जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Difference Between Pure And Synthetic Milk : दुधातली भेसळ कशी ओळखायची? काही सोप्या टिप्स घ्या जाणून

Difference Between Pure And Synthetic Milk : दुधातली भेसळ कशी ओळखायची? काही सोप्या टिप्स घ्या जाणून

Difference Between Pure And Synthetic Milk :  दुधातली भेसळ कशी ओळखायची? काही सोप्या टिप्स घ्या जाणून

भेसळयुक्त किंवा सिंथेटिक दूध दिसायला साध्या दुधासारखंच असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सहज फसतात. दूध नैसर्गिक आहे की भेसळयुक्त हे काही सोप्या टिप्स वापरून ओळखता येतं.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई,  14 सप्टेंबर : दूध लहान मुलांच्या वाढीसाठी आवश्यक असतं. तसंच दुधामुळे शरीरातली ऊर्जेची झीज भरून निघते. हाडांसाठी आवश्यक कॅल्शिअम दुधातून मिळतं. दुधातून शरीराला प्रथिनंही मिळतात. दुधातल्या पोषणमूल्यांमुळे आहारात दुधाला महत्त्वाचं स्थान आहे; मात्र अलीकडच्या काळात दुधामध्ये भेसळ होण्याचे प्रकार वाढले आहेत. तसंच दुधाचा दर्जाही घसरला आहे. अशा प्रकारचं भेसळयुक्त किंवा सिंथेटिक दूध दिसायला साध्या दुधासारखंच असते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सहज फसतात. दूध नैसर्गिक आहे की भेसळयुक्त हे काही सोप्या टिप्स वापरून ओळखता येतं. त्याबद्दल जाणून घेऊ या. वासावरून ओळखा सिंथेटिक दूधनिर्मिती करताना साबणाचा वापर केलेला असतो, त्यामुळे अशा दुधाला साबणाचा वास येतो. हे दूध हाताच्या बोटांवर घेऊन घासलं असता, त्यातून फेस तयार होतो. याचाच अर्थ दूध भेसळयुक्त आहे. जमिनीवर टाकून तपासा खऱ्या आणि बनावट दुधाची तपासणी करण्यासाठी दुधाचे काही थेंब चिकट किंवा पॉलिश केलेल्या फरशीवर टाका. दूध शुद्ध असेल, तर त्याचे थेंब ओघळून मागे डाग राहतात. मात्र दुधात भेसळ असेल, तर त्याचे काहीच डाग राहत नाहीत. हेही वाचा - Green Tea Side Effect : ‘या’ वेळेला चुकूनही पिऊ नका ग्रीन टी; फायद्यांऐवजी नुकसानच होईल जास्त खवा करून पाहा दुधाची शुद्धता तपासण्यासाठी त्यापासून खवा तयार करूनही पाहू शकता. त्यासाठी दूध 2-3 तास मंद आचेवर उकळू द्या. ते करताना ढवळत राहा. नैसर्गिक दुधाचा खवा एकदम मऊसर बनतो. दुधात भेसळ असेल, तर त्याचा खवा कडक होतो. लिटमस टेस्ट दुधातली भेसळ ओळखण्यासाठी एक रासायनिक चाचणीही करता येते. बऱ्याचदा सिंथेटिक दुधाला नैसर्गिक दुधासारखी चव यावी म्हणून त्यात युरिया घातला जातो. ते ओळखण्यासाठी अर्धा चमचा दुधात सोयाबीन पावडर मिसळा. या मिश्रणात लिटमस पेपर (Litmus Test) घाला. लिटमस पेपरचा रंग लाल किंवा निळा झाला, तर दुधात भेसळ आहे हे लक्षात घ्या.

    News18लोकमत
    News18लोकमत

    सिंथेटिक दूध तयार करताना त्यात खाद्यतेल, साबण, युरिया अशा घटकांचा वापर केला जातो. अशा प्रकारच्या दुधाची चव कडवट असते व त्याचा वास साबणासारखा असतो. सिंथेटिक दुधामध्ये कोणतीही पोषणमूल्यं नसतात. उलट त्यापासून शरीराला अपाय होतो. अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे कर्करोग होण्याचा धोकाही असतो. युरियाचं शरीरातलं प्रमाण वाढलं तर मूत्रविकारही होऊ शकतात. या दुधाच्या सततच्या वापरामुळे हृदय व फुफ्फुसावर परिणाम होण्याची शक्यता असते. लहान मुलांच्या आहारात दूध महत्त्वाचं असतं. त्या वयात दूध जास्त प्रमाणात आहारात असतं. अशा वेळी भेसळयुक्त किंवा सिंथेटिक दूध दिलं गेल्यास मुलांना भविष्यात गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं. त्यासाठी दुधाची शुद्धता घरच्या घरीच तपासणं गरजेचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: lifestyle
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात