मुंबई, 21 एप्रिल : 1 मेपासून 18 पेक्षा जास्त (Corona vaccination to above 18 age) वयाच्या सर्व नागरिकांना कोरोना लस (Corona vaccine) उपलब्ध होणार आहे.आतापर्यंत फक्त केंद्र सरकारला लस (Covid 19 vaccine) पुरवठा करणाऱ्या लस उत्पादक कंपन्यांना आता थेट राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना लस देणार आहेत. केंद्र सरकारच्या प्राधान्य यादीत असलेल्यांचं मोफत लसीकरण केलं जाईल पण इतरांना मात्र कोरोना लशीसाठी पैसे मोजावे (Corona vaccine price) लागतील. आता तुमच्या मनात एक प्रश्न असेल की पैसे देऊन तुम्ही थेट औषध दुकानातून कोरोना लस घेऊ शकता का? लस उत्पादक कंपन्या 50 टक्के कोरोना डोस केंद्र सरकारला देणार आहे आणि 50 टक्के डोस राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना देणार आहे. त्यामुळे राज्य सरकार थेट लस उत्पादक कंपन्यांकडून कोरोना लस घेऊ शकतात. शिवाय केंद्र सरकारमार्फत आतापर्यंत राज्यांना जो कोरोना लशीचा पुरवठा केला जात होतो तो ठरलेल्या निकषांनुसार केला जाईल. हे वाचा - कोरोना लस ठरतेय संजीवनी; लसीकरणाच्या 90 दिवसांनंतर केंद्र सरकारने दिला पुरावा कोरोना लस ही औषध दुकानात मिळणार नाही, असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. कोरोना लसीकरणाबाबत पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. लसीकरण केंद्रांवर लस दिली जाईल आणि यासाठी कोविन संकेतस्थळावर नोंदणी करणं अनिवार्य आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं. कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. ही लस योग्य ठिकाणी आणि तज्ज्ञांच्या देखरेखीत दिली गेली पाहिजे. त्याचे काही दुष्परिणाम जाणवण्याची शक्यता असते. त्यामुळे ही लस औषध दुकानात मिळणार नाही, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं आहे, असं वृत्तही टाइम्स ऑफ इंडिया ने दिलं होतं. भारतात सध्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड आणि हैदराबादच्या भारत बायोटेकची कोवॅक्सिन कोरोना लस दिली जाते आहे. राज्य आणि खासगी रुग्णालयांना लशी देण्याआधी त्याच्या किमती जारी कराव्यात असं सांगितलं. त्यानुसार सीरम इन्स्टिट्यूने कोविशिल्डची किंमत जारी केली आहे. राज्य सरकारला ही लस प्रति डोस 400 रुपये तर खासगी रुग्णालयांना 600 रुपयांना दिली जाणार आहे. हे वाचा - मोदी सरकारला 150 रुपयांना मिळणारी Covishield सामान्यांसाठी 400-600 रुपये का? केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 13 कोटींपेक्षा जास्त कोरोना डोस देण्यात आले आहेत. कोवॅक्सिनचे 1.1 कोटी डोस देण्यात आले आहेत. तर कोविशिल्ड लशीचे 11.6 कोटी डोस देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.