अन्नपदार्थ रुचकर होण्यासाठी विविध प्रकारचे मसाले, लसूण, धणे, जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा वापर केला जातो. यासोबत प्रत्येक घरात कोथिंबिरीचा आवर्जून वापर होतो. कोथिंबिरीमुळे पदार्थांना उत्तम स्वाद येतो. बाजारात काही विक्रेते इतर भाज्यांसोबत काही वेळा कोथिंबीर किंवा कढीपत्ता मोफतही देतात. काही वेळा महिला या वस्तू मोफत मिळण्यासाठी विक्रेत्यांसोबत वादही घालतात. काही जण छंद, आवड म्हणून टेरेस गार्डनिंग करतात. टेरेसमध्ये किंवा घराच्या बागेत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड करतात. कोथिंबिरीची अशाच प्रकारे लागवड करता येते. अगदी कुंडीतही कोथिंबिरीची लागवड करता येते. यामुळे तुम्हाला घरची ताजी कोथिंबीर स्वयंपाकासाठी उपलब्ध होऊ शकते. टेरेसमध्ये किंवा घराच्या बागेत कोथिंबिरीची लागवड करण्याची खास पद्धत जाणून घेऊ या. कोथिंबीर, लसूण, आलं यांसारखे पदार्थ जेवणाची चव आणि स्वाद वाढवतात. बाजारात मिळणारी कोथिंबीर ताजी असतेच असे नाही. उन्हाळ्यात बऱ्याचदा कोथिंबीर काहीशी सुकलेली असते; पण चवीसाठी आपण ती खरेदी करतो. ताजी, हिरवीगार कोथिंबीर हवी असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या टेरेसवर किंवा बागेत कोथिंबिरीची लागवड करू शकता. तसं केलं तर, उन्हाळ्यातसुद्धा तुम्हाला ताजी कोथिंबीर अगदी मोफत मिळू शकते. कोथिंबीर लागवडीचं एक सोपं तंत्र आहे. तुम्हाला घरीच कोथिंबिरीची लागवड करायची असेल तर बियाण्याची निवड काळजीपूर्वक करा. कोथिंबिरीचं हायब्रीड बियाणं चांगलं असतं. हे बियाणं कोणत्याही कृषी सेवा केंद्रात मिळू शकतं. या कोथिंबिरीचा स्वाद आणि सुगंध चांगला असतो. किराणा दुकानातूनदेखील कोथिंबिरीचं बियाणं म्हणजेच धणे खरेदी करू शकता.
कोथिंबिरीची वाढ जलद व्हावी यासाठी बियाणं लागवडीपूर्वी उन्हात चांगले वाळवावं. त्यानंतर बियाणं एका दगडाने रगडून त्याचे दोन भाग करावेत. बियाणं रगडताना त्याची पावडर होणार नाही, याची काळजी घ्यावी. कोथिंबीर लावण्यासाठी एका भांड्यात माती, शेणखत घ्या. त्यानंतर हे मिश्रण कोकोपीटमध्ये भरा. हे मिश्रण कोकोपीटच्या चार इंच आत भरले गेले पाहिजे. नंतर दोन दिवस पाणी घालून मातीचं हे मिश्रण ओलसर करा. त्यानंतर त्यात अंकुरलेलं बियाणं घालून मातीने ते झाकून घ्या. त्याला रोज थोडे पाणी घाला. या तंत्रामुळे केवळ चार दिवसात कोथिंबिरीला पानं फुटू लागतील आणि 20 ते 25 दिवसांत खाण्यायोग्य कोथिंबीर येईल. Cooking Tips Marathi : तुमच्या चपात्या फुलत नाहीत का? मग वापरा या सोप्या टिप्स आणि बनवा मऊ लुसलुशीत चपात्या पाच दिवसांत कोथिंबीर हवी असेल तर बियाणं भांड्यात लावण्यापूर्वी अंकुर येणं महत्त्वाचं आहे. यासाठी बियाणं एका सुती कापडात किंवा ज्यूटच्या गोणीत बांधून ठेवा. त्यानंतर पाण्यात भिजवून ते बियाणं राखेत किंवा वाळूत तीन दिवस पुरून ठेवा. त्यावर सातत्याने पाणी शिंपडत राहा. त्यामुळे ते लवकर रुजेल. असं अंकुरित बियाणं लावल्यास कोथिंबिरीचं उत्पादन लवकर सुरू होईल.