जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Honey Benefits: केवळ मध खाण्यानेच नाही तर नाभीवर लावल्यानंही होतात अनेक फायदे, जाणून घ्या

Honey Benefits: केवळ मध खाण्यानेच नाही तर नाभीवर लावल्यानंही होतात अनेक फायदे, जाणून घ्या

Honey Benefits: केवळ मध खाण्यानेच नाही तर नाभीवर लावल्यानंही होतात अनेक फायदे, जाणून घ्या

नाभीवर मध लावल्याने आरोग्याला कोणते फायदे ( health benefits ) होतात, हे तुम्हाला माहिती आहे का ? आज आम्ही तुम्हाला नाभीवर मध लावल्याने कोणकोणते फायदे होतात त्याची माहिती देत आहोत. चला तर मग जाणून घेऊयात…

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

नवी दिल्ली, 03 जानेवारी:  मध (Honey) हा एक असा स्वादिष्ट पदार्थ आहे, ज्याचा तुम्ही डाएटमध्ये सहजरित्या समावेश करू शकतो. मधाचे सेवन केल्यास आरोग्याला विविध फायदे मिळतात. त्यामुळे तुम्ही अनेकदा मध खाल्ला असेल. तुमच्या त्वचेचे आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मधाचा वापर केला असेल. पण तुम्ही कधी नाभीवर (Navel) म्हणजेच बेंबीवर मध लावला आहे का ? नाभीवर मध लावल्याने आरोग्याला कोणते फायदे ( health benefits ) होतात, हे तुम्हाला माहिती आहे का ? आज आम्ही तुम्हाला नाभीवर मध लावल्याने कोणकोणते फायदे होतात त्याची माहिती देत आहोत. चला तर मग जाणून घेऊयात… त्वचेचा कोरडेपणा दूर होतो नाभीवर मध लावल्यामुळे त्वचेचा कोरडेपणा ( dryness ) दूर होण्यासाठी मदत होते. तुमची जर त्वचा कोरडी पडत असेल, व विविध उपायांनी ही समस्या दूर होत नसेल, तर तुम्ही तुमच्या नाभीवर मध लावावा. यामुळे तुमच्या त्वचेतील कोरडेपणा दूर होईल आणि त्वचेची चमक वाढेल. मुरुमांची समस्या दूर होण्यास मदत चेहऱ्यावरील मुरुमांची ( pimples ) समस्या दूर करण्यासाठी मध उपयुक्त ठरू शकतो. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर मध लावावा. यामुळे मुरुमांची समस्या लवकरच दूर होईल. इन्फेक्शन पासून सुटका नाभी नीट साफ न केल्यामुळे तुमच्या नाभीमध्ये इन्फेक्शन ( infection ) होण्याची शक्यता असते. हे इन्फेक्शन दूर करण्यासाठी आल्याच्या ( ginger ) रसाचा एक थेंब मधात मिसळून नाभीवर लावा. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे इन्फेक्शन दूर करण्यात मदत करतात. पचनक्रिया व्यवस्थित राहते आल्याच्या रसात मध मिसळून नाभीवर लावल्यानेही तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहते. इतकंच नाही तर पोटदुखीपासून आराम देण्यासही हे उपयुक्त आहे. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही तुमच्या नाभीवर मध लावा. यामुळे तुमची पचनक्रियाही सुधारेल. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दुधात मध मिसळूनही त्या दुधाचे सेवन करू शकता. नाभीवर मध केव्हा लावावा ? रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर मध लावणे चांगले. पण तुम्हाला जर रात्री मध लावणे शक्य नसेल, तर दिवसभरात जेव्हा तुम्ही दोन-तीन तास विश्रांती घ्याल, त्यावेळी नाभीवर मध लावा. जेणेकरून मधाचा प्रभाव योग्य प्रकारे होऊ शकेल. मधाचा आयुर्वेदिक औषधांमध्येही उपयोग केला जातो. योग्य प्रमाणात मधाचे सेवन केल्यास आरोग्याला खूप फायदे मिळतात. शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठीही मधाचे सेवन फायद्याचे ठरते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात