सर्वसाधारणपणे शारीरिक व्याधी निवारणासाठी औषधांचा उपयोग केला जातो. पण काही किडे असे आहेत त्यांचाही उपयोग होतो. असाच एक किडा म्हणजे जळू. तिचा उपयोग करण्याच्या पद्धतीला जळू उपचार पद्धती म्हणतात. जळू मानवी शरीराला चिटकतात आणि त्यांचे रक्त शोषतात. याच कारणाने जळूची भीती वाटते. मात्र जळूचा उपयोग शारीरिक व्याधींमध्ये चांगले परिणाम देते. आजकाल अनेक आजारांच्या उपचारासाठी जळूच्या उपचार पद्धतीचा उपयोग केला जातो, त्याने रुग्णाला आरामही पडतो. myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल यांनी सांगितल्यानुसार, प्राचीन काळी इजिप्त जळूच्या उपचारपद्धतीचा उपयोग मज्जासंस्था, दात, त्वचा आणि अन्य काही संसर्गजन्य आजारांसाठी केला जायचा. तर चला जाणून घेऊया या उपचार पद्धतीविषयी - खूप सोपी आहे जळूची उपचार पद्धत जळू उपचार पद्धत ही अतिशय सोपी आणि प्रभावशाली आहे. यात जिथे वेदना किंवा जखम आहे तिथे जळू ठेवल्या जातात. त्या तिथून शरीरातील दूषित रक्तशोषण करायला लागतात त्यामुळे हळूहळू आजार बरा होतो. जळू उपचार पद्धतीने उपचार करायला 45 मिनिटं लागतात. याचा उपयोग खाज, खरुज, तारुण्य पिटिका, पुरळ, टक्कल, मधुमेह या सारख्या आजारांवर केला जातो. आयुर्वेदा****त जळू उपचार पद्धत भारतातही प्राचीनकाळापासून जळू उपचार पद्धत वापरून उपचार केले जात आहेत. शरीरातील दूषित रक्त काढण्यासाठी जळू लावण्याची परंपरा खूप जुनी आहे. आयुर्वेदातही दूषित रक्त काढण्यासाठी जळू लावण्याचा उल्लेख आहे. त्याला रक्तमोक्षण असे म्हटले जाते. टक्कल जाते जळू उपचार पद्धतीने दूषित रक्त काढून टाकले जाते त्याने रक्ताभिसरण सुधारते. टक्कल दूर करण्याचा हा उत्तम उपाय आहे. यात डोक्यावर जिथे केस कमी आहेत तिथे जळू लावली जाते. ती दूषित रक्त शोषून घेते. त्यामुळे रक्ताभिसरण सुधारून तिथे नव्याने केस येतात. ज्यांच्या डोक्यात कोंडा होतो त्यांच्यासाठीही ही उपचार पद्धती चांगली आहे. मधुमेहातसुद्धा उपयोगी मधुमेही रुग्णांसाठी जळू उपचार पद्धत खूप उपयोगी आहे. जळूच्या लाळेत हिरूडीन नावाचे द्रव्य असते. ते रक्तात गुठळ्या होऊ देत नाही. जळू उपचार पद्धतीने मधुमेही रुग्णांच्या शरीरातील रक्त प्रवाह चांगला होतो. जळू लावताना ही काळजी घ्यावी जळू उपचार पद्धत स्वीकारण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे. अनेकांना या उपचाराने अॅलर्जी होऊ शकते. ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी या पद्धतीचे उपचार घेऊ नये. आपण जी औषधे घेत आहोत त्याची माहिती उपचारापूर्वी द्यायला हवी अन्यथा प्रतिकूल परिणाम होऊ शकतात. ज्यांना रक्तक्षय, रक्तात गुठळ्या होणे, हृदय रोग आहे त्यांनी ही उपचार पद्धत स्वीकारू नये, असा सल्ला myupchar.com च्या डॉ. मेधावी अग्रवाल यांनी दिल्ला आहे. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख – त्वचेचे विकार आणि रोग न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







