Home /News /lifestyle /

खरंच Capscium ही असते का मेल-फिमेल; ढोबळी मिरचीवरील उंचवटे नेमकं काय सांगतात?

खरंच Capscium ही असते का मेल-फिमेल; ढोबळी मिरचीवरील उंचवटे नेमकं काय सांगतात?

Capsicum bumps related to male-female : ढोबळी मिरचीवरील उंचवट्यांचा संबंध मेल-फिमेलशी जोडला जातो.

मुंबई, 20 मे : आपण दररोज पाहत असलेल्या गोष्टींकडे कधी तरी अगदी निरखून पाहिल्यावर त्यामध्ये वेगळं मजेशीर काहीतरी सापडतं. बटाट्याच्या वेगळ्या आकारात कधी हत्तीच्या सोंडेसारखं काही तरी दिसतं किंवा अजून काही. अर्थात या आकारांमुळे भाज्यांच्या गुणधर्मात काहीच फरक पडत नाही. त्या तितक्याच पौष्टिक आणि रुचकर असतात. असाच एक कायम आपल्या पाहण्यात येणारा प्रकार म्हणजे ढोबळी मिरची (Capscium Shape facts). काही ढोबळी मिरच्यांच्या खालच्या बाजूला तीन उंचवटे असतात, तर काही ढोबळी मिरच्यांच्या खालच्या बाजूला चार उंचवटे असतात. मजेशीर बाब म्हणजे यावरून ढोबळी मिरची नर आहे की मादी (Capsicum Male Or Female) हे ठरवलं जातं; पण शास्त्रीयदृष्ट्या खरंच असा काही भेद असतो का, याबद्दल आपण जाणून घेऊ या. ढोबळी मिरचीला कॅप्सिकम किंवा बेल पेपर (Bell Pepper) असं म्हटलं जातं. ढोबळी मिरचीचं बोटॅनिकल नेम कॅप्सिकम अ‍ॅनम (Capsicum annum) असं आहे आणि हे झाड सोलॅनॅसी फॅमिलीतलं आहे. या मिरचीला सिमला मिरची असंही म्हटलं जातं; मात्र ही मिरची हे भारतीय पीक नाही. हे पीक दक्षिण अमेरिका खंडातलं आहे. सुमारे तीन हजार वर्षांपासून तिची लागवड केली जात असल्याचे संदर्भ सापडतात. जेव्हा ब्रिटिश भारतात आले, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडचं बियाणं भारतात आणलं. त्यांनी सिमला आणि आजूबाजूच्या परिसरातल्या टेकड्यांवर या मिरचीची लागवड केली. तिथे या मिरचीचं चांगलं उत्पादन मिळालं. त्या काळी सिमला ही उन्हाळी राजधानी होती. त्यामुळे या पिकाला सिमला मिरची असं नाव पडलं. हे वाचा - OMG! व्यक्तीने एकट्याने फस्त केले तब्बल 32 हजार Burger, शेवटी झाला असा परिणाम की... पाहा VIDEO तुम्ही पाहिलं असेल काही ढोबळी मिरचीच्या खालच्या बाजूला तीन तर काहींच्या खालच्या बाजूला चार उंचवटे असतात. चार उंचवटं असेल तर ती मादी आणि तीन उंचवटे असेल तर तो नर, असं समजलं जातं. तसंच नर ढोबळी मिरची अधिक स्वादिष्ट असते, असंही म्हटलं जातं. याबद्दल माहिती देणाऱ्या अनेक लिंक इंटरनेटवर आहेत आणि याच्याशी संबंधित सर्च गुगलवर ट्रेंडमध्ये राहिला आहे. परंतु याबाबत झालेल्या संशोधनातून ही बाब खरी नसल्याचं स्पष्ट झालं आहे. टीव्ही 9 हिंदीने यूएस टुडेच्या रिपोर्टचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार कॅलिफोर्निया रिव्हरसाइड विद्यापीठातले (Riverside University California) पोमॉलॉजिस्ट डेव्हिड कार्प (Pomologist David Carp) यांनी यावर संशोधन केलं आहे. त्यांनी सांगितलं, की 'ढोबळी मिरचीमध्ये मेल आणि फीमेल असा भेद करणं चुकीचं आहे. मिरची फुलांपासून तयार होते. ज्या फुलांमध्ये मेल आणि फीमेल हे दोन्ही भाग असतात, त्यावरच फळधारणा होतो. फळाला कोणतंही लिंग नसतं.' हे वाचा - बहुगुणी लसूण भाजी की मसाला? जाणून घ्या याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी आणखी एका संशोधनातूनही हे एक गार्डन मिथ (Garden Myth) असल्याचं म्हटलं आहे. मिरची तयार होणं हे बियाण्यावर आधारित असतं. ढोबळी मिरचीचा आकार कसा असेल, हे विविध प्रकारच्या परिस्थितीवर अवलंबून असतं. त्याचा मेल आणि फीमेल असण्याशी काहीही संबंध नसतो. शास्त्रज्ञांनी सांगितल्यामुळे हीच बाब खरी मानली पाहिजे.
First published:

Tags: Food, Lifestyle, Vegetables

पुढील बातम्या