रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग असलेले बटाटे बहुतेक घरांमध्ये साठवले जातात. पण,काही लोकांना बटाटे कसे साठवून ठेवावेत हे माहिती नसतं. बटाटे घरामध्ये साठवण्याची योग्य पद्धत माहिती असेल तर, बटाटे कधीच खराब होत नाहीत.
बटाटे कधीच ओलसर ठिकाणी ठेवू नयेत किंवा त्यांना प्लास्टिकच्या पिशवीतही बांधून ठेवू नये. त्यातील ओलसरपणाने बटाटे पटकन खराब होऊ शकतात. बटाटे फ्रीजमध्येही ठेवू नका. फ्रीजमध्ये बटाट्यात असलेल्या स्टार्चचं साखरेत रुपांतर होतं. जे आरोग्यासाठी धोकादायक आहे.
बटाटे जास्त काळ टिकवायचे असतील तर, घरी आणलेले बटाटे साठवण्यापूर्वी त्यातील खराब झालेले किंवा डाग असलेले बटाटे वेगळे करा. कारण एका सडलेल्या बटाट्यामुळे इतर बटाटे देखील खराब होऊ शकतात.