जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / अनियमित पाळीमुळे स्त्रियांच्या हृदयावर होतो परिणाम? तज्ज्ञांनी सांगितले सत्य

अनियमित पाळीमुळे स्त्रियांच्या हृदयावर होतो परिणाम? तज्ज्ञांनी सांगितले सत्य

सध्याच्या काळात मासिक पाळी अनियमित होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

सध्याच्या काळात मासिक पाळी अनियमित होण्याचं प्रमाण वाढलं आहे.

मासिक पाळीचं चक्र बिघडलं, की विविध त्रास सुरू होतात. सध्याच्या काळात मासिक पाळी अनियमित होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याचे स्त्रियांच्या शरीरावर अनेक परिणाम दिसून येतात.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 29 एप्रिल : अनेक महिलांना मासिक पाळी ही त्यातल्या समस्यांमुळे त्रासदायक वाटते; मात्र स्त्रियांचं एकूण आरोग्य टिकवण्यात महत्त्वाचा वाटा याच गोष्टीचा असतो. त्यामुळे मासिक पाळीचं चक्र बिघडलं, की विविध त्रास सुरू होतात. सध्याच्या काळात मासिक पाळी अनियमित होण्याचं प्रमाण वाढलं आहे. याचे स्त्रियांच्या शरीरावर अनेक परिणाम दिसून येतात. त्यापैकीच एक म्हणजे हृदयरोगाची समस्याही यातून वाढते. बंगळुरूच्या रिचमंड रोडवरच्या फोर्टिस हॉस्पिटलचे संचालक आणि इंटरव्हेन्शनल कार्डिऑलॉजिस्ट डॉ. राजपाल सिंह यांनी त्याबाबत माहिती दिली आहे. अनियमित मासिक पाळीसाठी बरेचदा पीसीओएस (PCOS) आणि पीसीओडी (PCOD) या दोन आजारांना कारणीभूत ठरलं जातं. पॉलिसिस्टिक ओव्हरीयन सिंड्रोम हा चयापचयातल्या समस्येमुळे निर्माण होणारा आजार आहे. यात इन्सुलिनची प्रतिरोधकता आणि अँड्रोजेन या पुरुषी हॉर्मोनचं प्रमाण वाढलेलं असतं. यामुळे पाळी अनियमित येते, वजन वाढतं, लिपिड प्रोफाइल अनियमित असतं, डायबेटीस होऊ शकतो. बैठं काम, नैराश्य आणि उच्च रक्तदाब यांचाही याच्याशी जवळचा संबंध असतो. भारतात मूल जन्माला घालणाऱ्या वयोगटातल्या जवळपास 25-30 टक्के स्त्रिया पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम (PCOS) किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीजने (PCOD) ग्रासलेल्या आहेत. वंध्यत्वाचं हे प्रमुख कारण आहे. चयापचयातल्या या समस्यांमुळे कार्डिओव्हॅस्क्युलर आजार व स्ट्रोकचं प्रमाण जवळपास दुपटीने वाढतं. त्यामुळेच पीसीओएस किंवा पीसीओडी या आजारांवर वेळीच उपचार करणं गरजेचं असतं. जीवनशैलीतले बदल हा सर्वांत सोपा उपचार असतो. वजन कमी करणं, आहारातला समतोल सांभाळणं, नियमित शारीरिक व्यायाम, धूम्रपान बंदी, तज्ज्ञांचा वेळोवेळी सल्ला घेणं पीसीओएसवरच्या उपचारांमध्ये महत्त्वाचं असतं. या रुग्णांमध्ये मेटफॉर्मिन, ACE/ARB Inhibitors, अ‍ॅस्प्रिन आणि स्टॅटिन्स या औषधांचा वापर केल्यानं हृदयावर चांगला परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. अशा रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधिक कार्डिअ‍ॅक किंवा न्यूरॉलॉजिकल लक्षणं दिसून आल्यास अनुभवी इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्टला दाखवावं. पीसीओएस किंवा पीसीओडी हे चयापचयातल्या समस्यांमुळे निर्माण होणारे आजार आहेत. शरीरातलं चयापचयाचं कार्य अनेक गोष्टींनी बाधित होतं. वजनवाढ, व्यायामाचा अभाव, तणाव, हॉर्मोन्सचं असंतुलन या त्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या गोष्टी जीवनशैलीशी निगडित असतात. त्यामुळे आपल्या जीवनशैलीत चांगले बदल करूनही या आजारांपासून सुटका करता येऊ शकते. तज्ज्ञांचा सल्ला घेणंही महत्त्वाचं असतं. कारण अशा आजारांमुळे भविष्यात डायबेटीस किंवा हृदयरोग होण्याची शक्यता वाढते. म्हणूनच अनियमित पाळीच्या समस्येकडे दुर्लक्ष करू नये. त्यावर वेळीच उपचार घ्यावेत.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात