जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वसमावेशक स्वच्छतागृहे: LGBTQ+ विद्यार्थ्यांसाठी पोषक वातावरण तयार करणे

शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वसमावेशक स्वच्छतागृहे: LGBTQ+ विद्यार्थ्यांसाठी पोषक वातावरण तयार करणे

सर्वसमावेशक स्वच्छतागृहे

सर्वसमावेशक स्वच्छतागृहे

सर्वसमावेशक शौचालये ही अशी शौचालये आहेत जी सर्व जेंडर आणि अभिव्यक्ती असलेल्या लोकांसाठी खुली आहेत, ज्यांना जेंडर-न्यूट्रल, युनिसेक्स किंवा सर्वसमावेशक स्वच्छतागृहे देखील म्हणतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

जेथे जगात स्वीकृती आणि सर्वसमावेश हा सर्वसामान्य नियम असावा, शैक्षणिक संस्थांमधील LGBTQ+ विद्यार्थ्यांसमोर असलेली वास्तविकता खूपच निराशाजनक आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप आणि प्राइड सर्कल यांनी भारतभरात केलेल्या 2021 च्या सर्वेक्षणातील निष्कर्ष हा समाज अजूनही सहन करत असलेल्या आव्हानांचे स्मरण म्हणून काम करतो. धक्कादायक म्हणजे, 64% LGBTQ+ विद्यार्थ्यांनी भेदभाव किंवा चेष्टा अनुभवली आहे, ज्यामध्ये 92% सतत उपहास, 59% सतत गुंडगिरी आणि 26% विद्यार्थ्यांना सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागला आहे. सर्वात त्रासदायक गोष्ट अशी आहे की यापैकी 36% विद्यार्थी कॅम्पसमध्ये LGBTQ+ संदर्भात मित्रत्वाची भावना नसल्यामुळे त्यांची ओळख उघड करण्यास घाबरत आहेत. हे, अशा ठिकाणी होते आहे जेथे आपण भविष्याकडे पाहत आहोत, जी जागा उदारमतवादी आहे आणि आपले मन नवीन अनुभवांसाठी मोकळे करणारी आहे. जर हे विद्यापीठांमध्ये घडत असेल तर आपल्या कार्यालयांमधील LGBTQ+ अनुभव काही वेगळे असणार आहे का? सार्वजनिक संवाद हळूहळू सर्व लिंग आणि लैंगिक अभिमुखता विविधतेच्या सामान्यतेकडे विकसित होत असताना, आपल्याला आवश्यकता आहे ठोस कृती करण्याची. जेव्हा आपली विद्यापीठे लिंग तटस्थ शौचालये तयार करतील, तेव्हा त्या केवळ बोलणे सोडून काहीतरी ठोस काम करतील. तेथे एक अशी जागा तयार होते जी सर्व लैंगिक विविधतांची स्वीकृती सूचित करते. ही पुष्टीकरणाची एक शक्तिशाली कृती बनते आणि भेदभाव करणार्‍यांना एक उत्तम इशारा देते. जेव्हा कामाची ठिकाणे, चित्रपटगृहे, स्टेडियम, कार्यक्रमाची ठिकाणे, सार्वजनिक वाहतूक केंद्रे, टोल स्थानके, पोलिस स्थानके, न्यायालये, रुग्णालये आणि इतर सर्वत्र हेच घडते तेव्हा आपण सर्वांना सामावून घेणारा, सर्वांचा स्वीकार करणारा आणि आदर करणारा समाज म्हणून खात्री देतो. आणि आपण द्वेष करणाऱ्यांना दाखवून देतो की आपण त्यांच्या सोबत नाही. केवळ एका स्वच्छतागृहामुळे इतके काही होते. सर्वसमावेशक स्वच्छतागृहाची गरज समजून घेणे सर्वसमावेशक स्वच्छतागृहे ही अशी स्वच्छतागृहे आहेत जी सर्व लिंग ओळख आणि अभिव्यक्ती असलेल्या लोकांसाठी प्रवेश देणारी आणि वापरता येणारी आहेत. त्यांना लिंग-तटस्थ, युनिसेक्स किंवा सर्व-लिंग स्वच्छतागृहे म्हणून देखील ओळखले जाते. सर्वसमावेशक स्वच्छतागृहांमध्ये गोपनीयता विभाजकांसह एक स्टॉल किंवा एकाधिक स्टॉल्स असतात. ते प्रत्येकासाठी असल्याचे दर्शविणाऱ्या चिन्हांनी दर्शवीलेली असतात, जसे की “स्वच्छतागृह”, “सर्व-लिंग स्वच्छतागृह”, किंवा “लिंग-सर्वसमावेशक स्वच्छतागृह”. LGBTQ+ विद्यार्थ्यांसाठी, तीन तात्काळ फायदे आहेत: कमी झालेली चिंता आणि तणाव: ट्रान्सजेंडर, नॉन- बायनरी आणि इंटरसेक्स विद्यार्थी अंतिमतः ‘योग्य’ स्वच्छतागृह वापरू शकतात. पुरुषांचे स्वच्छतागृह हे चुकीचे स्वच्छतागृह आहे. महिलांच्या स्वच्छतागृहाच्या बाबतीतही तसेच आहे. लिंग तटस्थ स्वच्छतागृह एक अशी जागा तयार करते जिथे त्यांना प्रवेश आहे आणि त्यांची उपस्थिती वाद उत्पन्न करत नाही. त्यांना अधिक आश्वस्त आणि सुरक्षित वाटते. चुकीच्या स्वच्छतागृहाध्ये जाण्याबद्दल आता काळजी करण्याची गरज नाही, तेथे त्यांना कोण भेटेल, त्यांची प्रतिक्रिया कशी असेल किंवा त्यांच्यावर शाब्दिक किंवा शारीरिक हल्ला का याबद्दल आता काळजी करण्याची गरज नाही. आपलेपणाची भावना वाढवणे: जेव्हा LGBTQ+ विद्यार्थ्यांना असे वाटते की ते आपले आहेत, तेव्हा ते शाळेमध्ये अधिक समरस होण्याची आणि त्यांच्या समवयस्क आणि शिक्षकांकडून त्यांना आधार मिळण्याची शक्यता असते. यामुळे चांगले शैक्षणिक परिणाम आणि शाळेतील एकूण अनुभव अधिक सकारात्मक मिळू शकतो. छळ आणि भेदभाव रोखणे: सर्वसमावेशक स्वच्छतागृहे LGBTQ+ विद्यार्थ्यांविरुद्ध होणारा छळ आणि भेदभाव टाळण्यासाठी मदत करू शकतात. जेव्हा विद्यार्थ्यांना ही गोष्ट माहित असते की ते सुरक्षित आणि आपलेसे आहेत, तेव्हा त्यांना छळ किंवा भेदभावासाठी लक्ष्य केले जाण्याची शक्यता कमी असते. सर्वसमावेशक शौचालये अधिक समावेशक समाजासाठीचा मार्ग सोपा करतात. जेव्हा विविध पार्श्वभूमी आणि व्यक्तिमत्व असलेले विद्यार्थी सहाय्य करणाऱ्या वातावरणात शिकतात तेव्हा ते सहानुभूती, समज आणि स्वीकृती आत्मसात करतात. शिवाय, शैक्षणिक संस्थांमधील या सर्वसमावेशक पद्धती शैक्षणिक संस्थांच्या सीमेच्या बाहेर कामाच्या ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी पसरण्याची शक्यता असते. भारतातील सर्वसमावेशक स्वच्छतागृहांची उदाहरणे भारतात, सर्वसमावेशक स्वच्छतागृहे जरी व्यापक नसली तरी शैक्षणिक संस्थांद्वारे सक्रिय पावले उचलण्याची प्रेरणादायक उदाहरणे आहेत. एक उल्लेखनीय उदाहरण म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबई, जिथे 2017 च्या सुरूवातीस कॅम्पसमध्ये लिंग-तटस्थ स्वच्छतागृह उभारण्यात आले होते. हा उपक्रम आयआयटी मुंबई येथील LGBTQ+ विद्यार्थी मदत गट साथी यांनी पुढे आणला होता, ज्याने सर्वसमावेशकतेचा प्रसार करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील समर्थनाची शक्ती दर्शविली होती. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीआयएसएस) मुंबई ही आणखी एक संस्था आहे, ज्यांनी 2017 मध्ये कॅम्पसमध्ये लिंग-तटस्थ स्वच्छतागुहे उभी केली. टीआयएसएस मुंबई येथील LGBTQ+ विद्यार्थी गट क्विर कलेक्टिव यांनी यासाठीच्या प्रयत्नाचे नेतृत्व केले ज्यामध्ये सर्वांसाठी सुरक्षित आणि सर्वसमावेशक जागा तयार करण्यासाठी विद्यार्थी-चालित उपक्रमावर भर दिल गेला होता. ही उदाहरणे सर्वसमावेशक स्वच्छतागृहांना वास्तविकता बनविण्यात सहकारी प्रयत्नांच्या परिवर्तनात्मक परिणामावर प्रकाश टाकतात. विविध भागधारकांना सामील करून आणि सामाजिक भावना वाढविण्याद्वारे, शैक्षणिक संस्था विविध लैंगिक व्यक्तिमत्वांचा आदर आणि सर्वांना सामावून घेणारे वातावरण तयार करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती करू शकतात. आज, अनेक भारतीय विद्यापीठे लिंग-तटस्थ स्वच्छतागृहांची गरज जाणत आहेत. आयआयटी दिल्लीसारख्या संस्थांनी त्यांच्या कॅम्पसमध्ये लिंग-तटस्थ स्वच्छतागृहाचे उद्घाटन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. खरं तर, आयआयटी दिल्लीमध्ये आता अशा 14 सुविधा आहेत. याव्यतिरिक्त, आसाममधील तेझपूर विद्यापीठ आणि आंध्र प्रदेशातील नॅशनल अॅकॅडमी ऑफ लीगल स्टडीज अँड रिसर्च (एनएएलएसएआर) यांनी सर्व विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक वातावरण प्रदान करण्याचे महत्त्व ओळखून लिंग-तटस्थ स्वच्छतागृहे देखील स्वीकारली आहेत. लिंग-तटस्थ ट्रान्स पॉलिसी आणि विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रांवरील लिंग-तटस्थ शीर्षक, “एमएक्स” ला मान्यता देऊन NALSAR ने एक पाऊल पुढे टाकले आहे, ज्यामुळे इतर संस्थांना अनुसरण करण्यासाठी मार्गातील अडथळे दूर झाले आहेत. सर्वसमावेशकता आणि विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखालील संस्था आणि संस्थात्मक धोरणांद्वारे चालविलेल्या पुढाकारांना जवळ घेऊन ही विद्यापीठे उज्ज्वल आणि अधिक न्याय्य भविष्यासाठी मार्ग तयार करीत आहेत. सर्वसमावेशक स्वच्छतागृहांची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य रणनीती शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वसमावेशक स्वच्छतागृहे तयार करण्यासाठी विविध भागधारकांकडून सहयोगात्मक प्रयत्नांची आवश्यकता आहे: प्रशासक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि सामाजिक सदस्य. सर्वसमावेशक स्वच्छतागृहे तयार करण्यासाठी काही पावले उचलली जाऊ शकतात ती पुढील प्रमाणे: संस्थात्मक स्तरावर धोरणे स्वीकारणे: प्रशासक, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि सामाजिक सदस्य लिंग-सर्वसमावेशक स्वच्छतागृहामध्ये या प्रयत्नास यश देणारी मजबूत धोरणे स्थापित करू शकतात. यात विद्यमान सुविधांचे रूपांतरण किंवा नवीन सुविधा तयार करणे यांचा समावेश होतो. कर्मचारी आणि विद्यार्थी एकत्रित रित्या सर्वसमावेशक प्रशिक्षण घेऊ शकतात आणि समजूतदारपणा आणि आदरयुक्त वातावरण कसे तयार करावे आणि ते कसे टिकवायचे ते शिकू शकतात. सल्लामसलत आणि सहयोग यांना चालना: नियोजन प्रक्रियेदरम्यान LGBTQ+ विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे मत महत्त्वपूर्ण आहे. त्यांना सामील करून, आपण हे सुनिश्चित करतो की स्वच्छतागृह खरोखरच त्यांच्या वेगळ्या गरजा (विशेषत: सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून) आणि अपेक्षांची पूर्तता करतात. त्यांचे मत आणि दृष्टीकोन खरा सर्वसमावेश आणि आपलेपणाच्या भावनेसाठी मार्ग प्रशस्त करतात. करुणा आणि वापरण्यास योग्य डिझाइन: आपण सर्वांच्या गोपनीयता आणि सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. लॉक करण्यायोग्य एक-स्टॉल सुविधा, लिंग ओळखन दाखवता सर्व व्यक्तींना प्रवेश, आपत्कालीन बटणांची स्थापना, नेहमीच सुरू असणाऱ्या प्रकाश योजनेचा वापर आणि इतर डिझाइन विचारांमुळे स्वच्छतागृह सुरक्षित वाटेल (आणि ते असेल) हे सुनिश्चित करणे. याव्यतिरिक्त, स्वच्छतागृहांची रचना सर्वांसाठी सुलभ असण्यासह दिव्यांग विद्यार्थ्यांच्या गरजा भागविण्यासाठी देखील तयार केली जाऊ शकते. जागरूकता वाढवणे आणि नियमित देखभाल करणे: पारंपारिक मानसिकतेचे रूपांतर करण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यशाळा आणि सेमिनार मोठी मदत करतात. आपल्या सर्वांना माहित आहे की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला ‘वेगळे’ असण्यासाठी दोषी ठरवतो आणि जेव्हा आपल्याला ते उमगते तेव्हा आपल्यामध्ये किती आमूलाग्र बदल होतो, परंतु तो व्यक्त केला जात नाही. कार्यशाळा एकमेकांमध्ये मिसळण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि एकमेकांकडून शिकण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध करून देतात. या शैक्षणिक प्रयत्नांमुळे सहानुभूती वाढते, समजून घेणे वाढते आणि LGBTQ+ समाजाला भेडसावणाऱ्या गुंतागुंतीच्या आव्हानांसाठी कृतज्ञता बाळगली जाते. या परिवर्तनाच्या प्रवासात, हार्पिक हा ब्रँड ज्याने स्वच्छतेचे प्रतीक म्हणून भारतीय घराघरात स्थान निर्माण केले आहे, तो बदलाचा बिकन म्हणून उदयास आला आहे. सर्वसमावेशकता आणि स्वच्छता या दोन्हींचे असलेले महत्त्व ओळखून, हार्पिक सर्वांच्या गरजा पूर्ण करणारी उत्पादने तयार करून, LGBTQ+ समाजासह आपल्या सुंदर राष्ट्राची विविधता मनापासून स्वीकारतो. याशिवाय, हार्पिकने हे जाणले आहे की एकता बदलाचा प्रभाव वाढवते. तीन वर्षांपूर्वी, हार्पिकने उल्लेखनीय मिशन स्वच्छता और पानी सुरू करण्यासाठी न्यूज18 सोबत सहकार्य केले. हा वेगळा प्रयत्न स्वच्छते शिवाय अधिक काही करतो; हा एकमेकांसाठी प्रेम, स्वीकृती आणि उत्तम सहकारी दर्शवतो. ट्रान्सजेंडर आणि नॉन-बायनरी समाजाला समर्थन देरून, मिशन स्वच्छता और पानी सर्वसमावेशी सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या अपरिहार्य असलेल्या महत्त्वावर प्रकाश टाकते. पुढे जाताना: सर्वसमावेशकतेचा प्रवास सुरू ठेवणे सर्वसमावेशकतेचा प्रवास हा अखंड चालू राहणारा आहे. कायमच काहीतरी करण्यासारखे काम असेल. सार्वजनिक जागांवर लिंग तटस्थ स्वच्छतागृहांचा समावेश सुरू झाला असताना, LGBTQ+ समाजाशी संवाद साधणे, या सुविधांच्या उपयुक्ततेचे मूल्यांकन करणे आणि आवश्यकतेनुसार बारीकसारीक बदल करणे अत्यावश्यक आहे. सर्वसमावेशक स्वच्छतागृहे भौतिक जागेच्या पलीकडे जातात; ती विविधतेची ओळख आणि आदर यांचे प्रतीक आहेत. दृढ धोरणे, LGBTQ+ समाजाशी संलग्नता, उत्तम रचना, शिक्षण आणि हार्पिक आणि ‘मिशन स्वच्छता और पानी’ सारख्या उपक्रमांच्या सहकार्यांसह, सर्वांसाठी सहकार्य आणि आदर व्यक्त करणाऱ्या शैक्षणिक जागा तयार करण्यासाठी आवश्यक गोष्टी आपल्याकडे आहेत. या मार्गावर आपण एकत्रितपणे पुढे जाऊ या आणि आपल्याला अद्वितीय ओळख प्रदान करणाऱ्या विविधतेतून आपला समाज समृद्ध करू या. या राष्ट्रीय संवादात आपण कसा सहभाग घेऊ शकता हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत येथे सामील व्हा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात