मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

येत्या 50 वर्षांत येऊ शकतात अनेक साथीचे आजार; माणूस, प्राण्यांमध्ये 15 हजार विषाणू पसरण्याचा संशोधकांचा दावा

येत्या 50 वर्षांत येऊ शकतात अनेक साथीचे आजार; माणूस, प्राण्यांमध्ये 15 हजार विषाणू पसरण्याचा संशोधकांचा दावा

कोरोनाच्या साथीमुळे पुन्हा एकदा साथीचे आजार आणि महामारी या गोष्टी चर्चेत आल्या आहेत. येत्या 50 वर्षांत हजारो साथीचे आजार पसरणार असून, सुमारे 15 हजार विषाणू (Virus) प्राण्यांपासून मानवापर्यंत पोहोचू शकतात, असा दावा नुकताच एका संशोधनातून करण्यात आला आहे.

पुढे वाचा ...

बिजींग, 3 एप्रिल : गेल्या दोन वर्षांपासून जगातले अनेक देश कोरोना (Corona) महामारीचा (Pandemic) सामना करत आहेत. यादरम्यान कोरोनाचे वेगवेगळे व्हेरियंट (Variant) समोर आले आहेत. कोरोनामुळे जगातल्या लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागले. कोरोनाच्या लाटांमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आल्याचं पाहायला मिळालं. कोरोनाच्या साथीमुळे पुन्हा एकदा साथीचे आजार आणि महामारी या गोष्टी चर्चेत आल्या आहेत. येत्या 50 वर्षांत हजारो साथीचे आजार पसरणार असून, सुमारे 15 हजार विषाणू (Virus) प्राण्यांपासून मानवापर्यंत पोहोचू शकतात, असा दावा नुकताच एका संशोधनातून करण्यात आला आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती दिली आहे.

अमेरिकेतल्या जॉर्जटाउन युनिव्हर्सिटीने (Georgetown University) नुकतंच एक संशोधन केलं. त्यात येत्या 50 वर्षांत हजारो साथीचे आजार येऊ शकतात. सुमारे 15 हजार विषाणू प्राण्यांपासून मानवापर्यंत पोहोचू शकतात, असा दावा करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, प्राण्यांपासून माणसांमध्ये आजार पसरण्याच्या घटना दिसू लागल्या आहेत. कोविड-19 (Covid-19) हे त्याचं एक उदाहरण असून, 2070 पर्यंत अशा प्रकारचे हजारो साथीचे आजार येऊ शकतात.

या संशोधनावर स्पेनच्या अल्काला युनिव्हर्सिटीचे इकॉलॉजिस्ट इग्नासियो मोरेल्स कास्टीला यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, ``ज्या मॉडेलच्या आधारे हे संशोधन करण्यात आलं आहे, ते बिनचूक आहे. जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर विषाणूंची देवाणघेवाण होईल आणि ही स्थिती पृथ्वीवरील माणूस आणि प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकते.``

Smoothie मुळे तरुणाची झाली इतकी भयंकर अवस्था; डोळ्यासमोर दिसला मृत्यू

येत्या 50 वर्षांत येणाऱ्या साथीच्या आजारांमागे हवामान बदल (Climate Change) आणि जागतिक तापमान वाढ (Global Warming) ही प्रमुख कारणं असतील. जगभरात तापमानवाढीमुळे जंगलात राहणारे जीव, प्राण्यांच्या अधिवासांमध्ये बदल होईल. जर तापमान 2 अंश सेल्सियसने वाढलं तर सस्तन प्राणी थंड प्रदेशाच्या शोधात दुसऱ्या भागात स्थलांतरित होतील. असं झाल्यास आजार आणि विषाणूंचा संसर्ग अशा दोन्ही गोष्टी वाढतील. परिणामी, या गोष्टी माणसांपर्यंत पोहोचतील.

``आफ्रिका (Africa) आणि आशिया (Asia) हे विषाणूंचे हॉटस्पॉट असतील. या भागात संसर्गाची प्रकरणं वाढू शकतात आणि त्यातून विषाणू एक नवी महामारी आणू शकतात. कोविड-19 च्या बाबतीत असंच काहीसं घडलं आणि जगभरात एकच खळबळ उडाली आहे. हे दोन्ही प्रदेश जास्त लोकसंख्येचे असून, हेच या मागचं प्रमुख कारण आहे,`` असं शास्त्रज्ञ सांगतात.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ``आशियात भारत आणि इंडोनेशियासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये विषाणूंचा फैलाव होण्याचा धोका अधिक आहे. दुर्दैवानं ही प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रिया थोपवण्यासाठी जगातल्या सर्व देशांनी एकत्र येत कार्बन उत्सर्जन कमी करणं आवश्यक आहे. अन्यथा ही गोष्ट प्राणी आणि माणसांसाठी धोकादायक ठरू शकते.``

First published:

Tags: Coronavirus, Virus