नवी दिल्ली, 03 डिसेंबर : दाट, मुलायम, काळे आणि लांब केस प्रत्येकाला हवे असतात. यासाठी कोणते तेल, हेअर मास्क इत्यादी वापरावं, हे लोकांना माहीत नाही. पण इथे आम्ही तुम्हाला असाच एक उपाय सांगत आहोत, जो वापरायला अगदी सोपा असून केसांच्या वाढीसाठीही खूप फायदेशीर आणि प्रभावी आहे. पेरूच्या झाडाची हिरवी पानं केसांच्या आरोग्यासाठी रामबाण औषध आहे. केसांची निगा राखण्यासाठी नियमितपणे याचा वापर केल्यास केस निरोगी आणि सुंदर तर होतीलच; शिवाय, केसांची वाढही झपाट्याने होईल. चला तर मग जाणून घेऊया आपण या पेरूच्या पानांचा वापर (How To Make Long Hair) कसा करू शकतो. अशा प्रकारे बनवा पेरूच्या पानांचा हेअर पॅक सर्व प्रथम 15 ते 20 पेरूची पानं धुवून वाळवा. आता मिक्सरमध्ये पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट एका भांड्यात ठेवा आणि केसांच्या मुळांना लावा. पूर्णपणे लावून झाल्यावर, काही मिनिटं आपल्या बोटांनी हळूवारपणे मालिश करा. आता हेअरबँडच्या मदतीने केस बांधा आणि 30-40 मिनिटे राहू द्या. ते सुकल्यावर साध्या पाण्याने धुवावे. केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पू वापरा. आठवड्यातून दोनदा हा हेअर पॅक केसांना लावल्यास केसांची वाढ लवकर होते. हे वाचा - Health Tips: तुम्हाला माहीत आहे का? या गोष्टी शिजवून खाणं आरोग्यासाठी असतं अपायकारक पेरूच्या पानांचं पाणी वापरा पेरूची काही पानं धुवून एक लिटर पाण्यात उकळा. 15 ते 20 मिनिटं उकळल्यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर गाळून बाटलीत साठवून ठेवा. सौम्य शाम्पूनं केस धुवा आणि कोरडे झाल्यानंतर स्प्रे बाटलीच्या मदतीनं केसांच्या मुळांवर लावा. 10 मिनिटं मसाज करा आणि पुढील काही तास केसांवर राहू द्या. त्यानंतर साध्या पाण्यानं केस धुवा. हे वाचा - Mental Health : काही केल्या मनातून नकारात्मक विचार जात नाहीयेत; या 5 उपायांनी त्यांना पळवून लावा तेल वापरा पेरूची काही पाने धुवून ब्लेंडरमध्ये टाका आणि जाडसर पेस्ट तयार करा. आता एका छोट्या कांद्याची प्युरी बनवा. आता एका कपड्यात ठेवून त्यातून कांद्याचा रस पिळून घ्या. आता कांद्याच्या रसात पेरूची पानं आणि खोबरेल तेलाची पेस्ट मिसळा. ते केसांच्या मुळांवर लावा आणि बोटांनी चांगली मालिश करा. अर्ध्या तासानंतर स्वच्छ धुवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.