जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / पावसात मनसोक्त भिजायला आवडतं, पण आजारी पडण्याची भीती; अशी घ्या आरोग्याची काळजी

पावसात मनसोक्त भिजायला आवडतं, पण आजारी पडण्याची भीती; अशी घ्या आरोग्याची काळजी

पावसात मनसोक्त भिजायला आवडतं, पण आजारी पडण्याची भीती; अशी घ्या आरोग्याची काळजी

पावसात भिजल्यानंतर काय करायला हवं आणि काय नाही ते जाणून घ्या.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    पावसाळा आला की सर्वत्र हिरवळ दिसू लागते. पावसाच्या सरींकडे आणि हिरव्यागार वातावरणात सर्वांना पावसात भिजायला आवडते. पण आपण आजारी पडू याची भीतीही मनात असते. सर्दी-खोकला, ताप येण्याच्या भीतीने मग पावसात भिजायचे टाळले जाते. मुलं तरीही पावसात भिजतातच. काही गोष्टींची काळजी घेतली तर पावसात भिजण्याचा आनंद लुटायला हरकत नाही. चला तर जाणून घेऊया पावसात भिजताना आणि नंतर काय काळजी घ्यावी. केस भिजणार नाही याची काळजी घ्या पावसात भिजताना प्रयत्न करा की केस ओले होणार नाहीत, कारण जर केसात ओलावा राहिला तर मग सर्दी, खोकला, ताप येऊ शकतो. म्हणून मग डोक्यावर प्लॅस्टिकचीटोपी किंवा पॉलीथिन घालावे. शरीरही पावसातून आल्यावर लगेचच कोरडे करावे. कपडे बदलून घ्यावे जास्त वेळ ओले राहू नये, त्याने आजारी होण्याचा धोका वाढतो. भिजल्यानंतर लगेच कपडे बदला आणि शरीराला थोडी उष्णता मिळेल असे पाहा. शरीर सामान्य तापमानाला आले तर आजारी पडण्याचा धोका राहत नाही. पावसात खूप वेळ भिजणार नाही याचीही काळजी घ्या. गरम -गरम चहा किंवा कॉफी घ्या पावसात भिजल्यानंतर गरम-गरम चहा किंवा कॉफी प्या, त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होईल आणि सर्दी होणार नाही. हवे तर तुम्ही काढा बनवूनही पिऊ शकता. चहात मिरे, तुळशी, आले टाकून पिऊ शकता, त्याने रोग प्रतिकारशक्तीदेखील वाढते. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमजोर असते त्यांना जरूर असा चहा द्या. गरम**-गरम** सूप प्या पावसात भिजल्यानंतर तुम्ही आवडीचे सूपही पिऊ शकता. भाज्यांचे सूप घेतल्याने शरीरात चांगली उष्णता निर्माण होते. त्याने रोग प्रतिकारशक्तीसुद्धा वाढते, शरीराला क्षारही मिळतात. मुलांना सूप आवडते, त्यांना सूप दिल्यास त्यांच्या शरीराला उष्णता मिळेल. सूपमध्ये आले, मिरे, लसूण यासारख्या घरगुती औषधांचा उपयोग करू शकता. myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल यांच्या सांगण्यानुसार, पावसाळ्यात लसुणयुक्त सूप आणि वरणाचे सेवन केले पाहिजे. पावसात भिजल्यावर यामुळे येते आजारपण पावसात भिजल्य्यावर आपण आजारी पडतो, आणि घरगती उपायांनी बरेही होतो, पण हे जाणून घेणे निश्चितच फायद्याचे होईल की आपण आजारी का पडतो? याचे कारण आहे, जेव्हा आपण घरात अंघोळ करतो ते पाणी सामान्य तापमानाचे असते. पण पावसाचे पाणी म्हणजे लहान-लहान बर्फाचे तुकडे विरघळून सरींच्या रुपात पडते त्यामुळे ते जास्त थंड असते. हे थंड पाणी डोक्यावर पडल्याने शरीराचे तापमान वेगाने कमी होते. शरीराच्या तापमान असं अचानक कमी झाल्यानंतर प्रतिकारशक्ती सांभाळू शकत नाही. मग सर्दी, खोकला, ताप हे आजार होतात. myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल म्हणतात की, पावसाळ्यात टरबूज, तीळ, शेंगदाणे, मोहरीचे तेल, पचायला जड पदार्थ, मासे, मटण खाणे टाळले पाहिजे. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - नाक वाहणे: लक्षणे, कारणे, उपचार, औषध, अटकाव… न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात