मसूरची डाळ ही आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असते. भरपूर प्रोटीन आणि मिनरल्सने संपन्न असलेली ही डाळ आरोग्यासोबतच त्वचेची सुंदरता वाढवण्यासाठी देखील उपयोगी ठरते. मसूरच्या डाळीने तयार केलेला फेस पॅक त्वचेच्या समस्या दूर ठेवतात. तेव्हा त्वचेवर केमिकल प्रॉडक्ट लावण्यापेक्षा नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्यास त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. मसूरच्या डाळीचा फेसपॅक कसा बनवावा : पहिली कृती : 3 ते 4 चमचे मसूर घेऊन मिक्सरमध्ये चांगले वाटून घ्या. मग त्यात दोन चमचे दही मिसळा मग चेहरा आणि मानेला लावा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात चिमूटभर हळद घालू शकता. असे केल्याने चेहऱ्यावर झटपट चमक येण्यास मदत होईल.
दुसरी कृती : 3 ते 4 चमचे मसूर डाळ घेऊन रात्री त्याला भिजत ठेवा. मग सकाळी त्याची पेस्ट बनवा आणि त्वचेवर लावा. मग हलक्या हाताने त्वचेवर मसाज करा आणि 15 मिनिटांनंतर चेहेरा धुवून टाका. यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाईल आणि चेहेरा ग्लो करेल. तिसरी कृती : 3 ते 4 चमचे मसूर डाळ घेऊन त्यात दूध टाका आणि सुमारे चार तास भिजवून ठेवा. मग त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा, यामुळे चेहेऱ्यावरील डाग निघून जातील. Morning Routine : पावसाळ्यात प्या 5 प्रकारच्या चहा, सर्दी खोकल्यापासून मिळेल आराम चौथी कृती : रात्री 2 ते 3 चमचे मसूर डाळ भिजवून सकाळी त्यात 4 चमचे एलोवेरा जेलसोबत एकत्र करून पेस्ट बनवा. मग या पेस्टला चेहरा आणि मानेवर लावा आणि काही मिनिटे मसाज करा. 20 मिनिटानंतर त्वचा पाण्याने धुवा. असे केल्याने चेहऱ्यावरील पिंपल्स कमी होतील आणि चेहरा ग्लो करेल.