नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : आजच्या धावपळीच्या जीवनात काही आनंदाचे, मौजमजेचे क्षण घालवण्याची इच्छा प्रत्येकाची असते, मग ती स्त्री असो वा पुरुष. पुरुषांसाठी कधीकधी स्वतःसाठी वेळ शोधणं सोपं असतं, ते त्यांच्या मित्रांसह कुठेतरी बाहेर जाऊ शकतात. अनेकवेळा ऑफिसच्या कामामुळे दौऱ्यावर जाण्याची शक्यता असते. घरीही, कामावरून आल्यानंतर त्यांना एकटाच नो-डिस्टर्बन्स झोन मिळतो. पण महिलांच्या बाबतीत अशाप्रकारे स्वत:साठी वेळ काढणं फार कठीण असतं. कारण कुटुंब, करिअर आणि सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्यांमुळे त्यांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. आयुष्यातल्या या ‘मी टाईम’ (Me Time) मध्ये स्वतःसाठी वेळ काढण्याचं महत्त्व काहींना कळत नाही. मात्र, विज्ञानानुसार ज्या महिला स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत, त्यांच्या मनात नकारात्मक विचार वाढतात. अशा परिस्थितीत ‘मी टाइम’ म्हणजे स्वतःसोबत वेळ घालवणे हे मानसिक आरोग्य, ऊर्जा आणि तणावमुक्त राहण्यासाठी खूप फायदेशीर (Importance Of ‘Me Time’ For Women) आहे. व्हेरिझॉन मीडियाच्या संशोधनानुसार, तरुण भारतीय महिला दररोज त्यांच्या स्मार्टफोनवर सुमारे 145 मिनिटे घालवतात. आणि ही वेळ त्यांच्या स्वतःची आहे. दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तात मानसशास्त्रज्ञ डॉ. योगिता कादियन (Dr Yogita Kadian) यांनी सांगितले आहे की, अशा अनेक महिला त्यांच्याकडे येतात, ज्या त्यांच्या दैनंदिन कामामुळे आणि भांडणामुळे इतक्या अस्वस्थ आहेत की, त्या तणावाच्या बळी ठरतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये राग आणि चिडचिड खूप वाढते. हे वाचा - हे पदार्थ निष्काळजीपणे खाणं आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; तुम्हीही ही चूक करत नाही ना? स्वत:साठी वेळ का हवा आहे मानसशास्त्रज्ञांच्या मते, महिलांनी मी टाइम फॉर वुमनचे महत्त्व समजून घेतलं पाहिजे. ती जशी घरातील सर्वात लहान सदस्यापासून ते घरातील मोठ्या व्यक्तीची काळजी घेते, तशीच तिने स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे. मुलांना पण तसा वेळ द्या योगिता पुढे म्हणाल्या की, महिलांनी जसा स्वत:साठी वेळ काढला पाहिजे, तसंच मुलांना काही वेळ एकटं सोडायला हवं. जेणेकरून ते इतरांशी चांगले संबंध ठेवू शकतील. हे वाचा - हिवाळ्यात ही पालेभाजी खाण्याचे आहेत भरपूर फायदे; रोगप्रतिकारकशक्ती वाढेल, अनेक आजार राहतील दूर जर मूल संपूर्ण वेळ फक्त तुमच्यासोबत घालवत असेल तर तो तुमच्यावर भावनिकरित्या अवलंबून असेल, जे योग्य नाही. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा आणि काही काळ मुलांना स्वतःपासून दूर ठेवा. हा मी टाइम तुम्हाला स्वतःला चार्ज करण्याची एक चांगली संधी असेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.