मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

How to burn belly fat: 'या' 5 पदार्थांमुळे कमी होते 60 टक्के भूक, पोटाची ही चरबी होते कमी

How to burn belly fat: 'या' 5 पदार्थांमुळे कमी होते 60 टक्के भूक, पोटाची ही चरबी होते कमी

पोटावरील अतिरिक्त चरबीमुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack), स्ट्रोक (Stroke), मधुमेह (Diabetics) असे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.

पोटावरील अतिरिक्त चरबीमुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack), स्ट्रोक (Stroke), मधुमेह (Diabetics) असे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.

पोटावरील अतिरिक्त चरबीमुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack), स्ट्रोक (Stroke), मधुमेह (Diabetics) असे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो.

मुंबई, 31 मे: वाढलेलं वजन हे अनेकांसाठी टेन्शनचं कारण झालंय. घरून काम करत असल्याने अनेकांची लाइफ स्टाईल (Lifestyle) बदलली आहे, त्यामुळे एकाच जागी बसून राहिल्याने पोटाचा घेर वाढल्याच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. पोटावरील अतिरिक्त चरबीमुळे हृदयविकाराचा झटका (Heart Attack), स्ट्रोक (Stroke), मधुमेह (Diabetics) असे गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. आणि वाढलेलं वजन हे आपला आत्मविश्वास (Confidence) कमी करण्यासही कारणीभूत ठरतं. त्यामुळे अनेकजण वजन कमी करण्यासाठी जीममध्ये जाऊन अनेक तास घाम गाळतात.

तज्ज्ञांच्या मते, एखाद्या व्यक्तीने योग्य आहार घेतला आणि निरोगी लाइफ स्टाईल जगायला सुरुवात केल्यास पोटाचा घेर म्हणजेच पोटाची चरबी कमी होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे पोट कमी करण्यासाठी डाएट (Diet) करण्याची गरज नाही. कोणत्या प्रकारचं अन्न खाल्ल्याने भूक 60 टक्के कमी होते आणि पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होते, याबाबत एका अभ्यासात सांगण्यात आलंय. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

पोटाचा घेर कमी करण्यासाठी काय खावं?

आहारतज्ज्ञांच्या मते शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उत्तम पर्याय पाणी आहे. त्यामुळे रोज भरपूर पाणी प्यायला हवं. ‘स्प्रिंगर ओपन’मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, दररोज व्यायाम केल्यास आणि थर्मोजेनिक पदार्थ (Thermogenic Food) खाल्ल्यास शरीरातील चरबी कमी होते.

थर्मोजेनिक पदार्थ कसं काम करतात?

थर्मोजेनिक पदार्थ थर्मोजेनेसिस प्रक्रिया वाढवून मेटाबॉलिझम (Metabolism) क्रियेचा वेग वाढवतात आणि कॅलरी बर्न (Calorie burn) करण्यास मदत करतात. थर्मोजेनेसिस या प्रक्रियेत शरीर खाल्लेलं अन्न वापरण्यासाठी कॅलरी बर्न करतं आणि त्या कॅलरी उर्जेमध्ये रूपांतरित करतं. शरीर रोजची कामं करण्यासाठी शारीरिक हालचालींच्या माध्यमातून कॅलरी बर्न करतं. त्यामुळे चरबी कमी करण्यासाठी थर्मोजेनेनिक पदार्थांचं सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.

थर्मोजेनिक पदार्थ कोणते?

थर्मोजेनिक प्रक्रिया वाढवून कॅलरी बर्न करणाऱ्या पदार्थांना थर्मोजेनिक अन्न म्हणतात. लाल (Red Chilly) किंवा हिरवी मिरची (Green Chilly), काळी मिरी, आलं, खोबरेल तेल आणि प्रोटिन हे थर्मोजेनिक पदार्थ आहेत. या पदार्थांच्या सेवनामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होऊ शकते. त्यामुळे तुम्ही पोटाचा घेर किंवा वजन कमी करत असाल तर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात या पदार्थांचा समावेश करू शकता.

प्रोटीन चरबी कमी करण्यास कशी मदत करतं?

पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. खरं तर प्रोटिन मसल्स टिश्यू रिपेअर करण्याचं काम करतात. परंतु, एका संशोधनानुसार, प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने भूक कमी लागते, त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. संशोधनात असं आढळून आलं आहे की, जे लोक जास्त प्रोटीनयुक्त पदार्थ खातात, त्यांची भूक 60 टक्क्यांनी कमी होते.

दरम्यान, वजन कमी करण्यासाठी योग्य आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम सर्वांत महत्त्वाचा आहे. शरीराची हालचाल मंदावणं, हे वाढत्या वजनामागचं मुख्य कारण आहे. त्यामुळे थर्मोजेनिक आणि प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यासोबतच रोज थोडा तरी व्यायाम करणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Fat, Health