॉलो करा या 5 गोष्टी! नॅचरोथेरपिस्ट डॉ. ए.के. सक्सेना यांनी दिलेल्या माहितीनुसार, "1500 रुपये लीटर किमतीचं दूध खरेदी करून ते रुग्णाला दिल्यास तो आजारातून बरा होईल असा कोणताही कागदोपत्री पुरावा सध्या उपलब्ध नाही. डेंग्यूच्या रुग्णांना तुम्ही जितके पातळ पदार्थ द्याल तितका रुग्ण लवकर बरा होतो. केवळ शेळीचं दूध दिल्यानं रुग्ण बरा होतो असं नाही". न्युट्रीव्हाईब्सच्या (Nutrivibs) संस्थापिका आणि न्युट्रिशनिस्ट-डायटिशियन डॉ. शिवानी कांडवाल म्हणाल्या, "डेंग्यूच्या काही रुग्णांमध्ये पचनसंस्थेसंबंधी समस्या निर्माण होऊ शकते, त्यात त्यांना शेळीचं दूध देणं चुकीचं ठरू शकतं. त्यामुळे रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं सिलेनियम सप्लिमेंट सुरू करावं. तुमच्या प्लेटलेट्स वेगानं वाढतील, असे कोणतेही घटक शेळीच्या दुधात नाहीत".`.
First published: