जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / How to Control Cholesterol level : 'हे' पदार्ख वाढवू शकतात तुमची कोलेस्टेरॉल लेव्हल; आजच करा गुडबाय!

How to Control Cholesterol level : 'हे' पदार्ख वाढवू शकतात तुमची कोलेस्टेरॉल लेव्हल; आजच करा गुडबाय!

How to Control Cholesterol level : 'हे' पदार्ख वाढवू शकतात तुमची कोलेस्टेरॉल लेव्हल; आजच करा गुडबाय!

कोलेस्टेरॉल वाढणं ही एक समस्या डोकं वर काढतं आहे. कोलेस्टेरॉलची समस्या असलेल्या व्यक्तींनी कोणते पदार्थ खाणं टाळावं? जाणून घ्या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 10 सप्टेंबर : हल्लीचं दैनंदिन जगणं हे धकाधकीचं बनलंय. जेवणाच्या अनियमित वेळा आणि कामाचा ताण यामुळे विविध आजारांना तोंड द्यावं लागतं. मग जिम, योगा, नियमित पळणं यांसारखे अनेक उपाय केले जातात; पण केवळ व्यायाम नाही तर योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. जीवनशैली सुधारण्यासाठी वेळापत्रक आखलं तरी ते काटेकोरपणे पाळण्याचं प्रमाण कमी असतं. त्यात सातत्य राहत नाही. अशा सगळ्या गोष्टींमुळे विविध आरोग्यसमस्या सुरू होतात. त्यात कोलेस्टेरॉल वाढणं ही एक समस्या डोकं वर काढते. कोलेस्टेरॉल म्हणजेच रक्तातला एक वॅक्ससारखा घटक असतो. या घटकाचं प्रमाण असंतुलित झालं, तर त्याचा शरीरावर दुष्परिणाम व्हायला सुरुवात होते. कोलेस्टेरॉल एका ठरावीक प्रमाणात शरीरासाठी आवश्यक असतं; पण त्याचं प्रमाण  वाढायला सुरुवात होते, तेव्हा ते कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचून राहतं. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. रक्ताभिसरणात अडथळा आला, की स्ट्रोक येतो. हृदयाला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण झाले तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. म्हणूनच कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवायचं असेल तर आहार महत्त्वाचा ठरतो. कोलेस्टेरॉलची समस्या असलेल्या व्यक्तींनी कोणते पदार्थ खाणं टाळावं, याची माहिती घेऊ या. हेही वाचा - Diabetes : मधुमेहाच्या रुग्णासाठी ‘या’ पालेभाजीची पानं आहे वरदान, असा बनवा रायता! रेड मीट (मटण) खाणं टाळावं हार्वर्ड हेल्थ रिपोर्टनुसार, रेड मीट आणि पोर्क म्हणजेच मटण आहारातून वर्ज्य करावं. रेड मीटमध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. मटण खाल्ल्यामुळे शरीरातल्या कोलेस्टेरॉलच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होते. स्किनलेस चिकन किंवा मासे खायला हरकत नाही. शाकाहारी असाल तर बीन्स खाल्ल्यास शरीराला उपयुक्त ठरतं. प्रक्रिया केलेलं मटण खाणं टाळा हॉट डॉग, बिकन यांसारखे पदार्थ खाद्यप्रेमींना नेहमीच भुरळ घालतात. प्रक्रिया केलं गेलेलं मटण म्हणजेच प्रोसेस्ड मीट यात सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण खूप असतं. कोलेस्टेरॉलचं दुखणं असणार्‍यांनी हे अन्नपदार्थ आणि मुख्यत्वेकरून मांसाहार करणं शक्यतो टाळावं. कधी तरी नॉनव्हेज खाण्यास हरकत नाही; पण अशा वेळी मर्यादित स्वरूपात चिकन खावं. तळलेले पदार्थ टाळा तळलेले पदार्थ पाहिले, की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं; पण या तळलेल्या पदार्थांच्या सततच्या सेवनाने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. कोलेस्टेरॉल असलेल्या व्यक्तींनी तळलेले पदार्थ खाणं टाळायलाच हवं. समोसा, पकोडे, मोजरेला स्टिक्स, ओनियन रिंग्ज यांसारखे पदार्थ कोलेस्टेरॉल असणर्‍यांसाठी घातक  ठरतात. या पदार्थात प्रचंड प्रमाणात कोलेस्टेरॉल वाढवणारे घटक असल्याने तळलेले पदार्थ खाणं टाळावं. कुकीज, केक आणि पेस्ट्री नको बेकरी फूड्स खाणार्‍यांचं प्रमाण मोठं आहे. अशा बेकरी फूड्सच्या सेवनाने कोलेस्टेरॉलची शरीरातली पातळी बिघडते आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार कडक पथ्याचं पालन करावं लागतं. संशोधनात असं आढळून आलं आहे, की बेकरी फूड्समध्ये बटरचं (लोण्याचं) प्रमाण खूप असतं. त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढू शकतं. त्यावर पर्याय म्हणून लो फॅट फ्रोझन योगर्ट (दही) खाणं तब्येतीला उपयुक्त ठरू शकतं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात