नवी दिल्ली, 26 जानेवारी : हल्ली फ्रीज ही प्रत्येक घराची गरज बनली आहे. खाद्यपदार्थ खराब होऊ नयेत, यासाठी रेफ्रिजरेटरचा वापर केला जातो. एखादा खाद्यपदार्थ जास्त काळ साठवायचा असेल तर फ्रीजसोबत फ्रीझरचाही वापर होतो. फ्रीजरचं तापमान फ्रीजच्या तुलनेत खूपच कमी असतं. त्यामुळेच एखादा खाद्यपदार्थ जास्त काळ सुरक्षित ठेवायचा असेल तर फ्रीझरचा वापर केला जातो. मात्र, फ्रीझर वापरत असूनही, फ्रीझरचा योग्य वापर करण्याच्या पद्धतींबाबत अनेकांना (Freezer storage Tips) अजूनही माहिती नाही.
फ्रिजरमध्ये खाद्यपदार्थ ठेवताना लक्षात ठेवण्यासंबंधीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. या टिप्सचा अवलंब केल्यानं, तुम्ही सहजपणे दीर्घकाळ पदार्थ साठवू शकाल. यासोबतच तुमचा फ्रीजरही बराच काळ कार्यरत स्थितीत राहू शकेल.
या गोष्टी लक्षात ठेवा
1. अन्न थंड झाल्यावर साठवा – नेहमी लक्षात ठेवा की, कोणतेही अन्नपदार्थ गरम असताना फ्रीजरमध्ये ठेवू नका. आधी ते थंड करा आणि नंतर फ्रीजरमध्ये ठेवा. फ्रीझरमध्ये गरम अन्न ठेवल्यानं फ्रीझरचं तापमान वाढते आणि फ्रीजरमध्ये आधीच ठेवलेलं इतर अन्न डिफ्रॉस्ट होऊ शकतं. जर अन्न मोठ्या प्रमाणात असेल तर ते फ्रीजरमध्ये काही भागांमध्ये ठेवल्याने थंड होण्याची प्रक्रिया वेगानं होते.
2. पदार्थ नीट रॅप करून ठेवा - फ्रीजरमध्ये अन्न ठेवण्यापूर्वी, ते व्यवस्थित झाकून भाज्या गुंडाळून ठेवणं आवश्यक आहे. असं न केल्यास 'फ्रीझर बर्न' होऊ शकते. यामध्ये अन्नामध्ये असलेलं पाणी बाहेर पडू शकतं आणि अन्नातील पाण्याची पातळी कमी होऊन ते अधिक कोरडं होऊ शकतं. ज्यामुळं अन्नाची गुणवत्ता खराब होते. मात्र, तरीही अन्न खाण्यासाठी सुरक्षित राहतं.
3. जास्त प्रमाणात साठवणं टाळा - फ्रीजरमध्ये आवश्यक तेवढेच अन्नपदार्थ साठवा. उदाहरणार्थ, 4 सदस्यांचं कुटुंब असल्यास, 8 लोकांना पुरेल एवढं अन्न साठवण्याचा ट्रेंड टाळा. फ्रीजर खूप भरलेला असल्यास, त्याचं कामकाजाचं आयुष्यदेखील कमी होतं, लवकर खराब होतो.
हे वाचा - Refrigerated atta: तुम्हीही मळलेलं पीठ फ्रीजमध्ये ठेवता का? त्याचे हे परिणाम जाणून घ्या
4. लेबलिंग - जर तुम्ही फ्रीजरमध्ये अनेक खाद्यपदार्थ ठेवत असाल तर, त्यांना लेबल करणं हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. याअंतर्गत, कच्चं अन्न आणि शिजवलेलं अन्न स्वतंत्रपणे चिन्हांकित केलं जाऊ शकतं. यासह, आपण त्या पदार्थांवर फ्रीजरमध्ये ठेवण्यासाठी तारीखदेखील लिहून ठेवू शकता.
हे वाचा - Eggs Tips: चुकूनही अंडी फ्रीजमध्ये ठेवू नका; नाहक हे त्रास मागे लागतील
5. बर्फ गोठू देऊ नका - जर तुम्ही फ्रीजर वापरत असाल तर लक्षात ठेवा की त्यात बर्फ जमा होऊ देऊ नका. बर्फ जमल्यास, आपण काही काळ फ्रीझर डीफ्रॉस्ट करू शकता. या काळात साठवलेल्या अन्नपदार्थांची काळजी करू नका. वास्तविक, फ्रीजरमध्ये ठेवलेल्या वस्तू फ्रीझर डीफ्रॉस्ट झाल्यानंतरही कित्येक तास व्यवस्थित राहतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.