• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Grow Beard-mustache: तुम्हालाही हव्या आहेत भारदस्त दाढी-मिशा; मग हे घरगुती उपाय करून पहा

Grow Beard-mustache: तुम्हालाही हव्या आहेत भारदस्त दाढी-मिशा; मग हे घरगुती उपाय करून पहा

कॉस्मेटिकचा वापर न करताही तुम्ही घरगुती उपायांनी दाढी आणि मिशा वाढवू शकता. या घरगुती उपायांचा अवलंब करून दाढी-मिशीचे दाट केस दीर्घकाळ (Grow Beard-mustache Naturally) आकर्षक राहू शकतात.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : भारदस्त दाढी आणि मिशा वाढवण्यासाठी अनेक तरुण महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की कॉस्मेटिकचा वापर न करताही तुम्ही घरगुती उपायांनी दाढी आणि मिशा वाढवू शकता. या घरगुती उपायांचा अवलंब करून दाढी-मिशीचे दाट केस दीर्घकाळ  (Grow Beard-mustache Naturally)  आकर्षक राहू शकतात. खोबरेल तेलाने मालिश झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, दाढी आणि मिशांना खोबरेल तेलाने मसाज करणे हा चांगला आणि सोपा पर्याय आहे. तुम्ही मेंदीच्या तेलात मिसळलेले खोबरेल तेलही वापरू शकता. अधिक चांगले परिणाम मिळवण्यासाठी खोबरेल तेल किंचित गरम करा. कॉटन बॉलच्या मदतीने दाढी आणि मिशांवर लावा आणि किमान 15 मिनिटे राहू द्या. असे आठवड्यातून तीन वेळा करा. दालचिनीमध्ये लिंबू मिसळा लिंबू सायट्रिक ऍसिड, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे. ज्यामुळं दाढी-मिशीतील कोंडा कमी करण्यास मदत होते. तर पोषक तत्वांनी युक्त दालचिनी रक्त प्रवाह सुधारते. दोन्हीमध्ये दाढी आणि मिशा वाढण्यास सहायक ठरणारे गुणधर्म आहेत. तुम्हाला फक्त ग्राउंड दालचिनी घ्यायची आहे आणि त्यात काही चमचे लिंबाचा रस टाकायचा आहे आणि हे मिश्रण तुमच्या चेहऱ्याच्या केसांवर किमान 30 मिनिटे राहू द्या. ते धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. तुम्ही हे आठवड्यातून दोनदा वापरू शकता. हे वाचा - हे पदार्थ निष्काळजीपणे खाणं आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; तुम्हीही ही चूक करत नाही ना? आवळा तेल आवळा हे हर्बल केसांसाठी सप्लिमेंट आहे. दाढी आणि मिशा वाढण्यासही याची मदत होऊ शकते. आवळा तेल केसांच्या फोलिकल्सच्या पीएच पातळीला संतुलित ठेवते, चकचकीत त्वचा काढून टाकते आणि दाढी आणि मिशा वाढण्यासाठी पूरक वातावरण प्रदान करते. तेलामध्ये व्हिटॅमिन सी असते, जो एक अँटिऑक्सिडेंट आहे जो मुक्त रॅडिकल्सशी लढतो. या तेलाने दाढी आणि मिशांना मसाज करा आणि नंतर 25 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. हे वाचा - हिवाळ्यात ही पालेभाजी खाण्याचे आहेत भरपूर फायदे; रोगप्रतिकारकशक्ती वाढेल, अनेक आजार राहतील दूर निलगिरी तेल नारळाच्या तेलाप्रमाणे, निलगिरी तेल देखील केसांच्या वाढीस फायदेशीर आहे. मात्र, त्यातील शक्तिशाली घटकांमुळे हे तेल लावल्यावर त्वचेवर जळजळ होऊ शकते. म्हणून ते ऑलिव्ह किंवा तिळाच्या तेलात मिसळावे असा सल्ला दिला जातो. अर्धा कप ऑलिव्ह ऑईल घ्या आणि त्यात किमान 20 थेंब निलगिरी तेल मिसळा. आणि दाढी-मिशांच्या त्वचेवर मसाज करा नंतर 30 मिनिटे तसेच राहू द्या आणि थंड पाण्याने आणि सौम्य साबणाने धुवा.
  Published by:News18 Desk
  First published: