Home /News /lifestyle /

तुम्हाला माहिती आहे का Beer Yoga? Yoga Day च्या निमित्ताने या प्रकाराबाबतही जाणून घ्या

तुम्हाला माहिती आहे का Beer Yoga? Yoga Day च्या निमित्ताने या प्रकाराबाबतही जाणून घ्या

पाश्चिमात्य देशांमध्ये बिअर योगाचाही ट्रेंड आहे.

मुंबई, 21 जून : आज जगभरात योग दिन (International Yoga Day) साजरा केला जातो. योगाचे बरेच प्रकार आहेत. पण तुम्ही कधी बिअर योगाबाबत ऐकलं आहे का? (Beer yoga) तरुणाईला योगाकडं आकर्षित करण्यासाठी पाश्चिमात्य देशांमध्ये योगाचा हा नवा प्रकार अवलंबला जात आहे. तरुणांमध्ये बिअर योगाचाही ट्रेंड आहे. आता हा बिअर योगा नेमका काय आहे पाहुयात. बिअर ही केवळ पिण्यासाठी वापरली जाते, हे सर्वश्रुत आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये बिअर पिणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अशा लोकांसाठी हा बिअर योगा. जे लोक बिअरचे शौकिन आहेत, त्यांच्या आरोग्याचा विचार करून बिअर योगा तयार करण्यात आला आहे. बिअर पिणाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहवं, असा यामागचा उद्देश आहे. मीडिया रिपोर्टनुसार याचा उगम जर्मनीत (Germany) झाला. बर्लिन येथील एमिली आणि जूला नावाच्या दोन योगा प्रशिक्षकांनी मिळून 2016 मध्ये बिअर योगाचा नवीन ट्रेंड सुरू केला. हा ट्रेंड तिथल्या लोकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरला. हळूहळू हा प्रकार अन्य देशांमध्येही लोकप्रिय होऊ लागला. हे वाचा - बाबा रामदेव नाही तर 'या' व्यक्तीने जगभर पोहचवला योग; इतक्या वर्षांचा आहे इतिहास बिअर योगा नावाची एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवर बिअर योगा मजेशीर आहे, परंतु, चेष्टेचा विषय नाही, असं नमूद करण्यात आलं आहे. बिअर योगाची प्रवर्तक एमिलीच्या मते, अनेक देशांमध्ये बिअर योगा केला जातो. बिअर शौकिनांना हा योगा फन आणि फिटनेसचं (Fun And Fitness) अनोखं कॉम्बिनेशन वाटतं. येत्या काळात सर्वाधिक लोकप्रिय फिटनेस ट्रेंडच्या यादीत या योगाचा समावेश होईल. या योगाला थोडीशी बिअर पिऊन सुरुवात केली जाते. याशिवाय योगासनं करताना एक-एक घोट बिअर घेतली जाते. काही आसनं करताना बिअरच्या बाटलीचाही वापर केला जातो. यात लोक बिअरची बाटली आपल्या डोक्यावर ठेवतात किंवा बिअरचा ग्लास बॅलन्स (Balance) करतात. यामुळे योगासनं होतात आणि बॅलन्स केल्यामुळे त्यांची एकाग्रता वाढते. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकी लोकांना बिअर खूप आवडते. त्यामुळे या देशांमध्ये बिअर योगा विशेष लोकप्रिय आहे. हे वाचा - International Yoga Day : इटलीच्या रस्त्यावर योगा दिनाचा उत्साह; नउवारीत केली योगासनं पाहा Photo परंतु, भारतीय संस्कृतीमध्ये (Indian Culture) ही गोष्ट मान्य नाही. योगा हा भारतीय प्राचीन परंपरेतला एक भाग आहे. ऋषी, मुनी शरीर, मन आणि आत्मशुद्धीसाठी योगा करत असत. योगाचे काही विशेष नियम असतात. ऋषी, मुनी या सर्व नियमांचं काटेकोर पालन करत आणि लोकांनादेखील हे नियम पाळण्याची सक्ती करत असत. पण सध्याच्या काळात नव्या ट्रेंड्समुळे योगाचं स्वरुप बिघडलं आहे. सात्त्विक जीवनशैली हा भारतीय योगाचा प्रमुख आधार आहे. याचआधारे भारत योगाचं जगात प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे बिअर योगाचा नवा ट्रेंड हा आपल्या संस्कृतीत बसणारा नाही.
First published:

Tags: Fitness, Health, Lifestyle, Yoga day

पुढील बातम्या