मीठ आणि साखर हे असे पदार्थ आहेत बदलत्या वातावरणामुळे लवकर खराब होतात. त्यात ओलावा (Moisture) तयार होत असल्यामुळे लवकर खराब होतात.
मात्र, रोजच्या स्वयंपाकात लागत असल्यामुळे हे पदार्थ टिकवणं कठीण बनतं. हे पदार्थ टिकविण्यासाठी काही छोट्याशा टीप्स वापरता येऊ शकतात.
पावसाळ्यात साखर प्लास्टिकच्या बरणीत किंवा स्टिलच्या भांड्यात ठेवत असाल तर, पावसाळ्यामध्ये ही सवय बंद करून काचेच्या बरणीमध्ये साखर ठेवायला सुरुवात करा.
शिवाय साखर काढताना नेहमीच सुकलेल्या हातांनी काढावी. आपल्या हाताचा दमटपणा साखरेला लागला तर साखर ओली होऊ शकते.
साखरेच्या डब्यामध्ये तांदळाचे काही दाणे टाकल्याने फायदा होतो. साखरेत किंवा मिठामध्ये तांदळात तांदूळ भरून त्याची पुरचूंडी टाकून त्यामध्ये ठेवून द्या.
यामुळे त्यामध्ये तयार झालेलं एक्स्ट्रा मॉयश्चर शोषलं जाईल आणि साखर किंवा मीठचा ओलेपणा लागणार नाही.
साखर किंवा मीठ जास्त दिवस टिकवण्यासाठी ब्लोटिंग पेपरही वापरता येतो. याकरता बरणीमध्ये साखर भरताना त्यामध्ये आधी ब्लोटिंग पेपर ठेवा. त्यानंतर त्यावर साखर किंवा मीठ भरा. ब्लोटिंग पेपर त्यामधील एक्स्ट्रा मॉश्चर खेचून घेतं. साखर किंवा मीठ जास्त दिवस टिकवण्यासाठी ब्लोटिंग पेपरही वापरता येतो. याकरता बरणीमध्ये साखर भरताना त्यामध्ये आधी ब्लोटिंग पेपर ठेवा. त्यानंतर त्यावर साखर किंवा मीठ भरा. ब्लोटिंग पेपर त्यामधील एक्स्ट्रा मॉश्चर खेचून घेतं.
एवढंच नाही तर बिस्कीट,कुकीज आणि चिप्स मऊ पडू नयेत म्हणून देखील तुम्ही ब्लॉटिंग पेपरचा वापर करू शकता.
पावसाळ्यामध्ये साखरेमध्ये सात-आठ लवंग टाकून ठेवा. यामुळे साखरेला पावसाळ्यामध्ये ओलसरपणा लागणार नाही. शिवाय साखरेमध्ये मुंग्या होणार नाहीत.