लंडन, 16 जानेवारी : कोरोनाकाळात (corona times) केवळ शारीरिक स्वरूपातच लोक आजारी पडले असं नाही तर अनेक मानसिक गुंतागुंतीची परिस्थिती देखील निर्माण झाल्या आहेत. जगभरात हे चित्र बघायला मिळाले. आता विविध शासन यंत्रणाही या समस्या सोडवायला समोर येत आहेत. अमेरिकेनंतर ब्रिटनची एजन्सी पब्लिक हेल्थ इंग्लंडनं लोकांना मानसिक समस्यांपासून (mental health problems) मुक्त होण्याचे मार्ग सुचवले आहेत. यात मुख्य भर जीवनशैलीवर (lifestyle) आहे.
दिनचर्येवर (Daily routine) काम करा
आपण डेली रूटीन अर्थात दिनचर्येवर खूप काम केलं पाहिजे. यासाठी आधी याबाबत गांभीर्यानं विचार करा. असा डेली रूटीन प्लॅन बनवा जो तुम्हाला पॉझिटिव्ह ठेवेल. तसं पाहता डेली रूटीन आपल्या कामाच्या गरजेनुसार बनवलं जातं. मात्र हा अप्रोच चुकीचा आहे. काम महत्त्वाचं आहेच, पण त्याहून जास्त तुमचं आरोग्य महत्त्वाचं आहे. फोकस यावर ठेवा, की दिवसभरात किती वेळ स्वतःला देता. यासाठी दिवसाची सुरवात व्यायामाने (exercise) करा. यातून तुम्हाला दिवसभराची ऊर्जा (energy) मिळेल. आणि दिवसभराच्या तणाव आणि धावपळीनं भरलेल्या शेड्युलमध्ये ताजंतवानं, हलकं आणि सकारात्मक फिलिंग येत रहावं यासाठी लहान-लहान ब्रेक नक्की घेत रहा.
आपल्या लोकांशी जोडलेले राहा
मानसिक समस्यांच्या सर्वात मोठ्या कारणांपैकी एक म्हणजे आपल्या लोकांपासून तुटणं. वर्किंग, चाकरमानी लोकांना आपल्या लोकांसाठी वेळ काढणं अवघड असतं. मात्र यातून मानसिक शांतता भंगते. त्यामुळं थोडाफार तरी क्वालिटी टाइम आपल्या लोकांसाठी काढत रहा.
दुसऱ्यांना मदत करा
आपल्या आसपासच्या लोकांना मदतीचा हात द्याल तर तुम्हाला 'फील गुड' वाटेल. तुम्ही आशावादी रहाल. शिवाय एन्झायटी आणि एकटेपणातूनही बाहेर येण्यास यातून मदत मिळेल.
आपल्या ताणाबाबत बोला
अशा साथीच्या काळात चिंता, भय आणि असहाय्यता अशा अनेक भावना दाटून येणं साहजिक आहे. अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. तज्ञांच्या मते, शेअरिंग (sharing) केल्यानं तणाव अर्धाअधिक हलका होतो. त्यामुळं संकोच न करता विश्वासू व्यक्तीजवळ मनातला ताण बोला.
नीट झोप (sleep) घ्या
न झोपणं किंवा कमी झोपणं यातूनही मानसिक ताण होऊ शकतो. एकदा अंथरुणावर पडलं, की विचार करत राहणं, चिंता करणं, तणावग्रस्त राहणं चूक आहे. मोबाईल वापरत राहणं ही तर मोठीच घोडचूक आहे. यातून झोपेचा क्वालिटी टाईम कमी होतो. यातून इन्सोम्निया उद्भवण्याचा धोकाही वाढतो. चांगली झोप घेतल्यानं मानसिक आजारांचा धोका थेट ५०% कमी होतो.
आवडत्या गोष्टी करा
एकटेपण, एन्झायटी (anxiety) किंवा तणाव वाटेल तेव्हा त्यात जास्त अडकवून नका राहू. त्याचा जितका विचार कराल तितकं अस्वस्थ वाटेल. अशावेळी तुम्हाला ज्यातून आनंद, सुख वाटतं अशा गोष्टी आवर्जून करा. काही नवं शिका. यातून तणाव नक्की कमी होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.