सणाच्या काळात हँडशेक नको, आपला राम रामच बरा गड्या; या चुकीच्या गोष्टी देत आहेत कोरोनाला आमंत्रण

सणाच्या काळात हँडशेक नको, आपला राम रामच बरा गड्या; या चुकीच्या गोष्टी देत आहेत कोरोनाला आमंत्रण

नवरात्री आणि दसऱ्यानिमित्त आपण अनेकांना भेटण्याचे प्लान बनवत असाल. पण जरा थांबा कोरोना अजूनही गेलेला नाही. नवरात्रीच्या काळात काही सूचनांचं कटाक्षाने पालन केलं तर आपल्याला रोगाचा धोका कमी होईल. कोणत्या आहेत या साध्या गोष्टी? जाणून घ्या

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर:  सध्या सगळीकडे सणाचा उत्साह आहे. नवरात्र आणि दसऱ्यानिमित्त आपण आपला मित्र परिवार आणि नातलगांना भेटण्याचे प्लान बनवत असतो. नवरात्रीनंतर लगेचच दिवाळी सुद्धा आहे. परंतु या वर्षीची परिस्थिती नेहमीसारखी नाही. कोरोना (Corona) अजूनही संपलेला नाही हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन, सण साजरे करताना आपलं कुटुंब आणि मित्र निरोगी व सुरक्षित आहेत हे सुनिश्चित करणं आवश्यक आहे. विषाणू (Corona Virus)चं संक्रमण टाळण्यासाठी आणि सुरक्षित राहण्यासाठी येथे काही टिप्स दिल्या आहेत.

SOP चे पालन करा: Covid-19 च्या संपर्कात न येण्यासाठी लोकांनी प्रतिबंधात्मक उपाय आणि खबरदारी घ्यावी. आपण आणि आपले प्रियजन सुरक्षित रहावं, यासाठी आपण काही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि वेळोवेळी साबणाने किंवा सॅनिटाइझरने आपले हात धुवावे. हे काही प्रतिबंधात्मक उपाय आहेत, जे आपण सहज पाळू शकतो.

 कोणतीही लक्षणं तपासून घ्याः ज्यांना विषाणूचा संसर्ग झाला आहे ते रोगप्रतिकारक करू शकतात, पण त्यांना संसर्ग झाल्याचं लक्षात येत नाही म्हणूनच थोडीशी लक्षणं असल्यास दुर्लक्ष न करता याची खात्री करा. इतरांना धोका होऊ नये यासाठी व आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी सण आपल्या घरीच कमीत कमी लोकांच्या उपस्थितीत साजरे करा. कुटुंबातील ज्या सदस्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांची काळजी घ्या.

गृहितकं टाळा : जगभरात अनेक लोकांना Covid-19 ची लागण झाली आहे आणि बरेच लोक त्यातून बरे सुद्धा झाले आहेत. परंतु ह्या कारणांनी काही लोक निष्काळजीपणा दाखवत प्रतिबंधात्मक उपायांचं पालन करत नाहीत आणि असा विचार करतात की, त्यांना हा रोग होणार नाही किंवा झाला तरी बरा होईल. परंतु या रोगावरची लस जगात कुठेही नसल्यामुळे असा विचार करून चालणार नाही. अशाने पुन्हा संक्रमण आणि तीव्रतेचं प्रमाण वाढू शकतं.

अभिवादन : कोणालाही भेटताना हात मिळवण्यापेक्षा 'नमस्कार' या भारतीय अभिवादन पद्धतीने भेटा. जगभरात कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अनेक घोषणांमध्ये हात मिळावण्यापेक्षा नमस्कार करण्याचा उल्लेख झाला. यामुळे आपल्याया आणि आपल्या आप्तस्वकीयांना कोरोनाचा धोका कमी होईल.

बाहेरचं खाणं टाळा: शिजवलेल्या अन्नातून या विषाणूचा प्रसार होतो असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, तरीही आपण सणादरम्यान घराबाहेर न खाणं चांगलं. गर्दीच्या ठिकाणी संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते आणि यामुळे पोटातील इतर संक्रमणदेखील होऊ शकतं त्यामुळे आपल्या प्रतिकारशक्तीवर आणि एकूण आरोग्यावर परिणाम होईल.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 21, 2020, 2:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading