भारतासह संपूर्ण जगामध्ये कोरोनामुळे तणावाचं वातावरण असताना इतर आजार देखील डोकं वर काढू लागले आहेत. न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स हा आजारही दिवसेंदिवस वाढायला गेला आहे.
बदललेलं लाईफस्टाईल आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे भारतात रुग्ण वाढत चालले आहेत. द लेंसेट ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधन अभ्यासामध्ये आरोग्य तज्ज्ञांनी या संदर्भात चिंता व्यक्त करताना राज्यांना आजारांपासून सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
देशामध्ये 3 प्रकारचे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डचे रुग्ण आढळत असून 1990 ते 2019 या काळात या रुग्णांची संख्या दुपटीने वाढलेली आहे.
लोकांना या आजाराबद्दल पूर्ण माहिती नसते किंवा औषधोपचाराची साधनंही उपलब्ध नसतात. त्यामुळे अभ्यासानुसार न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स आरोग्यासाठी एक आव्हानच मानलं गेलं आहे.
या संशोधन अभ्यासाच्या सहलेखिका आणि दिल्ली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डिपार्टमेंट ऑफ न्यूरॉलॉजीमध्ये प्रोफेसर म्हणून काम पाहणाऱ्या डॉक्टर मंजिरी त्रिपाठी यांनी 1990 ते 2019 या काळात भारतामध्ये स्ट्रोक, अल्जाइमर, हेडऍक डिसऑर्डर, ब्रेन कॅन्सर जखम झाल्यानंतर होणारं मेडिकल डिसऑर्डर याची प्रकरणं वाढली असल्याचं सांगितलं आहे.
संशोधनानुसार छत्तीसगड,ओरिसा,आसाम,पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा सारख्या राज्यांमध्ये स्टोकचे रुग्ण वाढू लागले आहेत. तर, केरळ सारख्या राज्यामध्ये अल्जायमरचे रुग्ण जास्त आढळून आले आहेत.
1990 ते 2019 पर्यंत दुपटीने रुग्ण वाढलेत. याशिवाय दुखापत झाल्यानंतर होणारं न्युरोलॉजिकल डिसॉर्डर येण्याचे प्रकार तामिळनाडू जम्मू-काश्मीर, लद्दाख आणि केरळ,गोवा राज्यामध्ये सर्वात जास्त आढळून आले आहेत.
उत्तर प्रदेश,बिहार,मध्यप्रदेश,झारखंड,राजस्थान,छत्तीसगड,मणिपूर, नागालँड,उत्तराखंड आणि ओरिसा या राज्यांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसॉर्डरचे रुग्ण वाढलेत.
आजच्या काळामध्ये आहाराकडे लोकांचं दुर्लक्ष होतं. यामुळे देखील स्ट्रोक आणि अल्जायमर सारखे आजार होऊ लागले आहेत. सतत मोबाईल फोन वापरणं मात्र बाहेर फिरणं कमी झाला आहे. स्ट्रेस,टेन्शन यामुळे देखील डिसऑर्डर वाढतो आहे. यासाठी लोकांनी आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करणं आवश्यक आहे.
भारतामध्ये 3 प्रकारचे न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आढळून आले आहेत. राज्यांची तुलना करता काही राज्यांमध्ये हे रुग्ण जास्त आहेत तर काही राज्यांमध्ये अतिशय कमी.