Home /News /lifestyle /

पासपोर्टवर पार्टनरचं नाव कसं टाकायचं किंवा काढायचं? जाणून घ्या सविस्तर

पासपोर्टवर पार्टनरचं नाव कसं टाकायचं किंवा काढायचं? जाणून घ्या सविस्तर

पासपोर्टमधून तुमच्या जोडीदाराचं नाव फक्त दोन केसेसमध्ये काढलं जाऊ शकतं. पहिलं म्हणजे जर तुम्ही दोघं घटस्फोट घेऊन वेगळे झाला असाल तर आणि दुसरं म्हणजे तुमच्या जोडीदाराचा मृत्यू झाला असेल तर, तुम्ही त्याचं नाव हटवू शकता.

नवी दिल्ली, 03 जुलै: अनेकदा अनेक लोक पासपोर्टमध्ये (Passport) त्यांच्या जोडीदाराचं नाव (Partner Name) वाढवतात. तर काही जणांना वेगवेगळ्या कारणांमुळे त्यांच्या जोडीदाराचं नाव पासपोर्टमधून काढून टाकायचं असतं. पासपोर्टवर नाव वाढवण्याचं किंवा काढण्याचं काम काही कागदपत्रांच्या मदतीने अगदी सहज करता येतं. एक महत्वाचं लक्षात घ्या की, पासपोर्टमधून तुमच्या जोडीदाराचं नाव फक्त दोन केसेसमध्ये काढलं जाऊ शकतं. पहिलं म्हणजे जर तुम्ही दोघं घटस्फोट घेऊन वेगळे झाला असाल तर आणि दुसरं म्हणजे तुमच्या जोडीदाराचा मृत्यू झाला असेल तर, तुम्ही त्याचं नाव हटवू शकता. पासपोर्टवरून नाव हटवण्यासाठी काही कागदपत्रं (Document) आवश्यक असतात. शिवाय हे काम तुम्ही घरी बसूनही करू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला पासपोर्टमध्‍ये तुमच्‍या पार्टनरचं नाव कसं वाढवायचं किंवा कसं काढायचं, याबद्दल सांगणार आहोत. आधी आपण पासपोर्टमध्ये नाव वाढवण्याबद्दल जाणून घेऊ आणि नंतर पासपोर्टमधून नाव काढून टाकण्याबद्दल. हेही वाचा - Shani Dev: म्हणून अनेकांवर शनिदेवाची पडते वक्रदृष्टी; अशा गोष्टी लागोपाठ घडत जातात कसं वाढवायचं पार्टनरचं नाव यासाठी तुम्हाला ओरिजनल पासपोर्ट (Original Passport), पासपोर्टच्या पहिल्या आणि शेवटच्या पृष्ठाची कॉपी, ऑब्झर्वेशन पेज, ECR Non-ERC पेज आणि जर तुमच्या पासपोर्टची वैधता कमी असेल तर व्हॅलिडीटी पेज देखील ऑनलाइन सबमिट करावं लागेल. यानंतर, तुम्ही पासपोर्टमध्ये पार्टनरचे नाव 2 प्रकारे जोडू शकता. यासाठी, आधी तुम्हाला पासपोर्ट सेवा ऑनलाइन पोर्टलवर (Passport seva Online Portal) स्वतःची नोंदणी करावी लागेल. जर तुम्ही आधीच युजर असाल तर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करा. नंतर Apply for a fresh passport / Re-Issue च्या लिंकवर क्लिक करा. तिथे मागितलेली सर्व माहिती भरून सबमिट करा. त्यानंतर पे आणि शेड्यूल अपॉइंटमेंटवर क्लिक करा. अर्जाच्या पावतीची प्रिंट आउट घ्या आणि ठरलेल्या तारखेला तुमच्या जवळच्या पासपोर्ट ऑफिसला भेट देऊन याची शेवटची फॉरमॅलिटी पूर्ण करा. याशिवाय तुम्ही पासपोर्ट सेवा केंद्राच्या अधिकृत वेबसाइटवरून XML फॉरमॅटमध्ये ई-फॉर्म डाउनलोड करा. तो भरा आणि पासवर्ड सेवा ऑनलाइन पोर्टलवर अपलोड करून पेमेंट करा. नंतर शेवटच्या टप्प्यातील फॉरमॅलिटीसाठी तुम्हाला जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात जावं लागेल. कसं काढायचं पार्टनरचं नाव यासाठी सुरुवातीच्या काही स्टेप्स वर नमूद केल्याप्रमाणेच असतील. पासपोर्ट री-इश्यू करताना, तुम्हाला change in existing personal particular वर क्लिक करावं लागेल. नंतर spouse name पर्याय निवडा आणि आवश्यक बदल करा. ऑनलाइन पेपरवर्क पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ठराविक तारखेला पासपोर्ट सेवा केंद्राला भेट द्यावी लागेल. तिथे कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अपडेटेड डिटेल्ससह नवीन पासपोर्ट मिळेल.
First published:

Tags: Lifestyle, Passport

पुढील बातम्या