जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पावसाळ्यात उन्हाची कमतरता; शरीराला व्हिटॅमिन डी पुरवण्याचे सोपे मार्ग

पावसाळ्यात उन्हाची कमतरता; शरीराला व्हिटॅमिन डी पुरवण्याचे सोपे मार्ग

पावसाळा आला म्हणजे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि व्हायरल तापासारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीमुळे देशात हाहाकार माजला आहे. ही चिंतेची बाब आहे. खरंतर व्हायरल ताप येणं आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये फारसा फरक नाहीये. म्हणूनच, कोरोना संसर्ग अधिक वेगानं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा येणार म्हटल्यामुळे यंदा लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे.

पावसाळा आला म्हणजे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आणि व्हायरल तापासारख्या अनेक आजारांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत, कोरोनासारख्या जीवघेण्या महामारीमुळे देशात हाहाकार माजला आहे. ही चिंतेची बाब आहे. खरंतर व्हायरल ताप येणं आणि कोरोनाच्या लक्षणांमध्ये फारसा फरक नाहीये. म्हणूनच, कोरोना संसर्ग अधिक वेगानं वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळा येणार म्हटल्यामुळे यंदा लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली आहे.

पावसाळ्यात फारसं ऊन नसल्याने डी जीवनसत्वाची कमतरता कशी भरून काढायची हा एक चिंतेचा विषय असतो.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    शरीराला निरनिराळ्या जीवनसत्वांची गरज असते उदाहरणार्थ ए, बी, सी, डी इत्यादी. जीवनसत्व डी हे आपल्याला उन्हापासून मिळते. myupchar.com चे डॉ. अनुराग शाही म्हणाले, रोज 15 ते 20 मिनिटं उन्हात राहून जीवनसत्व डी ची कमतरता पूर्ण करता येते. डी जीवनसत्व हाडांच्या समस्या दूर करते पण पावसाळ्यात जेव्हा ऊन नसते तेव्हा कठीण असते. त्यावेळी डी जीवनसत्वाची कमतरता कशी भरून काढायची हा एक चिंतेचा विषय असतो. अशावेळी डी जीवनसत्व मिळवण्यासाठी या पर्यायांचा उपयोग होऊ शकतो. मशरूम खावे मशरूममध्ये डी जीवनसत्वाचे प्रमाण चांगले असते. उन्हात उगवणाऱ्या मशरूममध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात. अनेक लोक ऑयस्टर आणि बटन मशरूम खाणे पसंत करतात. गाईचे दूध प्या myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, गाईच्या दुधात डी जीवनसत्व असते. गाईच्या दुधाने जीवनसत्वाची कमतरता दूर होते आणि ज्यांना हाडांची समस्या आहे, त्यांची समस्याही दूर होते.. गाईच्या दुधात फॅटपण कमी असतात त्यामुळे ज्यांना हृदय रोग आहे त्यांना फायदाही होतो. अंडी अंड्यांमध्ये प्रथिनां सोबत जीवनसत्व डीदेखील असते. अंड्यांच्या पांढऱ्या भागात डी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. ज्यांची हाडे कमजोर असतात त्यांनी अंडी खावी. संत्र्याचा रस संत्र्याच्या रसात जीवनसत्व डी आणि सी दोन्हीही भरपूर प्रमाणात असतात. संत्र्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. पावसाळ्यात संत्री खावी. मोड आलेली कडधान्ये कडधान्यांमध्ये डी जीवनसत्व चांगल्या प्रमाणात असते. नाश्त्यामध्ये कडधान्ये वाफवून खाल्ली तरी जीवनसत्व डी मिळते. त्यात प्रथिनेदेखील असतात. दर दोन तीन दिवसाआड मोड आलेली कडधान्ये खावीत त्याने फायदा होतो. नेहमी आपण पाहतो लोक रात्री कडधान्ये मोड येण्यासाठी ठेवतात आणि सकाळी खातात पण तोपर्यंत चांगले मोड आलेले नसतात. म्हणून कडधान्ये जास्त वेळ मोड आणण्यासाठी ठेवावीत. सोया दूध सोया दूधही गाईच्या दुधासारखे असते. ते सोयाबीनपासून बनवतात. एक कप सोय दुधात 39 टक्के डी जीवनसत्व असते. त्याशिवाय त्यात प्रथिने आणि कॅल्शियमसुद्धा असते. डॉक्टर नेहमी हाडे कमजोर असणाऱ्या रुग्णांना सोया दूध पिण्याचा सल्ला देतात. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख -  व्हिटॅमिन डीची कमतरता न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात