तोंडाला वास येण्याची अनेक कारणं असू शकतात. दिवसभरात दोन ते तीन वेळा ब्रश न करणं हे मुख्य कारण असू शकतं. तसेच जेवण झाल्यानंतर चुळ न भरल्यामुळेही तोंडाला वास येऊ शकतो. तसेच पोट साफ नसणं आणि पोटाचे अन्य विकारामुळेही तोंडाला वास येऊ शकतो.
अनेकदा सार्वजनिक ठिकाणी तोंडाला वास आल्यामुळे आपल्यापासून लोकं चार हात लांब राहणं पसंत करतात. अनेकांच्या श्वासातूनही दुर्गंधी येत असते. अशावेळी नक्की काय केले पाहीजे हे फारसं लोकांना माहीत नसतं.
तोंडाला वास येऊ नये म्हणून बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. पण घरगुती गोष्टींचा वापर करून तुम्ही अगदी सहज तोंडातून येणारा दुर्गंध दूर करू शकता.
लिंबाच्या रसाला कोमट पाण्यात मिसळा. दिवसातून दोनदा या पाण्याच्या गुळण्या करा. तोंडाला येणारा दुर्गंध कमी होईल.
मोहरीच्या तेलात थोडंस मिठ टाका. या मिश्रणाने दातांना आणि हिरड्यांना मसाज करा. यामुळे तोडांतून येणारा वास कमी होईल.
तसेच ग्रीन- टी प्यायल्यानेही तोंडातून येणाऱ्या वासाचे प्रमाण कमी होते. ग्रीन- टीमध्ये अँटी- बॅक्टेरियाचे अनेक गुण आहेत. ज्याचा तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीसाठी फायदाच होतो.
ज्या लोकांना तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास मोठ्या प्रमाणात आहे, त्यांनी वेलची आणि पुदीनाचं पान खावं. लगेच दुर्गंधीचं रुपांतर सुगंधात होईल.