• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Mouth Ulcers Treatment : तोंडातील अल्सर घालवण्यासाठी हे घरगुती उपाय आहेत गुणकारी

Mouth Ulcers Treatment : तोंडातील अल्सर घालवण्यासाठी हे घरगुती उपाय आहेत गुणकारी

जेव्हा तोंडात फोड येतात, तेव्हा खाण्यापिण्यात खूप अडचण येते. तोंडातील हे व्रण बरे करण्यासाठी बाजारात अनेक औषधे उपलब्ध असली तरी काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही तोंडातील व्रण (Mouth Ulcers Treatment) बरे करू शकता.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : जर तुम्ही देखील तोंडात व्रण किंवा अल्सर येण्यामुळं त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. याला काहीजण तोंड येणं किंवा तोंडात उष्णता उठणे असेही म्हणतात. अशा प्रकारे तोंडात व्रण येणे सामान्य आहे, परंतु ते खूप वेदनादायक असतात. जेव्हा तोंडात फोड येतात, तेव्हा खाण्यापिण्यात खूप अडचण येते. तोंडातील हे व्रण बरे करण्यासाठी बाजारात अनेक औषधे उपलब्ध असली तरी काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही तोंडातील व्रण (Mouth Ulcers Treatment) बरे करू शकता. तोंडाला व्रण होण्याचे कारण? तोंडात असे व्रण होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. जास्त मसालेदार अन्न किंवा गरम अन्न, पोट खराब होणे किंवा बद्धकोष्ठता यामुळे तोंडात असे व्रण येऊ शकतात. काही लोक सुपारी वगैरे खाल्ल्यानंतर रात्री तोंड स्वच्छ न धुता झोपतात, असे केल्याने तोंडात फोडही येतात. या व्यतिरिक्त, तंबाखू, पान-मसाला आणि धूम्रपान यामुळे तोंडाला व्रण होतात. मानसिक तणाव हे देखील तोंडाला अल्सर होण्याचे एक कारण आहे. तोंडाच्या व्रणांपासून मुक्त होण्यासाठी उपाय 1. मध आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांच्या मते, तोंडाच्या अल्सरवर घरगुती उपचार करण्यासाठी मध फायदेशीर आहे. यासाठी मधात एक चिमूटभर हळद मिसळून वापरता येते. हे तोंडाचे व्रण बरे करण्यास मदत करते. 2. नारळ तेल नारळाच्या तेलात बुरशीविरोधी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म तसेच दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे वेदनांपासून त्वरित आराम देतात. डॉक्टर अबरार मुल्तानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या भागावर दिवसातून अनेक वेळा नारळ तेल लावू शकता. 3. कोरफड ज्यूस डॉ.अबरार मुलतानी यांच्या मते, कोरफडीचा रस नियमित वापरल्यास तोंडातील वेदना कमी होऊ शकते. तोंडाच्या अल्सरपासून आराम मिळवण्यासाठी, कोरफडीचा रस दिवसातून दोनदा त्या भागावर लावा. हे वाचा - मिळवा तुमचा Dream Job! गादीवर झोपल्या-झोपल्या मिळतील 25 लाख रुपये 4. तुळशीची पाने औषधी गुणांनी समृद्ध असलेली तुळशी तोंडाचे व्रण प्रभावीपणे बरे करण्याचे काम करते. यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहे. तोंडाच्या व्रणांच्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीची पाने चावून दिवसातून दोनदा कोमट पाण्याने गुळण्या (गारगळ) करा. (सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. कृपया त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)
  Published by:News18 Desk
  First published: