मुंबई, 01 डिसेंबर : जेवल्यानंतर अनेकांना पोटात जडपणा किंवा पोट फुगण्याची समस्या जाणवते. काहींना ही समस्या खूप सामान्य वाटत असली तरी ज्यांना याचा त्रास होतो, त्यांनाच त्याची गंभीरता माहीत असते. अशा लोकांसाठी ही समस्या कोणत्याही मोठ्या आजारापेक्षा कमी नाही. कारण पोट फुगते त्यावेळी व्यक्तीला अस्वस्थता, भीती आणि श्वासात जडपणा (Stomach Bloating Home Remedies) जाणवू लागतो.
असे असूनही लोक या समस्येसाठी डॉक्टरांकडे जाण्यास टाळाटाळ करतात. ही समस्या कमी प्रमाणात असल्यास आपण त्यावर काही घरगुती उपाय करू शकतो. या त्रासाबद्दलच्या घरगुती उपायांविषयी आज आपण जाणून घेऊया.
पोट फुगण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही कोरफडीची मदत घेऊ शकता. कोरफडीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे पोट फुगणे आणि पोटातील जळजळ, गॅसेसपासून आराम मिळतो. यासोबतच संसर्गास कारणीभूत असलेल्या बॅक्टेरियांना मारण्यातही ते प्रभावी आहे.
नारळ पाणी
नारळाच्या पाण्यामुळे पोट फुगणे आणि गॅसच्या समस्यांपासूनही सुटका मिळते. नारळाचे पाणी दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आहे. पोट फुगण्याच्या समस्येसह पोटातील सूज कमी करण्यास देखील हे मदत करू शकते.
हे वाचा - घर खरेदी करताना त्यावरील Stamp Duty आणि Registration charges किती हे कसं समजेल?
सफरचंद व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगर देखील गॅस, पोट फुगणे आणि अस्वस्थता यासारख्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. हे पोटाच्या आतील अस्तरांना नुकसान करणारे बॅक्टेरिया काढून टाकते आणि पोटातील अॅसिडची पातळी कमी करण्यास देखील मदत करते.
आलं
पोट फुगण्याची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही आल्याचा देखील वापरू शकता. आल्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाच्या संसर्गामुळे होणारे पोट फुगणे कमी करण्यात त्यामुळे मदत मिळते.
हे वाचा - Healthy Life: हा टेस्टी ब्रेकफास्ट आहे अनुष्का शर्माच्या सडपातळ आरोग्याचे गुपित
जिरे
पोटाच्या समस्या कमी करण्यासाठीही जिरे खूप मदत करतात. जिऱ्यांमध्ये दाहक-विरोधी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे गॅस आणि पोट फुगण्यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle, Stomach pain