• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • काळे, घनदाट आणि सुंदर केस हवेत; घरच्या घरी हा Herbal Shampoo तयार करून वापरा

काळे, घनदाट आणि सुंदर केस हवेत; घरच्या घरी हा Herbal Shampoo तयार करून वापरा

Homemade Herbal Shampoo: बाजारात उपलब्ध असलेले शॅम्पू हे अनेक रासायनिक घटकांनी बनलेले असतात, त्याचा केसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. यावर उपाय म्हणून तुम्ही घरच्या घरी हर्बल शॅम्पू तयार करू शकता, कसे ते पाहुया.

 • Share this:
  नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर : केस गळणे, तुटणे तसेच रुक्ष होणं ही केसांची सामान्य समस्या आहे. अशा परिस्थितीत केसांचे आरोग्य आणि सौंदर्य चांगले राखण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारे केसांची काळजी घेत असतात. यासाठी अनेकजण बाजारातील केस सौंदर्य उत्पादनांची मदत घेत राहतात. या उत्पादनांमध्ये शाम्पूचाही समावेश आहे. केसांना मजबूत, रेशमी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्ही वापरत असलेले शॅम्पू (Shampoo) हे मुख्यतः केवळ रासायनिक घटकांनी बनलेले असतात. जे तुमच्या केसांना झटपट सौंदर्य देऊ शकतात. परंतु, आपण त्यातून क्वचितच कायमस्वरूपी चांगले केस आणि त्यांचे सौंदर्य मिळवू शकतो. जर तुमचे केस कायमचे काळे, घनदाट, लांब, मजबूत, रेशमी आणि चमकदार असावेत, असे तुम्हाला वाटत असेल. तर तुम्ही घरातच एक हर्बल शॅम्पू बनवू (Homemade Herbal Shampoo) शकता, त्याचा केसांच्या आरोग्यासाठी चांगला फायदा होईल. हर्बल शॅम्पू बनवण्यासाठी साहित्य सुका आवळा - 100 ग्रॅम रिठा - 100 ग्रॅम शिकेकाई - 100 ग्रॅम मेथीचे दाणे - 50 ग्रॅम हे वाचा - विकृताने पुण्यातील महिला डॉक्टरच्या संसारात कालवलं विष; NUDE होण्यास भाग पाडलं अन्… हर्बल शॅम्पू (Herbal shampoo) कसा बनवायचा - घरी हर्बल शाम्पू बनवण्यासाठी आधी आवळा, रीठा, शिकाकाई आणि मेथीचे दाणे स्वच्छ पाण्याने धुवा. नंतर त्यांना रात्रभर दोन ग्लास पाण्यात भिजवा. सकाळी ते सर्व आपल्या हातांनी चांगले मॅश करा आणि ते शिजवण्यासाठी गॅसवर ठेवा. लक्षात ठेवा की या वेळी गॅसची ज्योत मंद ठेवावी लागते. जेव्हा त्याचे पाणी दोन ग्लासांपासून एका ग्लासपर्यंत शिल्लक राहील, तेव्हा गॅस बंद करा आणि थंड होऊ द्या. जेव्हा ते चांगले थंड होते, ते दुसऱ्या भांड्यात गाळून घ्या आणि नंतर एका बाटलीमध्ये ठेवा. तर या पद्धतीनं तुमचा होममेड हर्बल शॅम्पू तयार आहे. हे वाचा - World Spine Day: जाणून घ्या मणक्याच्या त्रासाची 3 प्रमुख कारणं; तज्ज्ञांनी सांगितले ‘हे’ उपाय हर्बल शॅम्पूचे फायदे या घरगुती हर्बल शॅम्पूने तुमचे केस गळणे थांबेल. यासह, केस नैसर्गिक पद्धतीने काळे आणि घनदाट होऊ लागतील. एवढेच नाही तर हे शॅम्पू  तुमच्या केसांची चमक वाढवण्यास मदत करेल. या शॅम्पूचा वापर केल्याने तुम्हाला कोंड्याच्या समस्येपासून सुटका मिळेल. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. कृपया त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)
  Published by:News18 Desk
  First published: