मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

WORK FROM HOME करताना डोळ्यांच्या समस्या; औषधी वनस्पतीने मिळवा आराम

WORK FROM HOME करताना डोळ्यांच्या समस्या; औषधी वनस्पतीने मिळवा आराम

दिवसरात्र कॉम्प्युटर, लॅपटॉपसमोर बसून डोळ्यांच्या अनेक समस्या (eye problem) उद्भवू लागल्या आहेत. त्यावर घरच्या घरी उपचार करू शकता.

दिवसरात्र कॉम्प्युटर, लॅपटॉपसमोर बसून डोळ्यांच्या अनेक समस्या (eye problem) उद्भवू लागल्या आहेत. त्यावर घरच्या घरी उपचार करू शकता.

दिवसरात्र कॉम्प्युटर, लॅपटॉपसमोर बसून डोळ्यांच्या अनेक समस्या (eye problem) उद्भवू लागल्या आहेत. त्यावर घरच्या घरी उपचार करू शकता.

  • myupchar
  • Last Updated :

अनंतमूळ ही एक प्रकारची वेल आहे, जी पंजाब आणि उत्तर भारताच्या जंगलातील टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात आढळते. त्याच्या फांद्या पांढर्‍या आणि सुवासिक असतात. वेलीच्या मुळाशी हेमॅन्स्ट्रॅटल आणि हेमिडेस्मॉल, टॅनिन, शुगरसापानिन्स आणि काही प्रमाणात ग्लायकोसाइड आढळते. अनंतमूळ अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे. हे फायदे कोणते पाहुयात.

कावीळमध्ये फायदेशीर

अनंतमुळाची वेल ही कावीळच्या रुग्णांसाठी रामबाण औषध आहे. 2 ग्रॅम अनंतमुळाची साल थोडी काळी मिरी पावडर आणि अर्धा ग्लास पाण्यासहित बारीक़ वाटून हे मिश्रण कावीळच्या रुग्णाला एक आठवडा द्या. यामुळे त्याचे डोळे आणि शरीराचा पिवळसरपणा दूर होतो.

डोळ्याशी संबंधित समस्येवर उपचार

myupchar.com चा नुसार, डोळ्यांची सूज आणि लालसरपणा दूर करण्यासाठी देखील अनंतमूळ एक अतिशय फायदेशीर औषध आहे. याचं मूळ पाण्यात उगाळून डोळ्यावर लावल्यास सूज कमी होते. याशिवाय मुळांच्या पानांची राख गाळून त्याचा मधासकट लेप बनवून तो डोळ्यावर लावल्याने डोळ्यांची सूज जाते किंवा अनंतमुळाची ताजी पानं तोडून त्यातून बाहेर पडणाऱ्या दुधात मध मिसळून डोळ्यावर लावल्यास त्याचादेखील डोळ्यांना फायदा होतो.

अनंतमूळ रक्त स्वच्छ करतं

अनंतमूळ रक्त स्वच्छ करण्यासदेखील उपयुक्त आहे. 30 ग्रॅम अनंतमूळ 1 लीटर पाण्यात उकळवून काढा तयार करा, नंतर त्यात 1 ग्रॅम खडीसाखर मिसळा आणि प्या.

भूक लागते

भूक न लागल्यास अनंतमूळची 3 ग्रॅम पावडर सकाळी आणि संध्याकाळी गाईच्या दुधातून घ्या. याने भूक लागेल.

गजकर्णच्या समस्येवर उपचार

अनंतमूळ हे गजकर्ण बरे करण्यासाठी फायदेशीर औषध आहे. गजकर्ण झाल्यास अनंतमुळाची 1 ग्रॅम पावडर तुपात भाजून 5 ग्रॅम साखरेसह नियमितपणे खा. काही दिवसात गजकर्ण बरं होईल.

घशाची सूज कमी होते

अनंतमूळ बारीक करून ते गळ्यावर लावा. यामुळे घशाला सूज येण्याची समस्या दूर होते. myupchar.com च्यानुसार हा उपाय करण्यापूर्वी तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मूतखड्यावर फायदेशीर

आपल्यास मूतखड्याचा त्रास असल्यास गायीच्या दुधासह अनंतमूळच्या 5 ग्रॅम पावडरचं नियमित सेवन केल्यास मूत्रपिंडातील मूतखडा हळूहळू वितळेल. याशिवाय मूत्रमार्गात जळजळ होण्याची समस्या असल्यास देखील हा उपाय उपयुक्त आहे

संधिवातासाठी गुणकारी औषध

संधिवातामध्ये, अनंतमूळ प्रभावी औषध म्हणून कार्य करतं. सांधेदुखी किंवा संधिवात यासाठी अनंतमूळाची 5 ग्रॅम पावडर, मधासह दररोज 2-3 वेळा घ्या.या उपायाने वेदना कमी होतील आणि सांध्याची सूजही कमी होईल.

दम्याचा उपचार

दम्याचा त्रास फुफ्फुसात कफ वाढल्यामुळे होतो. अशा परिस्थितीत अनंतमुळाच्या भुकटीचं सेवन फायदेशीर ठरतं. कफनाशक गुणधर्म असणारं अनंतमूळ दम्याची लक्षणं कमी करते आणि कफ कमी करून दम्याचा त्रास दूर करतं.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - निरोगी राहण्याचे उपाय

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

First published:

Tags: Ayurved, Health, Home remedies