जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Monsoon Tips : पावसाळ्यात घरात येतायत लाल मुंग्या? वापरा हे 3 घरगुती उपाय, काही मिनिटांत निघून जातील

Monsoon Tips : पावसाळ्यात घरात येतायत लाल मुंग्या? वापरा हे 3 घरगुती उपाय, काही मिनिटांत निघून जातील

 पावसाळ्यात घरात येतायत लाल मुंग्या? वापरा हे 3 घरगुती उपाय, काही मिनिटांत निघून जातील

पावसाळ्यात घरात येतायत लाल मुंग्या? वापरा हे 3 घरगुती उपाय, काही मिनिटांत निघून जातील

पावसाळा आला की घरात कीटक, पाखरांसह मुंग्या येण्याचे प्रमाण वाढू लागते. तेव्हा या मुंग्यांना पळवण्यासाठी 3 घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

सध्या पावसाचे दिवस सुरु असून काही ठिकाणी रिमझिम तर कुठे मुसळधार स्वरूपाचा पाऊस होत आहे. पावसाळा आला की घरात कीटक, पाखरांसह मुंग्या येण्याचे प्रमाण वाढू लागते. अन्नपदार्थांमध्ये या मुंग्या पडल्या तर याचा आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. ही समस्या जवळपास प्रत्येक ऋतूमध्ये दिसून येते परंतु पावसाळ्यात मुंग्यांचा सर्वाधिक त्रास जाणवतो. तेव्हा या मुंग्यांना पळवण्यासाठी 3 घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात. व्हाईट व्हिनेगर : पावसाळ्यात घरात येणाऱ्या मुंग्यांना घालवण्यासाठी व्हाईट व्हिनेगर उपयोगी ठरू शकते. मुंग्यांना पळवून लावण्यासाठी थोडे पाणी घेऊन व्हाईट व्हिनेगर मिसळा. मग हे मिश्रण वापरून तुम्ही किचन आणि जेथून मुंग्या येत असतील तेथून पुसून काढा. यामुळे काही मिनिटातच मुंग्या पळून जातील. जर भिंतीवर मुंग्या येत असतील तर हे मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये टाकून मुंग्यांच्या ठिकाणी स्प्रे करा.

News18लोकमत
News18लोकमत

पीठ आणि मिठ : मुंग्या पळवून लावायच्या असतील तर त्यावर पीठ आणि मीठ या दोन्ही गोष्टी उपयोगी ठरतात. मुंग्या असलेल्या ठिकाणी पीठ टाका, आणि काही मिनिटात मुंग्या तेथून गायब होतील. तसेच तुम्ही मुंग्यांना घालवण्यासाठी मिठाचा वापर देखील करू शकता. पिठाच्या ऐवजी तुम्ही मिठाचा जरी वापर केला तरी ते परिणामकारक ठरू शकते. घरात मुंग्या येऊ नयेत असे वाटत असेल तर तुम्ही दरवाजे खिडक्या जेथून मुंग्या घरात प्रवेश करतात अशा ठिकाणी मीठ ठेवा जेणेकरून मुंग्या आत येणार नाहीत. Health : फिट राहायचंय? मग दररोज करा हे सोपे व्यायाम, आरोग्याच्या समस्या राहतील दूर लिंबू आणि पाणी : मुंग्यांना घालवण्यासाठी एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी टाकून त्यात लिंबू पिळून घ्या. मग हे मिश्रण तुम्ही जिथे मुंग्या आहेत तिथे स्प्रे करा. यामुळे मुंग्या निघून जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात