जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / घरातील ढेकणांमुळे आहात त्रस्त? मग हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

घरातील ढेकणांमुळे आहात त्रस्त? मग हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

घरातील ढेकणांमुळे आहात त्रस्त? मग हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

घरातील ढेकणांमुळे आहात त्रस्त? मग हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

उन्हाळ्यात घरात ढेकणांची पैदास होत असते. अनेक खर्चीक उपाय करून देखील ढेकूण जाण्याचं नाव घेत नाहीत तेव्हा यानिमित्ताने ढेकूण घालवण्याचे घरगुती उपाय जाणून घेऊयात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 15 मे : सध्या उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे घरात थोडी जरी अस्वच्छता असली तर तेथे लगेचच तेथे डास, ढेकूण, झुरळं यांची पैदास होते.  घराच्या कानाकोपऱ्यात किंवा अंथरुणात आपल्याला ढेकूण आढळून येतात. दिसायला अत्यंत लहान आकाराचे ढेकूण शरीरावर जोरात चावा घेतात आणि त्यामुळे अनेकांना बराच त्रास सहन करावा लागतो. परंतु वारंवार अनेक खर्चीक उपाय करून देखील हे ढेकूण जाण्याचं नाव घेत नाहीत तेव्हा हे ढेकूण कसे होतात आणि त्यांना घावण्याचे घरगुती उपाय जाणून घेऊयात. ढेकूण होण्याची कारणे : 1. पुरेसा सूर्यप्रकाश नसलेल्या ठिकाणी ढेकणांची पैदास होत असते. 2. घरात अस्वच्छता असेल तर लगेच तिथे ढेकूण होतात. 3. कुजलेले लाकूड किंवा ओलसर जागा येथे ढेकणांची पैदास लवकर होते. 4. सूर्यप्रकाश नसलेल्या जागी ढेकूण वर्षानुवर्षे राहतो. तसंच जवळपास दोन महिने अन्नाशिवाय राहू शकतो. ढेकणांचा नायनाट करण्यासाठी घरगुती उपाय : 1. घरातून ढेकूणांचा नायनाट करण्यासाठी कांद्याचा रस हे अत्यंत फायदेशीर औषध आहे. कांद्याच्या रसाचा वास ढेकूणांना सहन होत नाही त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो आणि ते मरतात. त्यामुळे ढेकूण होत असलेल्या ठिकाणी कांद्याचा रस लावावा. 2. गादी, पांघरुण किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी ढेकूण आढळल्यास त्या ठिकाणी निलगिरीचे थेंब शिंपडा. 3 निलगिरीच्या तेलात रोजमेरी, लव्हेंडर तेल मिक्स करुन हे तेल देखील ढेकूणांचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी लावू शकता. 4. लव्हेंडरची पाने कपड्यांवर घासल्यास कपड्यांवरील ढेकूण निघून जातात. 5. पुदिन्याच्या पानांच्या तीव्र वासामुळे देखील ढेकूण निघून जातात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी अंथरुणाशेजारी ताज्या पुदिन्याची पाने ठेवावीत. 6. कडुलिंबामध्ये अॅन्टी मायक्रोबायल गुणधर्म असतात. त्यामुळे किटक यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेकवेळा कडुलिंबाच्या पानांचा वापर होतो. जर घरात ढेकूण झाले असतील तर कडुलिंबाच्या तेलाचा शिरकाव घरातील कोपरे, अंथरुण यावर करावा. 7. घरात स्वच्छता ठेवा आणि घरातील ओलसरपणा टाळा. 8. घरात पुरेपूर सुर्यप्रकाश येईल याची काळजी घ्या. 9. घरातील कीटकांचा मारण्यासाठी ६ अथवा ३ महिन्यांनी पेस्ट कंट्रोल करा

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात