मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

उन्हाळ्यात जाणवू शकतो सनपॉयझनिंगचा त्रास, जाणून घ्या लक्षणं आणि बचाव

उन्हाळ्यात जाणवू शकतो सनपॉयझनिंगचा त्रास, जाणून घ्या लक्षणं आणि बचाव

खालील गोष्टींचा अवलंब करून तुम्ही सन पॉयझनिंगच्या समस्येपासून स्वत:चा बचाव करू शकता

खालील गोष्टींचा अवलंब करून तुम्ही सन पॉयझनिंगच्या समस्येपासून स्वत:चा बचाव करू शकता

खालील गोष्टींचा अवलंब करून तुम्ही सन पॉयझनिंगच्या समस्येपासून स्वत:चा बचाव करू शकता

नवी दिल्ली, 29 मार्च : साधारण मार्च महिना सुरू झाला की, हिवाळा ऋतू संपून उन्हाळा (Summer) सुरू होतो. हिवाळ्यातल्या गारठ्यानंतर अचानक वाढलेली उष्णता आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकते. उन्हाळ्यातल्या उष्णतेमुळे सनस्ट्रोक (Sunstroke), डिहायड्रेशन (Dehydration), घामोळं (Miliaria) यांसारख्या अनेक समस्या जाणवतात. उन्हाळ्यात सनबर्न (Sunburn) आणि टॅनिंगची (Tanning) समस्या जाणवणं ही अतिशय सामान्य बाब आहे. जास्त वेळ उन्हात राहिल्यामुळं सनबर्न आणि टॅनिंगच्या समस्यांना तोंड द्यावं लागतं; पण तुम्ही कधी सन पॉयझनिंगबाबत (Sun Poisoning) ऐकलं आहे का? सन पॉयझनिंग ही एक अशी समस्या आहे ज्याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. अनेकांना तर सनबर्न आणि सन पॉयझनिंगमधला फरकही लवकर समजत नाही. सनबर्नपेक्षा सन पॉयझनिंग जास्त धोकादायक आहे. 'आज तक'ने याबाबतची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सन पॉयझनिंग हा सनबर्नचा सर्वांत घातक (Deadly) प्रकार आहे. आपण सूर्याच्या अतिनील किरणांच्या (UV Rays) बराच काळ संपर्कात असतो तेव्हा ही समस्या उद्भवू शकते. व्यक्तिपरत्वे सन पॉयझनिंगची लक्षणं वेगवेगळी दिसू शकतात. मोठ्या प्रमाणात पुरळ येणं, त्वचेवर फोड येणं किंवा कातडी निघणं, डिहायड्रेशन, मळमळ होणं, चक्कर येणं, श्वास घेण्यास अडचण येणं ही सन पॉयझनिंगची काही सामान्य लक्षणं आहेत. सन पॉयझनिंगच्या समस्येवर वेळेत वैद्यकीय उपचार (Treatment) घेतल्यास ती बरी होऊ शकते. सन पॉयझनिंगचा त्वचेवर सर्वांत जास्त परिणाम होतो. जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहतो, तेव्हा अतिनील किरण त्वचेला हानी पोहोचवतात. त्यामुळे खूप वेदना आणि नुकसान सहन करावं लागतं. सन पॉयझनिंगमुळे अशक्तपणा, थकवा, मूर्च्छा येणं आणि मळमळ होणं यांसारख्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अशी लक्षणं जाणवली तर जास्त द्रव पदार्थांचं सेवन करणं आणि हायड्रेटेड राहणं महत्त्वाचं आहे. तसंच, त्वचेच्या प्रभावित भागाला स्पर्श करणंही टाळा, जेणेकरून इन्फेक्शन होणार नाही. हे ही वाचा-उन्हाळ्यात पित्त वाढतं? घरगुती उपाय नक्की करून पाहा खालील गोष्टींचा अवलंब करून तुम्ही सन पॉयझनिंगच्या समस्येपासून स्वत:चा बचाव करू शकता - 1) उन्हात जाण्यापूर्वी पूर्ण शरीर झाकेल असे कपडे घाला. उन्हाळ्यात शक्यतो घट्ट कपड्यांऐवजी सैल कपडे वापरा. याशिवाय, गडद रंगाचे कपडे घालणं टाळा आणि सनग्लासेसचा वापर करा. 2) सनस्क्रीनचा वापर करा. शक्यतो SPF 30 पेक्षा जास्त रेटिंगचं सनस्क्रीन लोशन (Sunscreen Lotion) वापरा. घरातून बाहेर पडण्याच्या किमान 15 ते 30 मिनिटं अगोदर सनस्क्रीन लावा. गरज वाटल्यास तुम्ही दर दोन तासांनीही याचा वापर करू शकता. 3) उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी 10 ते संध्याकाळी 4 या वेळेत घराबाहेर पडण्याचं शक्यतो टाळा. 4) नवजात मुलं आणि बालकांना उन्हापासून सुरक्षित ठेवा. वरील गोष्टींची काळजी घेतल्यास शक्यतो सन पॉयझनिंगचा धोका टळू शकतो. काळजी घेऊनही सन पॉयझनिंगची समस्या उद्भवली, तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
First published:

Tags: Summer, Summer hot

पुढील बातम्या