जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Vastu Tips: घरातील फरशी ठरू शकते अधोगतीचं कारण, जाणून घ्या फरशीच्या निवडीबाबत वास्तू टिप्स

Vastu Tips: घरातील फरशी ठरू शकते अधोगतीचं कारण, जाणून घ्या फरशीच्या निवडीबाबत वास्तू टिप्स

Vastu Tips: घरातील फरशी ठरू शकते अधोगतीचं कारण, जाणून घ्या फरशीच्या निवडीबाबत वास्तू टिप्स

त्यामुळेच घर घेताना किंवा बांधताना वास्तूच्या दृष्टीनं काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. वास्तूवर प्रभाव पाडणाऱ्या गोष्टींमध्ये घरातील फरशी हीदेखील एक महत्त्वाची गोष्ट आहे.

    नवी दिल्ली, 5 जून : घर माणसांनी बनतं, हे खरं आहे, पण एखाद्या वास्तूत तिथे वास्तव्य करणाऱ्या व्यक्तींप्रमाणेच वस्तूंमुळेही सकारात्मक (Positive) किंवा नकारात्मक (Negative) वातावरण असू शकतं. वास्तूतील दिशा, त्या दिशांना असणारं फर्निचर, घरातील इतर वस्तू, झाडं, कचरा ठेवण्याची जागा अशा अनेक गोष्टी वास्तूवर प्रभाव टाकतात. त्यामुळेच घर घेताना किंवा बांधताना वास्तूच्या दृष्टीनं काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं. वास्तूवर प्रभाव पाडणाऱ्या गोष्टींमध्ये घरातील फरशी हीदेखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. केवळ दिसायला चकचकीत, सुंदर फरशी वास्तूविषयीच्या गरजा पूर्ण करू शकणार नाही. त्यासाठी फरशी बसवताना (Vastu Tips for Floor) काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. झी न्यूज हिंदीनं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे. वास्तूमध्ये प्रत्येक गोष्टीचं वेगळं महत्त्व असतं. घरातील फरशीही त्यात येते. वास्तूमध्ये दोष निर्माण होण्यास ही फरशीही कारणीभूत ठरू शकते. काही लोक घराला नवीन लूक देण्यासाठी टाइल्स (Tiles) किंवा मार्बल (Marble) लावतात, पण घरात दगडाचा वापर करणं शुभ नसतं. त्यामागे काय कारणं असतात, तसंच कोणती फरशी घरात बसवावी, याबाबत जाणून घेऊ. घरातील फरशीसाठी दगडाचा वापर केल्यानं कुटुंबातील मुख्य व्यक्तीला अनेक संकटांना सामोरं जावं लागतं. घरात भांडण-तंटे होतात. त्यामुळे धार्मिक स्थळं, मंदिर, मठ अशाच ठिकाणी दगड लावले जातात. घरात दगड लावायचा असल्यास केवळ देव्हाऱ्यात लावावा. घरात टाइल्स किंवा मार्बल लावायचा असल्यास फिकट रंगाचाच वापर करावा. योग्य रंगांची निवड केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते आणि घराला सुख, स्थैर्य आणि शांतता लाभते. फरशीसाठी नेहमी नैसर्गिक मार्बलचा वापर करावा. कृत्रिम मार्बलचा वापर करू नये, असं वास्तू तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्या व्यतिरिक्त फरशी बसवताना आणखी काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. - कुटुंबाला अधिक मान-सन्मान मिळण्यासाठी दक्षिण दिशेला फरशीवर लाल रंगाचा मार्बल बसवणं किंवा डिझाईन करणं लाभदायक ठरतं. - घरात फिकट पिवळ्या रंगाच्या टाइल्स किंवा मार्बलची फरशी लावली, तर त्या घरातील व्यक्तींवर आर्थिक संकटं येत नाहीत. तसंच घरातील संपत्तीची वृद्धी होते. - घराच्या बांधकामासाठी जुन्या विटा, दगड, माती किंवा लोखंडाच्या वस्तूंचा वापर करू नका. नव्या घराच्या निर्मितीसाठी कायम नवं सामानच (New Raw Material) वापरलं पाहिजे. घरातील फरशीही घराच्या उत्कर्षासाठी किंवा अधोगतीसाठी कारणीभूत ठरू शकते. त्यातील रंगसंगती घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम करते. त्यामुळे वास्तूशास्राला अनुसरून योग्य रंगांची निवड करून त्या रंगाची फरशी घरात बसवली तर घरात शांतता नांदते असं वास्तूशास्र सांगतं. त्यामुळे घर घेताना इतर गोष्टींसोबतच घरातील फरशीही काळजीपूर्वक पाहा.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात