• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Health Tips: प्रोटिन शेक पिण्याचे हे आहेत बहुमोल फायदे, असा तयार करा घरच्या घरी

Health Tips: प्रोटिन शेक पिण्याचे हे आहेत बहुमोल फायदे, असा तयार करा घरच्या घरी

Protein Shake at Home: प्रोटिन शेक केवळ बॉडिबिल्डर्ससाठीच नाही तर सगळ्यांसाठीच रोजच्या आयुष्यात उपयोगी आहे.

 • Share this:
  मुंबई, 30 ऑगस्ट :: तुम्हाला कामाच्या दरम्यान जेवायला वेळ मिळत नाही? सकाळी बराच नाश्ता केल्यावर तुम्ही थेट रात्रीचं जेवण करता आणि मधल्या वेळेत असंच अबरचबर काहीही खाता का? यातून तुम्ही आजारी पडू शकता. (health tips) कामादरम्यान तुम्ही काहीतरी हेल्दी खात राहिलं पाहिजे. प्रोटीन शेक हा उत्तम पर्याय आहे. यातून खूप ऊर्जा मिळते. हा तुम्ही घरीही बनवू शकता. होममेड प्रोटीन शेक पिण्याचे फायदे अनेक आहेत. जाणून घ्या घरी प्रोटीन शेक कसा बनवायचा. (benefits of drinking protein shake) डार्क चॉकलेट आणि केळी वापरा ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्ही घरीच प्रोटीन शेक बनवू इच्छित असाल तर त्याची कृती अगदी सोपी आहे. हे साहित्य त्यासाठी लागेल. (how to make protein shake at home) 1 केळी 1 कप दूध 1 चमचा चॉकलेट प्रोटीन पावडर 2 चमचे डार्क चॉकलेट कृती केल्याची सालं काढा आणि केळीचे लहान-लहान तुकडे करा. आता त्यात डार्क चॉकलेट आणि चॉकलेट प्रोटीन पावडर टाकून मिक्सरमध्ये 2 मिनिट फिरवा. आता यात दूध टाकून 5 मिनिट मिक्सर चालवा. सगळं साहित्य एकमेकात चांगलं मिसळल्यावर हे सगळं एका ग्लासात काढून घ्या. (protein shake for daily life) हेही वाचा नैराश्यातून प्रेरणेकडे! मुंबईची 'वजनदार' डान्सर बदलतेय Belly Dancer ची प्रतिमा होममेड प्रोटीन शेकचे फायदे - प्रोटीन शेक पिल्यानं शरीरात ऊर्जा टिकून राहते. थकवा दूर होतो. अगदी ताजंतवानं वाटतं. प्रोटीन शेक बॉडीबिल्डिंगसाठी खूप महत्त्वाचा असतो. वर्कआउटनंतर प्रोटीन शेक पिल्यावर मांसपेशींचा विकास होता. (easy protein shake at home) एनर्जी लॉस झाल्यावर शरीराला पुन्हा चार्ज करण्याची गरज पडते. यासाठी प्रोटीन शेक सर्वात चांगला पर्याय मानला जातो. हेही वाचा व्हायचं नसेल ‘Emotional Fool’ तर अशाप्रकारे भावनांवर ठेवा ताबा; वापरा 8 Tips शिवाय हे पिल्यानं शरीराच्या वेदना, अंगदुखी दूर होते. स्नायू दुरुस्त होतात. होममेड प्रोटीन शेक पिल्यानं शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर होते. (Disclaimer -  या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
  Published by:News18 Desk
  First published: