Home /News /lifestyle /

अंड्याची कवचं काढून फेकण्याऐवजी त्याचा असा करा उपयोग; स्कीन दिसेल Glowing & Young

अंड्याची कवचं काढून फेकण्याऐवजी त्याचा असा करा उपयोग; स्कीन दिसेल Glowing & Young

Egg Shells For Skincare : अंड्याची साल त्वचेला नैसर्गिकरित्या चमकदार बनवण्यासह मुरुम, सुरकुत्या इत्यादी घालवण्यासाठी खूप मदत करते. त्याचा योग्य वापर केल्यास चेहरा तजेलदार, निर्दोष तसेच तरुण बनण्यास मदत होते.

    मुंबई, 20 फेब्रुवारी : सहसा आपण अंडी बनवतो तेव्हा अंड्याची टरफले (Egg Shells) डस्टबिनमध्ये टाकतो. पण या अंड्याच्या कवचात आरोग्याचं रहस्य दडलेलं आहे. अंड्याच्या कवचामध्ये कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे त्वचा (Skincare) सहज चांगली होण्यास मदत होते. अंड्याची साल त्वचेला नैसर्गिकरित्या चमकदार बनवण्यासह मुरुम, सुरकुत्या इत्यादी घालवण्यासाठी खूप मदत करते. त्याचा योग्य वापर केल्यास चेहरा तजेलदार, निर्दोष तसेच तरुण बनण्यास मदत होते. याचा वापर आपण फेस पॅक (Face Pack) म्हणून करू (Egg Shells For Skincare) शकता. अशा प्रकारे अंड्याची कवचं वापरा - प्रथम अंड्याची कवचं वाहत्या पाण्यात धुवून घ्या आणि ती पूर्णपणे वाळवा. आता अंडी फोडल्यानंतर एका भांड्यात ठेवा आणि पुन्हा कवचं धुवा आणि उन्हात वाळवा. वाळल्यावर ते ठेचून फोडून बारीक करून पावडर बनवावी. आता तुम्ही ते एका बॉक्समध्ये देखील ठेवू शकता आणि गरजेनुसार वापरू शकता. फेस पॅक कसा बनवायचा साहित्य एक चमचा मध, एक चमचा दूध, गुलाबपाणी, अर्धा चमचा बेसन, 1 चमचा झेंडूच्या फुलाचा रस, अंड्याच्या कवचाची पूड, अंड्याचा पांढरा भाग. असा फेस पॅक बनवा एका भांड्यात अंड्याचा पांढरा भाग काढा. यानंतर, थोडासा 'फोम' म्हणजेच फेस तयार होईपर्यंत फेटून घ्या. हे वाचा - Eggs Tips: चुकूनही अंडी फ्रीजमध्ये ठेवू नका; नाहक हे त्रास मागे लागतील आता दुसर्‍या भांड्यात एक चमचा अंड्याच्या कवचाची पावडर थोडेसे गुलाबजल टाकून मिक्स करा. आता त्यात मध, दूध आणि बेसन आणि अंड्याचा पांढरा भाग घालून मिक्स करा. शेवटी झेंडूच्या फुलांचा रस घालून पुन्हा मिसळा. आता 5 मिनिटे तसेच राहू द्या. हे वाचा - Weight Loss Tips: अंडी कि पनीर? वाढलेलं वजन कमी करण्यासाठी कशात असतात जास्त Protein असे वापरा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. अंड्याचा हा फेस पॅक चेहरा आणि मानेला चांगला लावा. ते चांगले सुकल्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा. हा पॅक आठवड्यातून 1-2 वेळा लावा. (सूचना: येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beauty tips, Health Tips

    पुढील बातम्या