मायग्रेनचा त्रास कमी करण्यासाठी आधी त्याची कारणं ओळखायला हवीत. डोकं दुखत असेल तर, दुर्लक्ष करण्यापेक्षा नेमकं कोणत्यावेळी डोकं दुखायला लागतं हे ओळखायला शिकलं पाहिजे. तीव्र वास, डिहायड्रेशन, एल्कोहोल यामुळे मायग्रेनचा त्रास होतो. वातावरणातील बदलामुळेही मायग्रेन होतो.
पुरुषांच्या तुलनेत महिलांना मायग्रेनचा त्रास जास्त होतो. तज्ज्ञांच्या मते महिलांच्या मायग्रेनमध्ये मेन्स्टुअल सायकलची महत्त्वाची भूमिका असते. काही महिलांना पिरेडच्या काळात मायग्रेनचा त्रास होतो. पाळीच्या काळात प्रोजेस्टेरॉन आणि एस्टेरॉन हार्मोन्समधील चढउतार मायग्रेनला ट्रिगर करतात.
तीव्र प्रकाश आणि गोंगाटामुळेही मायग्रेन होतो. अशावेळेस शांत ठिकाणा राहण्याचा प्रयत्न करा. मायग्रेन झाला असेल तेव्हा घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी रहा.
न खाणं किंवा जास्त वेळ उपाशी राहण्यानेही मायग्रेन होतो. तज्ज्ञांच्या मते हेल्दी डाएटसाठी वेळ द्यायला हवा. ऑफिस मध्ये जेवायला वेळ देता येत नसेल तर, जवळ काही स्नॅक्स किंवा ड्रायफ्रुट ठेवावेत. भूक लागल्यावर जेवायला वेळ नसेल तर, थोडंथोडं खात रहावं.
महिन्यातले 15 दिवस मायग्रेन होत असेल तर, डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रॉनिक मायग्रेन प्रिवेन्शन मेडिकेशन घ्यावं. बोटुलिनम टॉक्सिन इंजेक्शननेही फरक पडतो.
मायग्रेनचा त्रास होत असेल तर, कुटुंबाची मदत घ्या. वेदना होत असताना शरीराला आराम मिळाला तर, वेदना कमी होऊ शकतात. त्यामुळे कामातून वेळ काढून आराम करावा.
अपूऱ्या झोपेमुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. झोप पूर्ण होत नसेल तर, झोपेसाठी वेळ देता येईल असं शेड्यूल तयार करावं.
स्ट्रेस एक कॉमन मायग्रेन ट्रिगर आहे. डोक्यावर ताण वाढवणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. दीर्घ श्वास घ्या, बायोफीडबॅक एक्सरसाइज किंवा वर्कआउटने स्ट्रेस कमी होतो. आवडत्या संगीताचा वार करुन मेडिटेशवन करा.